तुम्ही सुद्धा बनू शकता कॉम्प्युटर जीनियस........

आपल्या प्रत्येकात एक हुशार, चाणक्य, बुद्धिवंत, जाणकर किंवा प्रज्ञावंत (जीनियस) दडलेला असतो. आणि तो सांगत असतो की, तुम्ही स्वतःच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार! आपण स्वतःच आपले करियर घडवत येतो. त्याला आकार देतो. याचा अर्थच असा की, प्रत्येकजण हा जन्मापासूनच हूशार, प्रज्ञावंत असतो. फक्त काही तरी घडल्याने, अडथळे आल्याने त्यांची घडी विस्कटते आणि हे सारे जीनियस ठरत नाहीत. आपल्या पैकी थोडेच प्रज्ञावंत ठरतात, चमकतात. तुम्ही वा आपणासारखेच खरं तर प्रज्ञावंत बनू शकतो. अगदी कॉम्प्युटर जीनियससुद्धा! जग फार थोड्या लोकांनाच जीनियस म्हणून मान्यता देतं, असं का होतं? हे समजून घेण्यासाठी कॉम्प्युटर सर्वेसर्वा जगातील गर्भश्रीमंत ‘बिल गेट्स’ यांचे उदाहरण उत्तम आहे. बिल गेट्स यांनी जीवन कहाणी हे सिद्ध करते की, तुम्ही आम्ही संगणक प्रज्ञावंत बनू शकतो. बिल गेट्स हे उत्तरार्धात म्हणजे शालेय विद्यार्थी. युवक असतांना त्यांची स्थिती काय होती? उमेदीच्या काळात ते काय करत होते? हे जाणलं तर तुमच्या आमच्या जीनियसपणाचा मार्गही आपणास गवसेल... बिल गेट्स आणि त्यांच्या सारखे लोक उमेदीच्या काळात, विद्यार्थीदशेत प्रत्येक अडचणीला तोंड कसं देतात, सारं कसब पणाला कसं लावतात हे पाहणं आवश्यक आणि मार्गदर्शक ठरेल.

२८ ऑक्टोबर १९५५ मध्ये सिएटलमध्ये जन्मलेल्या बिल यांचे आई वडील सुखवस्तू घरातील होते. बिल गेट्स यांच्या पालकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात उत्तम सुसंवाद होता. बिल गेट्स यांनी आपल्या पालकांविषयी म्हटले आहे की, त्यांचे वागणं, परस्पर सुसंवाद, कोणतंही काम सांधिकपणे करण्याची हातोटी माझ्यासाठी एक आदर्श मॉडेल होतं. त्यांच्यातील सांधिकपणा तर अनुकरणीयच. जादुप्रमाणे हे सारं माझ्यात यावं असं वाटायचं... विशेष म्हणजे हे गुण बिल गेट्स यांची नंतर अंगी बाणवलेच! प्रारंभी ज्या शाळेत बिल गेट्स होते त्या शाळेत ते रमले नाहीत. अभ्यासाचा कंटाळा करु लागले. शाळा हे जणू संकट वाटायचं त्यांना त्यांचे आई वडील चिंताग्रस्त बनले. मुलातील सुप्त गुणांना, छंदाला वाव मिळेल अशा शाळेच्या शोधात असतानाच लेकसाईड स्कूलमध्ये बिल दाखल झाले. या शाळेत (१९३८) मध्येच कॉम्प्युटर क्लब होता. त्यांचा नाद बिल यांना लागला. शाळेत ते रमले आणि कॉम्प्युटरने झपाटले गेले याच शाळेला देणगी मिळाली. ज्यातून शाळेने १९६८ मध्ये ईआर ३३ टेलीटाईप टर्मिनल वसवलं. ज्यावर बिल यांचं करियर घडू लागलं. इथे लक्षात घेतलं पाहिज की, १९६५ मध्ये ज्या कॉम्प्युटरच्या शोध लागला तो अवघ्या तीन वर्षात बिल गेट्स आणि त्यांच्या मित्रांना हाताळायला मिळाला. आजच्यासारखा तो अद्ययावत संगणक नव्हता आणि अनेक शास्त्रज्ञांना तो उपलब्ध व्हायचा नाही. पण शाळेत तो बिलना उपलब्ध झाला. कोणतेही शिक्षक मार्गदर्शक नसताना बिलनी या संगणकाशी मैत्री केली. स्वतःच अनेक गोष्टी ते शिकले. मित्रांकडूनही त्यांनी अनेक टिप्स घेतल्या. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी रिअल टाईम प्रोग्रॅमिंग शिकून घेतलं. स्वयंअध्ययनाने त्यांनी ते कौशल्य प्राप्त केले हे विशेष! पण हे खर्चिक प्रकरण शाळेला अवघड जाऊ लागलं तेव्हा पालकांनी मुलांसाठी सी क्यूब नावाची कंपनी शोधली. तिथल्या सुवर्ण संधीचा वापर बिल आणि त्यांच्या मित्रांनी केला. पुढे त्यात अडचणी आल्यावर वॉशिंग्टन विद्यापीठात फक्त मध्यरात्री ३ ते ६ पर्यंत उपलब्ध असलेल्या संगणकावर बिल गेट्स सराव करु लागले. त्यांनी संधी शोधली त्या तुलनेत आज संगणक क्रांतीच झालीय. शेकडो संधी आपल्या सभोवताली आहेत. त्यांचा आपण वापर केला पाहिजे ते खर्‍या प्रज्ञावंताचं लक्षण आहे. संगणक क्षेत्रात तुम्ही किती तास संगणकावर काम करता हे महत्त्वाचं ठरलं वयाच्या १६ व्या वर्षी बिल गेट्स च्या खात्यावर १५७५ तास जमा झाले. संगणक हाताळायला मिळावे म्हणून अनेक पर्याय बिल शोधत होते. मेहनत, अथक परिश्रमाची जोड त्यांनी बुद्धिमत्तेला दिली. त्यामुळे यश त्यांच्या जवळ आलं. सतत संगणकाचा सराव करायचा वेगवेगळं प्रोग्रॅमिंग करायचं त्यावर पैसे मिळवायचे. खोडकरपणा करायचा. सराव, सराव आणि फक्त सराव यातून नव्या कल्पना काढून त्यांचा वापर करण्याची कला बिल आणि त्यांच्या मित्रांनी आत्मसात केली. काम करतानाच ज्ञान मिळवा. सराव करा. प्रत्यक्ष कामातून ज्ञान मिळवा. स्वतःची उपयुक्तता वाढवा, असं मंत्रच बिल गेट्स नी रुढ केला.

संगणक प्रज्ञावंत म्हणून वयाच्या १९ व्या वर्षी जेव्हा लोक त्यांना ओळखू लागले तेव्हा त्यांच्या नावावर नोंद होती ती १० हजार तास संगणकावर पूर्ण केल्याची! जीनियस असाच धडाका लावतात कामाचा ...! संधी शोधतात. अडचणीचं रुपांतर व्यावसायिक संधीत करतात. आणि अथक परिश्रमाला प्रज्ञेची झालर लावतात. अशा संधी तुमच्या समोरही आहेत. डोळसपणे त्याकडे पहायला पाहिजे. अशा संधीची जाणीव शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. छोटी मोठी कामं करून तो पैसा संगणक सरावासाठी बिल गेट्स यांनी वापरला.

आज अत्याधुनिक संग्णकाची सहज उपलब्धता आहे. त्यामुळे फक्त संधी शोधली पाहिजे. जसं बिल यांना जॉन नॉर्टन या संगणक शिक्षकाने घडविलं, तसा प्रयत्न असा हुशार विद्यार्थी शोधणे हा शिक्षकांनी केला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनीही शिक्षक मार्गदर्शकाच्या शिकवणीचं सोन्यात रूपांतर केले पाहिजे. बिल गेट्स यांच्यापासून अथक परिश्रम, प्रचंड सराव यांची स्फूर्ती घेतली पाहिजे. कामातून ज्ञान, ज्ञानातून अधिक चांगलं काम, हा खरा मंत्र! बिल गेट्स यांनी कॉम्प्युटर तज्ज्ञता मिळवली. जगात ज्यांना काही किंमत आहे, अशा कामासाठी कॉम्प्युटर कामं करणं महत्त्वाचं आहे. वयाच्या २० व्या वर्षापर्यंत १० हजार तास एखाद्या गोष्टीवर खर्च केले तर जीनियस होता येतं आणि इतके तास सर्जनशीलततेने काम केलं म्हणूनच बिल गेट्स जीनियस बनले. बुद्धिमत्ता, सराव आणि अथक परिश्रमांच्या जोरावर बिल गेट्स जीनियस बनले. जगाच्या प्रत्येक टेबलवर माझा कॉम्प्युटर ठेवेन हे स्वप्न गेट्स यांनी बाळगलं आणि त्याच्या पूर्ततेपर्यंत ते आले.

१० हजार तास कॉम्प्युटर कामं करणं हे MS-CIT कोर्स करणार्‍यांना शक्य आहे. आपण जे सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग यामध्ये शिकतो त्याचा वापर उपयुक्त कामं करण्यासाठी केला तर सहज अर्वाजुन होतं. स्वतःच्या पायावर उभं राहता येतं आणि सरवामुळे तज्ज्ञता येते. वर्ड प्रोसेसर तुम्ही शिकतात. तर लेटरहेड्स पत्रिका, व्हिजिटींग कार्ड्स, बायोडाटा, बिझनेस कार्ड्स, सर्टिफिकेट्स बनवून देऊन खरे पैसे निश्चित कमविता येतात. आणि त्या पैशातून संगणकाचा सराव करून अधिकाधिक तज्ज्ञता आत्मसात केली तर जीनियस होणं सहज शक्य होईल. अनेक कामं तुम्हाला एक्सेलमधूनही करता येतात. ताळेबंद, पर्चेस ऑर्ड्स, सर्वेक्षण अहवाल अशा गोष्टी बनवून देता येतील. MS-CIT सारखा कोर्स खरं म्हणजे जीनियस होण्याचा मार्गच आहे. MS-CIT करून १० हजार तास सक्षमपणे कॉम्प्युटर आपण व्यतित केले पाहिजेत. थोड्या थोड्या कुशलतेवर समाधान मानता कामा नये. सुपर परफॉर्मर्स बनणारे सर्वसामान्य जिथे थांबतात तेथे जीनियस पुढे जातात. आज अनेक आधुनिक साधनं उपलब्ध आहेत. योग्य दिशेने अथक परिश्रम केल्यास यश निश्चित तुमचे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....