पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय......

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय. जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता. खरे दु:ख याचे की, तुम्ही मला गृहित धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय.. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्यात. असे होईल,मला काय माहित? मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतेय? होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... ही कही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते, आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे. म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... मावल्यांनो,लेकीब

'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्य

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.??

  तुमचा आणि आमचा शिष्टाचार असतो. अशी कविता शाळा-कॉलेजात भविष्यात शिकवली जाणार की काय? असं वाटू लागलंय. कारण टी.व्ही लावला की भ्रष्टाचाराची बातमी, सकाळी पेपर चाळला की भ्रष्टाचाराची बातमी. एखाद-दुसर्‍या दिवशी भ्रष्टाचाराची बातमी ऎकली किंवा वाचली नाही तर मन अगदी अस्वस्थ होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे भ्रष्टाचार आणि भारतीय माणसाचे नाते इतके घट्ट झाले आहे की सोडता सोडवेना. मुळात भ्रष्टाचार हा विचारांतून जन्माला येतो आणि मग तो कृतीत उतरतो. स्वतंत्र भारतातील पहिला वैचारिक भ्रष्टाचार गांधी-नेहरुंनी केला. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रधानमंत्री पदासाठी लोकशाही मार्गाने बहुमताने निवडून आले होते. तरी आमच्या महात्मा गांधींनी नेहरुंना पंतप्रधान पद दिले. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार होता. आज चीन आणि काश्मीरसारखा न सुटणारा प्रश्न आपल्याला नेहरुंच्याच कृपेने मिळाला आहे. पुढचा सर्वात मोठा वैचारिक भ्रष्टाचार नेहरुंनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होणार होतं. परंतु वंदे मातरमला चाल लावणे कठीण आहे व ते बॅंडवर वाजवता येत नाही म्हणून वंदेमातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही, असे नेहरु म्हणाले. का

गरीब मुलगा.............

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे." मुलांनी एक

तुम्ही सुद्धा बनू शकता कॉम्प्युटर जीनियस........

आपल्या प्रत्येकात एक हुशार, चाणक्य, बुद्धिवंत, जाणकर किंवा प्रज्ञावंत (जीनियस) दडलेला असतो. आणि तो सांगत असतो की, तुम्ही स्वतःच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार! आपण स्वतःच आपले करियर घडवत येतो. त्याला आकार देतो. याचा अर्थच असा की, प्रत्येकजण हा जन्मापासूनच हूशार, प्रज्ञावंत असतो. फक्त काही तरी घडल्याने, अडथळे आल्याने त्यांची घडी विस्कटते आणि हे सारे जीनियस ठरत नाहीत. आपल्या पैकी थोडेच प्रज्ञावंत ठरतात, चमकतात. तुम्ही वा आपणासारखेच खरं तर प्रज्ञावंत बनू शकतो. अगदी कॉम्प्युटर जीनियससुद्धा! जग फार थोड्या लोकांनाच जीनियस म्हणून मान्यता देतं, असं का होतं? हे समजून घेण्यासाठी कॉम्प्युटर सर्वेसर्वा जगातील गर्भश्रीमंत ‘बिल गेट्स’ यांचे उदाहरण उत्तम आहे. बिल गेट्स यांनी जीवन कहाणी हे सिद्ध करते की, तुम्ही आम्ही संगणक प्रज्ञावंत बनू शकतो. बिल गेट्स हे उत्तरार्धात म्हणजे शालेय विद्यार्थी. युवक असतांना त्यांची स्थिती काय होती? उमेदीच्या काळात ते काय करत होते? हे जाणलं तर तुमच्या आमच्या जीनियसपणाचा मार्गही आपणास गवसेल... बिल गेट्स आणि त्यांच्या सारखे लोक उमेदीच्या काळात, विद्यार्थीदशेत प्रत्येक अडचण

आई, तू आहेस म्हणूनच,,,,,ं

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस जख्मं ती पुर्ण बुजली आता हरवून गेली त्यावरची खपली तो धपाटा, ती फुंकर, ती माया ती हरेक आठवण मनात जपली आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

आई-बाप;.,,,,,

"आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, एडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलंस्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्यामरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्यखर्चलेल असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणारस्टीअरींग असतं अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम हे; रोजच्याआयुष्यात, कामाला येणार बँकबॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या वेळीमिळणारा, तुमचा बोनस किंवावेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते बाप म्हणजे चालती बोलती,अनुभवाचीफॅकटरी असते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभरमिळवलेली कमाईअसते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो दाखवलेल्या वाटे

लक्षात नसलेला बाप

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशा अनेक ओळी, कविता, चारोळ्या, तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील. एवढेच नाही तर आई या विषयावर आपल्या थोर लेखकांनी पुस्तकच्या पुस्तक लिहून ठेवली आहेत आणि तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपल्या बाई किंवा गुरुजींने पण आपल्याला आई ह्याच विषयावरच निबंध लिहायला किंवा भाषणे बोलायला सांगितली असतील. अशी ही आहे आईची महती आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत. काय चुकीच आहे त्यात, आई आहेच मुळात एवढी श्रेष्ट. पण आईला महत्व देता देता आपण आपल्या बापाला म्हणजेच वडिलांना कधी विसरलो ते समजले देखील नाही. वडील, पप्पा, डॅडी, बाबा हेच शब्द ऐकायला किती बरे वाटतात पण ह्याच शब्दांची जागा आता एका ‘बाप’ या शब्दानी घेतली. आपण एकाध्या ला विचारताना सहज विचारतो की अरे तुझ्या बापाचे नाव काय ? पोरा पोरानं मध्ये आपण एकाध्याला सहज त्याच्या बापाच्या नावाणे चिडवतो किंवा हाक मारतो पण मुळात आपण हेच विसरतो की त्याच बापामुळे आपली आज ओळख आहे अस्तित्व आहे. काही महारथी पोर आपल्या बापाचा उल्हेख ‘हिटलर’ म्हणून देखील करतात ते बोलताना सहजच बोलतात की ‘अरे आज घरी

आई बाप खरे गुरुंचेही गुरु.

आईबापा विना कोण गुरु मोठा ? पायी असे त्यांच्या देव विसावला. झिजवी देह सदा आई व बाप दुजा गुरु काय करील असे तप? बोट धरुनिया दाखविती जग, स्वसुखे सारुन बाजुसी , जगती आई बाप. करती मोठा त्याग विनामोबदला, असती गुरु माझे आई व वडिल. आई बाप आहेत देवाचेही देव तेच आहेत गुरु पुजनिय. निशदास म्हणे , शोधु नये कधी बाहेरचा गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु.

ओळी फक्त माझ्या आईसाठी...........

...................... विश्वास ठेव तू मजवर आई जन्म दिलास तू मजला ऋण फेडू कसे मी आई आयुष्याच्या त्या क्षणाला सोसलेस तू माझ्यासाठी दिलीस तू छत्राखाली छाया कुरवाळत तू केलीस माया नाही समजले मी या वेड्या प्रेमाला कमनशिबी आज मी ठरले गं! विश्वास ठेवू तू मजवर आई।।१।। या मायेेचा गंध निराळा दरवळत तो हृदयापाशी आला जाता-जाता सांगून गेला जिथे असशील तू वेड्या जीवा सदैव असेल माझी साथ रे तुला नाही समजले या वेड्या मनाला वाट तुझ्याविना आज हरवले गं। विश्वास ठेव तू मजवर आई ।। २।। सांगते आज सत्य तुला जिंकीन हे सारे जग गं अपेर्न तुझ्या चरणावर सांगेन अभिमानाने साऱ्या जगाला तूच माझा गुरू, तुच माझा परमेश्वर तूच माझी करुणा तूच माझे सर्वस्व गं। विश्वास ठेव तू मजवर आई।। ३।।

हनुमान

यूं तो भगवान हनुमान जी को अनेक नामों से पुकारा जाता है, जिसमें से उनका एक नाम वायु पुत्र भी है। जिसका शास्त्रों में सबसे ज्यादा उल्लेख मिलता है। शास्त्रों में इन्हें वातात्मज कहा गया है अर्थात् वायु से उत्पन्न होने वाला। पुराणों की कथानुसार हनुमान की माता अंजना संतान सुख से वंचित थी। कई जतन करने के बाद भी उन्हें निराशा ही हाथ लगी। इस दुःख से पीड़ित अंजना मतंग ऋषि के पास गईं, तब मंतग ऋषि ने उनसे कहा-पप्पा सरोवर के पूर्व में एक नरसिंहा आश्रम है, उसकी दक्षिण दिशा में नारायण पर्वत पर स्वामी तीर्थ है वहां जाकर उसमें स्नान करके, बारह वर्ष तक तप एवं उपवास करना पड़ेगा तब जाकर तुम्हें पुत्र सुख की प्राप्ति होगी। अंजना ने मतंग ऋषि एवं अपने पति केसरी से आज्ञा लेकर तप किया था बारह वर्ष तक केवल वायु का ही भक्षण किया तब वायु देवता ने अंजना की तपस्या से खुश होकर उसे वरदान दिया जिसके परिणामस्वरूप चैत्र शुक्ल की पूर्णिमा को अंजना को पुत्र की प्राप्ति हुई। वायु के द्वारा उत्पन्न इस पुत्र को ऋषियों ने वायु पुत्र नाम दिया। कैसे पड़ा हनुमान नाम। वायु द्वारा उत्पन्न हनुमान के जन्म का नाम वायु पुत्र था परंत

रामनवमी

रामायणातील प्रभू श्रीरामचंद्र ऐतिहासिक होते की नाही यावर रामसेतूच्या निमित्ताने वादंग सुरू आहे. त्यांना ऐतिहासिक मानले तर आठ ते दहा हजार वर्षापूर्वी अयोध्येचा हा क्षत्रिय राजा , सीतामाई आणि लक्ष्मणासोबत गोदाकाठी महाराष्ट्रात आला होता. तेव्हा महाराष्ट्र दंडकारण्याचा एक भाग होता आणि अनेक ऋषी इथं नवी संस्कृती रुजवत होते. श्रीरामांनी या प्रयत्नाला खरा आकार दिला. रामाच्या वास्तव्याचे दाखले देणारी तीर्थक्षेत्रे मुंबईच्या वाळकेश्वरपासून नागपूरच्या रामटेकपर्यंत सर्वत्र पसरली आहेत. मध्ययुगीन काळात महाराष्ट्रातील संतानीही रामाला आपलं दैवत मानलं. म्हणूनच वारकरी संप्रदायाच्या एकनाथांनी भावार्थ रामायणाची रचना केली आहे. पण महाराष्ट्राला रामभक्तीची दीक्षा दिली ती समर्थ रामदास स्वामींनी. ‘ जय जय रघुवीर समर्थ ’, असा मंत्र एक काळ महाराष्ट्रात घुमत होता. तो मंत्र होता रामभक्तांच्या संप्रदायाचा. त्याची स्थापना रामदासांनी केली होती. राम महाराष्ट्रात कुठे कुठे गेला आणि तिथे काय काय घटना घडल्या याबद्दल ब-याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. रामानेच शिवपूजेसाठी वाळूचं शिवलिंग घडवलं तो वालुकेश्वर. तेच ठिकाण आज वाळके

राजमाता जिजाबाई

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता ! हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून. राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखोजींकडे हट्ट करणार्‍या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढे. म्हाळसाईंनी आपल्या लेकीला अशा कथा सांगून तिच्या शूरपणाला प्रोत्साहन दिले. लोकांनी

II श्री स्वामी समर्थ.

श्री स्वामी समर्थ........ एक मुसलमान वयस्कर स्त्री घरी बनवलेले दही विकुन आपला चरितार्थ चालवत असे. तिने बनवलेल्या गोड दह्याला बरीच मागणी होती. अश्याप्रकारे ती वयस्कर बाई आपला आयुष्य कंठीत होती . तिने स्वामींचे नाव ऐकले होते पण कधी प्रत्यक्ष दर्शन घेतले नव्हते. दही बनवताना शांतपणे नामस्मरण करणे एवढीच तिची भक्ती मर्यादित होती. एक दिवस तिला सगळ्यांना एवढे आवडणारे दही, स्वामींना आपल्या हाताने भरवण्याची तीव्र इच्छा झाली. झालं!! एक दिवस ती बाई पहाटे लवकर उठून, घरी लावलेलं दही घेऊन अक्कलकोटच्या मार्गावर चालू लागली. तिला दुपारच्या आत अक्कलकोटला पोचायचे होते. कारण सुर्य डोक्यावर आल्यावर झालेले आंबट दही स्वामींना कसे द्यायचे? हा प्रश्न तिला भेडसावत होता. भरभर पाउलं टाकत ती बाई अक्कलकोटच्या मार्गाने चालत होती. दिवस वर येऊ लागला तस उन वाढू लागले. त्या वयस्कर बाईची दमछाक होऊ लागली. तरीही नेटाने ती बाई जोरात चालतच राहिली. बघता बघता माध्यान्य झाली. सूर्य डोक्यावर आला.उन्हाळ्याचे दिवस होते. बाईच्या तोंडाला कोरड पडली. पाउल पुढे टाकवेना. जीव कासावीस झाला. तरीही ती बाई नामस्मरण करत वाट तुडवतच राहिली.

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ........

माघ वद्य १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्षे राहिले. आणि मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गे अक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके १८०० पर्यंत होते. दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. अक्कलकोटचे परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ''भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.'' आजही त्याची प्रचीती