पोस्ट्स

सप्टेंबर, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संस्कार

इमेज
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे...यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी 'श्यामची आई' रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली. 'श्यामची आई' पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या. १९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा 'इम्...

करिअर

इमेज
करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे काही त्यांच्या क्षेत्रात मिळवतात ती त्यामुळे संबंधित क्षेत्रातली आदर्श होतात. मग तुम्ही आम्ही मागे का? करिअरचा नेमका अर्थ कळला तर हे कोडं सुटू शकतं. शाळा कॉलेजमध्ये असताना अमुक तमुक क्षेत्रातलं शिक्षण घेणं करिअर असतं. कॉलेजमधून बाहेर पडताच एखादी तगड्या पगाराची नोकरी मिळवणं करिअर होतं. थोडा काळ तिथे जातो न जातो तेव्हा प्रमोशनपासून परदेशातजाण्यापर्यंतचे वेध लागू लागतात, त्याला करिअरचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यात करिअर कुठे आहे. इथे आपणच विणलेल्या कोशातून बाहेर पडायला हवं. नेमकं आपल्याला काय हवं, हे उमजायला हवं.(हीच तर खरी गोम आहे) एखाद्या भल्या मोठ्या क्षेत्राची निवड करण्यापेक्षा आपल्याला काय करायला आवडतं, हे शोधून काढलं तर उत्तम. मेडिकलला जायचंय असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर व्हायचंय की फार्मा कंपनी काढायची हे आत...