मराठी उखाने




 
 MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा...
लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...!
............................................................
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट आहेत बुश
सुंदर मुलगी दिसताच **** राव एकदम खुष !!
..............................................................
***रावांची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
............................................................
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
**** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
.............................................................



सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून!!


पावाबरोबर खाल्ले अमूल बटर...
***चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर


एक होती चिऊ एक होती काऊ...
***रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...


कोल्हापुरी लोकांचा आवडता उखाणा ...
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
*** चं नाव घ्यायचा मला नाही आळस


कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
***** नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र


ईवले ईवले ह्रीण, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले की काय....... !!


चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ


एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ


अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ


चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे


बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या


लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास


आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार


कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
........शी लग्न करून ......जन्माचा धुपला


कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क


रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल


समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू


लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट !


बदामाचा केला हलवा त्यात काजू टाकले किसुन.
*****राव बिड्या पितात संडासात बसून


आजकाल च्या लग्न ठरलेल्या मुलीसाठी..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन..
आणि ....... रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून.



आंब्याच गाणं..

हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड.......५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान.......६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13
Thursday, March 24, 2011



जुने दिवस

जुन्या अल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात ....
आता मोठे झाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंडे रोज रोज भेटतात ???....


कधीतरी मार्च मधे चीनू च्या वाढदिवसाला
भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नोहेम्बर मध्ये
मीनू च्या वाढदिवसा पर्यन्त काढले जायचे
हल्ली मात्र रोज फोटो काढतो ......
पण तरीही बाबांनी पुरवून पुरवून वापरलेले रोल मधले फोटो
जास्ती प्रिय का वाटतात ???


त्या वेळेला बाबांनी महिन्यातून एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वताच्या पैशाने रोज खाल्ले तरी बेचवच का वाटतात ???...
पाकीटातल्या ५००/- रुप्यांपेक्षा
मागुन घेतलेले २० रूपये नेहमी जास्त मौल्यवान का वाटतात ???...


बाबांच्या खिशात हळूच सरकवलेले २०० रूपये
जेव्हा त्यांना अचानक सापडतात ..
तेव्हा त्यांच्या चेहरयावरचा आनंद पाहून
आश्रू डोळ्यात दाटतात


१०-१२ वर्षापूर्वी ज्या बहिणीशी खुप जुने वैर असल्यासारखे भांडायचो ...
आज त्याच बहिणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात ???..
आज सार काही आहे तरीही ,
ते जुने दिवस आठवले की,का मनात खोल
घर करून जातात ...
असे हे प्रश्न फक्त मलाच की तुम्हाला सुद्धा पडतात ??????....



आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते


तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते



" माझे मन "

मन मोकडे पनाने वावाराले तर म्हणतात,
पोरीला घरबंधन नाही!
शांत धीरगंभीर पाने वावाराली की म्हणतात,
आमोरासमोर बोलण्याची हिम्मत नाही !!


लग्न लवकर केले असेल तर म्हणतात,
एखादे लफड़े लापवायाचे असेल !!!
लग्न उशिरा होत असेल तर म्हणतात,
मुलिताच काहीतरी खोट आहे.


खुपच शिकलेली असेल तर म्हणतात,
डोक्यावर मिरे वाटेल !
शिक्षण कमी घेतले असेल तर म्हणतात,
मुलगी मागास्लेली असेल!


मित्र मंडली असेल तर म्हणतात,
मुलगी वाया गेलेली असेल.
मित्र मंडली कमी असेल तर म्हणतात,
मुलगी एकलकोंदी असेल.


या आशा दोन्ही बाजूने लोक बोलातात तर ,
माणसाने या जगात जगावे तरी कसे
व् निरपराध असतान्हा सुधा मरावे तरी कसे .



प्रेम तुझं खरं असेल तर..

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..


भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..


विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..


आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..


आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..


पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..


शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.


ही कविता म्हणजे, प्रेमात हताश, निराश झालेल्या एका प्रेमवीराला, त्याच्या
मित्रा कडून दिलेला सल्ला, नवी उमेध, नवी चेतना…….



नकळत कहितरि घडावे...........!

हुल्लड बालपन खेळातच रमाव
परिस॑गे जादुच्या दुनियेत शिराव
सदा मनि एकच विचार.....वाटते....
अदभुत कहितरि घडाव नकळ्त आज.


अभ्यासाचा बोजा तोच अवघड ग्रुह्पाठ
रोज रोज लिहुनि थकावे मग दुखते पाठ
कसि सुटि मिळेल शाळेला हा एकच विचार
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.


मग तारुन्यपन येत मिसरुड फुट्त ओठावर
वहि बोटावरुन फिरवताना मुलिकडे बघाव रोज
तिच्या होकारासाठि सतत ठरलेला पाठलाग
नैतिकतेचे भाषण देउन प्राध्यापक मग थकतात
सार कहि निरथक चा॑गल राहत बाजुला
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मला.


पदविधर होताच हि॑डावे नोकरिसाठि दाहिदिशा
सततचा नकार एकुनि जिव होइ वेडापिसा
काय शिकलो? किति शिकलो? याच गणित तेव्हा कराव
वेळेच महत्त्व किति असत याच भान तेव्हा उमजुन याव
अन चाहुल लागावि मनि दुखि होउनि
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज मनि.


दिवसामागुन दिवस जातात वय उलटु लागत
जबाबदारिच ओझ जड होतच राहत
नकळ्त पानावतात डोळे तिचा चेहरा उभा राह्तो
कुठे असेल ति मन भुतकाळात डोकाउ लागत
एक अत्रुप्त इछ्या तिच्या सोबत जगन्याचि
गुदमरुन टाकते या जातिच्या पगड्यात
क्षणात ह्रुदय पिळवटुन निघत...
नकळ्त घडावे कहितरि वाट्ते आज.


बापाच नात मग जपाव लागत
त्या हळ्व्या क्षणा॑नि मन चिम्भ भिजुन जात
आपल बालपन आठ्वु लागत आपल्या मुलात तेव्हा
असेच होतो ना आपण हट्टि त्या वेळेला
सार कस उन्म्ळुन येत एकापाठोपठ एक
अन वाट्ते नकळत कहितरि घडावे आज.


मग अ॑ग थकत सार काहि थकत क्षिण होउन जात शरिर
नजरेसमोर दिसु लागत म्रुत्युच भयान प्रतिबिम्ब
हाति येते काठि तोच एकमेव आधार
सार काहि सुन सुन मावळत जाणारि स॑न्द्याकाळ
उशाकाल होइल का?.....चक्र असे हे नशिबाचे
तरिहि या स॑पलेल्या वळ्णावर कुठेतरि उगाचच का वाट्ते
नकळत कहितरि घडावे...........!
नकळत कहितरि घडावे ..........!



आपलंही कुणी असावं....

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...


छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं



''फक्त मैत्रिण''

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?
आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?


तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!
माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?


''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!



फक्त हवे

हे हवे
ते हवे
जे ते हवेच हवे !
परवडण्याची चिंता नको
बँक बॅलन्स तपासायला नको
नको हा शब्दच नको
सारे काही फक्त हवे !


विकत हवे
फुकट हवे
कर्जाऊ नाहीतर
हप्त्यांनी हवे !
असे सगळे मिळवायला
अन गलेलठ्ठ पगार हवे !
मिळवायला ते अन जाण्यासाठी
वाहन गारेगार हवे !


लक्झुरियस फ्लॅट हवे ..
सुपर्-फ्लॅट टी व्ही वर चमचम करते
रुपडे हवे !
रात्री कुशीत
आसक्तीने माखलेले एक चामडे हवे !


शेअर्स हवे डिबेन्चर्स हवे
मॉल हवे
मोबाईल चे कॉल हवे !
देव दर्शनात पुढचे स्थान हवे ..
सौना मध्ये स्नान हवे !


एकन्दरीत जीवनातले एकूण एक हवेच हवे !
भोग हवे .. संभोग हवे !
दुसर्‍याला लाभते, मिळते
किंवा नुसते वाटते हवे
ते ते सारे मिळायलाच हवे !
दुसर्‍याकडचे सारे हवे !
दुसर्‍याकडचे नसलेलेही हवे !


असेच जगायला हवे !
आणि जायची वेळ येता,
मोठ्ठे मोठ्ठे रोग हवे !
बड्या एखाद्या हॉस्पिटलाचे अंथरूण ऊबदार हवे !
नाही तर .. अलीशान वृद्धाश्रमाचे पांघरूण हवे !


ज्याला त्याला हेच हवे !
हार्ट चे दुखणे हवे
साखरेचे खुपणे हवे
ब्लड्-प्रेशर चे टुमणे तरी हवे !
मोठेपणाचे मिरवायला ..
एक तरी बिरूद हवे !


त्याला हवे मग मलाही हवे !
एकासारखे दुसरे हवे !
कारण मला हवे तेच त्याला असणार हवे !
शक्यतो त्याच्या आधी हवे ..
नाहीच तर त्याच्या नंतर हवे !


नको इतके - हवे हवे !
हे हवे
ते हवे
जे ते हवे हवे !
जे ते हवेच हवे !



मैत्री

मैत्री एक गांव असत
आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत
हे नाव असत आनंदाच ...........
नाव असत दिलेल्या धीराच,
मदतीच्या हाताच ..........


आयुष्यातल्या आनंदघनाच
मैत्रिण हे नाव असत
वरवर साध वाटल
तरी काळजाचा ठाव असत......



विसरु नकोस तू मला

विसरु नकोस तू मला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नहीं जमल फुलायाला
हरकत नाही


कोमेजुन मात्र जावू नकोस
माझ्या प्रीत फुला
इतकेच सांगणे आहे तुला
विसरु नकोस तू मला
नाही जमणार परत कधी भेटायला
नाही जमणार एकमेकांना पहायला
हरकत नाही




इतकेच सांगणे आहे तुला
टालू नकोस तू मला
शेवटचच आहे हे भेटण
घडणारच आहे ह्रुदयाचे
तीळ तीळ तुटण
नियतीनेच ठरविले आहे
आपल्याला असे लुटण


इतकेच सांगणे आहे तुला
जपुन ठेव आठवणीना
नाही नियमितपणे त्यात
रमता आले हरक़त नाही
पण विसरु नकोस तू मला
Wednesday, March 23, 2011



पुन्हा एकदा भेटायचय

कितीही वेळा तू भेटलीस,
तरी मनी एक आस असायची,
शेजारी माज्या बसलीस की
अंगात एक विज कडकडायाची.


मी भेटायला येणार म्हणुन,
नट्टापट्टा तू तासभर करायचीस,
भेटल्यावर कौतुक नाही केल म्हणुन,
किती हक्काने भांडायाचिस.


भेटायला तू येणार म्हणुन,
बघता बघता तिन वर्ष लोटले,
तुझ्यासाठी जपलेले शब्द,
मनातल्या मनातच दाटले.


दिलासा देण्यासाठी तरी,
तू पुन्हा एकदा भेटणार ना?
नाही करणार तक्रार कधीही,
मग तर सोडून नाही जाणार ना?


स्पर्शाच्या त्या तुज्या भाषेला,
पुन्हा एकदा तरी अनुभवयचय,
माज्याशी हक्काने भांडताना,
पुन्हा एकदा तरी बघायचय.




भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापूर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजूनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठं संपतं आणि कुठं गांधीनगर सुरु होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथं दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमध्ये असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण. गाडीनं नर्मदेचा पाण्यानं भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमध्ये पोहोचल्याची पक्की खून पटते. मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारं पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेलं असेल ज्यानं गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचं शहर. पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमध्येच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादलाच आलेलं बरं. २० किलोमीटर पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरं. सिकंदराबाद-हैदराबाद किंवा पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.


जसे अहमदाबादमध्ये कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमध्येही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तीन एक महिन्यांपासून माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते. होत राहतील आमचं एक घर सध्या गांधीनगरला आहे.


गांधीनगरला होणाऱ्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा कुठला बदल झाला? मला वाटतं नरेंद्र मोदींबाबत माझं मत पूर्णपणे बदललं. मत बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कुणी कितीही सांगितलं तरी इतरांच्या सांगण्यावरून माझं अमुक अमुक म्हणून मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फुटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.


मोदींबात पाच सहा वर्षापासून उलटसुलट बरंच काही ऐकून झालंय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वानं भारावलोय.


गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?
गुजरात हे उद्योगी लोकांचं राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदी फक्त व्यापाऱ्यांचंच हित सांभाळतात का? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपूर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथं मोदींच्या ‘स्वागतम’ची चर्चा सुरु होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.


स्वागतमची आय़डिया अशी. समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका ‘स्वागतम’मध्ये जायचं. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानंही काम नाही केलं तर ‘जिल्हा स्वागतम’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं. जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं. मोदी ‘स्वागतम’मध्ये आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात. संबंधीत अधिकाऱ्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.


तक्रारदाराला मोदी बाजूच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालं? अधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात..समजा चूक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पूर्तता केलेली नसेल तर त्याला तसं सांगतात. पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधीत पहिल्या अधिकाऱ्याकडे पाठवतात. तालुका स्वागतममध्ये हे विशेष.
स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे. एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे? अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईना? त्याची तारांबळ उडाली? मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाही? अधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..मग पाडली का गेली नाही? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात. अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा... मोदींचा झटपट निर्णय.


या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातून अधिकाऱ्यांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही. आपल्याकडे कधी हे होईल? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होतं. गुजरातला वाचतं करायचंय तर काय करावं? मोदींनी सांगितलं ‘वाँच्छे गुजरात’. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचं. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरुवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यानंतर मंत्री गेले, अख्ख मंत्रीमंडळ गेलं म्हणजे अधिकारीही गेलेच, जावंच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं गुजरातमध्ये वाँछे गुजरातची पारायणं लागली. अख्खं गुजरात वाचत राहिलं. एका कल्पनेनं अख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय?


पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ‘गुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन. प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही. गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं. समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं. पुस्तक, गणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.


लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं? काय करावं? मोदींनी सांगितलं ‘खेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं. कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोका, स्थानिक नेते, अधिकाऱ्यांनी खेळायचं. खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथंही सगळं अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं. खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झाली, असलेली सुधारली, नवीन खेळाडू मिळाले. अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.


आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथंच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचं मंदीर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदीराच्या पायाउभारणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलवलं. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्वीकारलं आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलवलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही. मोदींच्या एका कल्पनेनं दूर गावात असलेला गावकरी आणि समिटमध्ये बसून चर्चा करणारा उद्योगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकऱ्याच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय.


गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडं. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात एकदाही त्याचा फील आला नाही. गुजरातमध्ये त्याचा विसर पडत नाही. मी इथं एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.


पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचं की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचं निश्चित केलंय. पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पाहायचंय जे सध्या ते अशक्य वाटतं



मन माझे तुझ्याकडे आहे

मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.


प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.



क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.



स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.



जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.



जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.



नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!



बालपण

स्वप्नांच्या दुनियेन
आभाळ व्यापलेलं
क्षितिजा पलीकडे
मन आपले पोहोचलेलं
फुलासारखं फुलताना
बालपण हरवत नाही..
काटे असले सोबत तरी
साल कधी बोचत नाही
घेऊ भरारी पाखरा संगे
साऱ्या विश्वाला गवसणी देऊ
उद्धीष्टांच्या पूर्तीने फिरुनी घरट्यात येऊ



वेड मला लाउनी तू

वेड मला लाउनी तू शहाणी झालीस
प्रेम माझ्यावर करून तू का दुस-याची झालीस


नव्हतंच करायचे प्रेम शेवटपर्यंत
तर का सुरुवात केलीस .........


जायचे होते सोडून मला तर का माझ्या जीवनात आलीस ?


चूक झाली माझी .........


चूक झाली माझी कि मी तुझ्यावर प्रेम केलं....


सुख नाही तर नाही पण हे दु:ख तू मला का दिलेस ......
नको ढाळूस अश्रू आता ................


नको ढाळूस अश्रू आता
उत्तर दे माझ्या प्रश्नांना ..........


बंद कर हे रडु आता नाही मी फसणार तुझ्या या खोट्या अश्रूंना
आज राहशील गप्पं..


आज राहशील गप्पं
तुझ्या कडे उत्तर नसताना


उद्या दिसशील तू मला माझ्यावर हसताना



कुणाला जाणीव ही नसते

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,


कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,


किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,


आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ....



ओढणीचा तो तुकडा

ओढणीचा तो तुकडा अजूनही तसाच आहे ,
ठिपका तो रक्ताचा अजूनही तसाच आहे.
दिवस बरेच लोटले, तरी गंध तोच आहे.
जखमा भरून आल्या खपल्याही निघून गेल्या,
परी,भाळी स्पर्श तुझा तो अजूनही तसाच आहे !!


नव्हती ओळख आपली,नव्हते ठाऊक काही
कुण्या गावाची तू अन् कुण्या गावाचा मी !
काळीज एकच घरटे ! दोघांच्याही कडचे,
एकाचवेळी दोघांनी दोन्हीकडे राहण्याचे!


दोघांचाही पहिला पाऊस एकच आहे
हिरव्या रानावारती तो एकटाच बरसत आहे !!
मोकळ्या केसांत तुझ्या श्वास गुरफटत आहे,
भिजलेल्या तुला पाहता जवळ मी घेतो आहे ,
ओल्या ओठांमागे भीती दडली आहे !


कवेत घेता तुला जाग ही येते आहे,
स्वप्नात माझ्या सारे,
हातात फक्त ओढणी आहे !!!



देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे…

देते कोण-चिमुकल्या चोचीमध्ये आभाळांचे गाणे…


मातीतल्या कणसाला मोतियांचे दाणे…
उगवत्या उन्हाला ह्या सोनसळी अंग…
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग…
देते कोण..देते कोण.. देते कोण देते ??


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…


सुर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा…
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा…. (देते कोण… देते कोण….)
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख…
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक…
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…


नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा…
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा…(देते कोण… देते कोण…. )
करावंदाला चीक आणि अळूला ह्या खाज…
कोणी नाही बघे तरी लाजाळुला लाज…
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…


मुठभर जीव..आणि हातभर तान…
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान… (देते कोण… देते कोण…. )
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा…
पावसाच्या अगोदर ओली होते हवा…
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…


भिजे माती आणि उरे अत्तर हवेत…
छोट्या छोट्या बियांतून लपे सारी शेतं…
नाजुकश्या गुलाबाच्या भोवतीने काटे…
सरळश्या खोडावर फुटे दहा फाटे..
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…


आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी…
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी…
भुईतून येतो तरी नितळ हा झरा…
चिखलात उगवतो तांदुळ पांढरा…
देते कोण.. देते कोण.. देते कोण देते?? ॥


रुम… रुम ता रा रा… रुम
रुम…ता रा रा…. रुम
रुम ता रा रा… रुम तारा…



बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भजी खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"


बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.


बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडी भजी !!



प्रेम म्हणजे काय?

आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो? आपण कधी त्याचा विचार करतो का? बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.


एकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,
सांग बरं तुला मी का आवडते? तू माझ्यावर प्रेम का करतो?
अगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.


अरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते? तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे?


प्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.
सिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत?


ठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.
मला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.
तुझा आवाज सुंदर आहे.
तू अतिशय काळजी घेणारी आहेस.
तू अतिशय प्रेमळ आहेस
तू विचारी आहेस.
तुझे हास्य मोहक आहे.
तूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.


प्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.


प्रिये,
तुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.
पण आता तू बोलू शकतेस का?
नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.


तुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.


तुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.
पण आतातू हसू शकतेस? तुझे विभ्रम दाखवू शकतेस? नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.
प्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.


खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते?
नाही. नक्कीच नाही. म्हणूनच....
मी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.


थोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.
खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.
बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.


आणि शेवटी....
ज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.



प्रेमात पडले कि

प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात
खर सांगायचं तर थोडेसे वेड्या सारखेच वागतात


यात काही चुकीचे नाही , साहजिकच असत सारे
एकदा प्रेमात पडले कि उघडू लागतात मनाची दारे ..


मनातल्या भावना अलगद पण कागदावरती उठतात
डोळ्यांतली आसवे सुद्धा शब्द होऊनी पसरतात ..


रात्रन -रात्र दिवस फक्त तिचे विचार मनात घोळू लागतात
नेमक्या विसरायच्या गोष्टी मात्र तेव्हाच आठवू लागतात ..


डोळ्याला डोळा लागत नाही ,रात्र एकाकी खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द कवितेतून बाहेर फुटू लागतात ..


गोड गोड स्वप्न पाहुनी रात्र - रात्र जागत राहतात
तिच्या संमती शिवाय सगळ काही ,तेव्हाच ठरवून जातात ..


निरस अशा एकांत ठिकाणी, फक्त तिच्यामुळेच बसू लागतात
कितीही पाय दुखत असले तरी ते आपोआप तिच्यामागे वळतात ..


इकडचे तिकडचे शब्द कोठून कसे तरी एकत्र आणतात
पण प्रेमात पडल्यावर तुटकी फुटकी का होऊ नये
सारेच जन कविता करायला लागतात ..


चांगलेच ठाऊक आहे ती आपल्याला मिळणार नाही
तरी पण उगाचच मनाशी हट्ट करतात ..


एकेरी ,दुहेरी का चारोळी का होईना
पण हे मात्र खरे आहे ...,



प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात
प्रेमात पडले कि सारेच जन कविता करायला लागतात


--



स्वप्नातला गाव....

स्वप्नातला गाव....


स्वप्नातला गाव माझा
आज स्वप्न बनुन गेला
विसरत गेलो, विसरत चाललो
विसरुन गेलो मी त्याला...
स्वप्नांहुनही किती सुंदर
ह्या क्रुत्रिम शहरांपेक्षा
निसर्ग तेथे वास्तव्याला होता
हिरवी हिरवी गार पालवी
नदी नाल्यांची भांडणं होती
मुले ती तेथे झुला झुलवी
सकाळी सकळी मंदिरात
घंटा वाजत जायची
गाव माझा जागत होता
मंडळी भजन गायची
ते रस्ते करड्या मातीचे
खड्ड्यांचे कुठे दगडांचे
पण पावलांना आपले वाटे
मायेच्या पाऊलवाटांचे....
लोकांच्या जगण्यामध्ये
एक वेगळीच तर्हा होती
फाटके होते खिसे जरी
जगण्याची दौलत होती
त्याच माझ्या गावाला
सोडुन आलो कधीचा
नौकरीसाठी,पैशासाठी
म्हटलं कधी कधी चक्कर मारु
एकदिवस आपल्या गावाकडे
किती वर्ष निघुन गेले
पण तो दिवस आला नाही
गाव माझा बोलावतो आहे
मजला कधीचा...
तो उनाड रस्ता तसाच आहे
माझ्या बालपणीचा...
काहिच नाही बदललं अजुनही तेथे
मी मात्र बदललो...
काल स्वत:मध्ये गुंफलो होतो
आज संसारी गुंफलेलो...
माहित नाही आज तेथे
कसा काय हाल असेल...
स्वप्नांमधला गाव माझा
कदाचीत स्वनांतच दिसेल.....



निर्व्याज मैत्र हरवलं होतं

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं


घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं


गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं


पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं


कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….



चव आयुष्याची...

एकदा मला आकाशात एक परी दिसली
हसली बघून माझ्याकड़े
म्हणते कशी मला.....
माग काय हव ते
मी म्हणाले...
सुन्दर आयुष्य दे मला
जिथे असेल फ़क्त सुख
नसेल कोणतही दुःख
ती म्हणाली देते
पण परत तक्रार नाही करयाची....
अणि झाल ही तसच
सुख सुख अणि नुसत सुख
ना घरात जागा ना मनात...
सुख कुठेच मावेना
शेवटी अश्रु आले डोळ्यात
माझ रडू ऐकून
परी आली धावून
म्हणते कशी सुखात का रडतेस?
तिला काय सांगायाच तेच कलेना
सुखच दुखते आपल्याला तेच उमगेना..
तीला म्हणले तुझ सुख घे
थोडस का होईना मला दुःख दे
दुख शिवाय काय किमत सुखाची....
कडू अणि गोड दोन्ही चव चाखु देना आयुष्याची



** होळी रे होळी **

आली रे आली,होळी आली..
चला,आज पेटवुया होळी..
नैराश्याची बांधून मोळी..


टाकुन द्या त्यात आयुष्याच्या..
अडचणी,चिंता,मनाचा गुंता..
करु होम दु:ख,अनारोग्याचा..


नवयुग होळीचा संदेश नवा..
झाडे लावा,झाडे जगवा..
करुया अग्निदेवतेची पुजा..
होळी..केरकचरा,गोव-यांनी सजवा..


दाखवुन नैवद्य पुरणपोळीचा..
मारुया हाळि..
होळी रे होळी, पुरणाची पोळी..
करु आनंदाने साजरी होळी..
Friday, March 18, 2011



बरे आहे ना

बरे आहे ना पक्षांची
स्मृती खूप कमी असते
त्यांची पिल्ले नाही येत
घरट्यात परतून...
पुन्हा पुन्हा बांधावे घरटे
पुन्हा नवे जीव
घेऊन भराऱ्या जाणार
परत परत उडून ...
माणसाचे मात्र तसं नसते ना
एकाच एक आयुष्य नसतं
अनेक मने त्यांची गुंतागुंत
जीव गुंतण्याचा जीवघेणा खेळ...
पक्षांना नाही आठवत
त्यांचे उजाडलेले घरटे
पण माणसांची मने मात्र
रहातात त्यांच्यात घरात कुचांबून....
सगळी गुंतवणूक तनामनाची
सांभाळताना कसरत करायची
एक धागा ओढावा तर उमटते नक्षी
एक ओढावा तर धस लागून फाटते काहीतरी.....



मिळेल का अशी प्रियसी???????

कधी कधी वाटत
माझं ही कुणी असाव
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव


पावसात एकत्र फिराव
नदीकाठी बसाव
तिच्या सहवासात
स्वताला विसराव


सुख दुखात तिच्या
अस सामील व्हाव
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव


तिच्यावर इतक प्रेम कराव
की जगातल सगळ सुख तिला द्याव
तिच्या डोळ्यात आपल
प्रेमाच जग पहाव


मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिराव...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत रहाव...!!!!



मला मीच आवडत नाही.

आता माझ्या शब्दात,


मला मीच सापडत नाही.


तिचे काय सांगू,


आता मला मीच आवडत नाही.




हस्तो कधी कधी मी,


अश्रू काय हे जाणण्यासाठी,


शब्द अडतात ओठांवारी,


फक्त माझ्या पापण्यांसाठी.



कस सांगू शब्दच नाही,


माझ मन ही जळत असत.


कोरड्या पापण्या असतात,


पान मात्र गळत असत.




माझ्या भावनांचा वार,


सदा त्या पानांवर होत असतो,


जसा जीवनाचा सत्कार ,


त्या चितेवरी होत असतो.




तू तुझीच राहा आता,


मी माझा किनारा हरवलाय.


जगण्याचा भास माझ्यात,


तू दिलेल्या मृत्यूनेच जागवलाय.



स्वतःसाठी पण जगशील !!!

ढगाळल्यासारखा राहू नको
आत्ता तरी बरसाना!
मनात तुझ्या दुःख नको ,
सखा समजून सांग ना!


अरे!फेकून दे साठवलेलं दुःख ,
विष म्हणून पितोस तू
पण, अश्रुंवाटे बाहेर येतच ना!
अरे! नको दाबू भावनांना ,
जरा अलग होऊदे ओठांना ,
बाहेर पडूदे शब्दांना,
मिळालीच जर,तर
मिळेल मोकळी वाट भावनांना !


गुदमरल्यासारखा जगतोस तु
मनातच कोंडतोस विचारांना
स्वतःलाही घुसमटत आहेस आणि स्वाभिमानही !


लक्षात ठेव, सिगारेटनं दुःख कमी होत असतं,
तर देवानं सिगारेट नावाची चीज
या जगात बनूच दिली नसती .
अरे तोच तर ही परीक्षा पाहतोय आपली.
.
अरे! फार नै,फार नै
पण, व्हिस्कीच्या एका पेग सारख्या तरी
शेअर कर तुझ्या फिलिंग्ज माझ्याबरोबर.
मग तो प्याला तू दुःख पचवण्यासाठी नाही
तर आनंदासाठी पिशील .


मग बघ तू बरसशील अधाशासारखा बरसशील ,
मन मोकळा होऊन बरसशील
तुझं बरसणं बघायला त्या काळ्या ढगात
तो सहस्र रश्मीही बाहेर येईल !


तळपणारा तोही तुझ्या बरसण्यानं शांत होईल!
मग तो तुला सात रंगांचं आयुष्य बहाल करेल !!
मग तू याच जन्मात प्रत्येकवेळी नवं आयुष्य अनुभवशील!!!
वेगळं सुख अन् समाधानही !
पण, खरखुरं !तू खरा सुखी असशील अन् समाधानीही
कधी तांबडा कधी पिवळा
कधी हिरवा तर कधी गुलाबी सुद्धा !!!


जगशील आनंदात जगशील स्वतःसाठी पण जगशील !!!
--



अंगणातील पारिजातावर

अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे
त्या घरट्या खाली सांडते
रोज आभाळ चांदण्यांचे


वेचून त्या चांदण्या
फुले माळ केसात लांब तुझ्या
चांदणे पसरेल निशेवर
भिनेल रुधीरात गंध माझ्या


सांज रूप घेउन यावस
मग विझतील रवीकिरणे म्लान
सांजेच्या उंबरठ्यावर निशा
घेत असेल चांदण्यांचे स्नान


असेल हात तुझा हातात
सर्वदूर चांदण्यांचे आभाळ
होइल चांदणेही रुपेरी
पाहून रंग तुझा गव्हाळ


मग क्षण येइल तो
हळूवार सोडवून घेशील हात
मग कित्येक रात्री जागवणारी
हासत निरोप घेइल रात. . .



आयुष्यात एक तरी bf असावा...........

आयुष्यात एक तरी bf असावा...........
Pro करण्या आधी एक चांगला मित्र..............
आणि gf झाल्यावरही एक चांगला bf असणारा..........
एक तरी bf आसावा............


फोनवर तासनतास बोलणारा..........
बोलताना मधेच लाडात येणारा........
तर लाडात येउन किस मागणारा.........
एक तरी bf असावा............




कधी कडाडून भांडणारा..........
पण नंतर तेवढ्याच प्रेमाने sorry म्हणून माफ़ी मागणारा .............
आणि आपल्याला chocolates देऊन मनवनारा
एक तरी bf असावा...........



त्याच्याशी कितीही रागाने बोललो तरी प्रेमाने बोलणारा.........
आपल्या चुकांना साम्भालुन घेणारा..........
वेळीच ओरडणारा ..........
एक तरी bf असावा...........


पण कधी स्वतःच विनाकारण रागाने फुगणारा...........
आपल्याला त्रास देणारा............
आपल्याला रडवणारा..........
पण आपले अश्रू पुसणारा.............
एक तरी bf असावा.............
आपल्या जिवाला स्वतःपेक्षा जास्त जपनारा..........
आपल्या जिवनातीलस्वतःच स्थान जाणणारा.............
आपल्या दू:खाला दू:ख आणि सुखाला सुख मानणारा.......
एक तरी bf असावा...........



कधी आपल्या सोबत मस्ती करणारा.........
कधी आपले लाड पुरवनारा............
कधी डोळयात कचरा गेला तर प्रेमाने फुंकर मारणारा...........
एक तरी bf असावा...........



आपल्या बर्थडेला सर्वात आधी विश करणारा............
नंतर surprise gift देणारा...........
आपल्याला आनंदी पाहु बघणारा...........
एक तरी bf असावा..............


कधी आपल्या friends सोबत फिरायला येणारा
त्यांचा सोबत मिळून आपली मस्करी करणारा...........
आपले गालगुच्चे घेणारा............
एक तरी bf असावा...........


आई ओरडल्यावर आपली समजूत घालणारा...........
तर कधी hug देऊन मनाला relax करणारा...........
एक तरी bf असावा..........



आपल्या सोबत movie ला येणारा.........
जाताना हातात हात घालणारा...........
आणि मधुनच तोच हात खांद्यावर टाकणारा..........
एक तरी bf असावा..............


पावसाळ्यात पावसाचा आनंद लुटणारा................
दोघानी एकाच छत्रीतून जाण्याचा हट्ट धरणारा............
चालताना मधेच पाणी उडवणारा............
अणि नंतर i love you म्हणणारा.............
एक तरी bf असावा...................


आपला future कस असाव हे imagine करणारा...............
पण आपल्याला खोट स्वप्न न दाखवणारा........
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा ............
एक तरी bf असावा......................



कधीतरी

कधीतरी
कधीतरी जडावले पापण्यांचे भार
अवचित उगडले आठवांचे दार
दूर दूर गेले मन शोधीत उंबरा
कधी क्षितिजाशी कधी आकाशाच्या पार


झाल्या गेल्या चुका काही, काही देणे घेणे
हसताना बंध सारे झुगारून देणे
अनुमान कधी तिच्या होकाराचे घेता
नाजरेला नजरेचे घडायाचे वार


दिस मास गेले तसे झाले विपरीत
वादळात गेले सारे घरटे बुडीत
मागे उरल्या केवळ खुणा पुसलेल्या
काही नाती तुटलेली, वेदना अपार



प्रेम म्हणजे काय

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही...


का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...


मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही...


रात्री छान च असतात ... तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...


प्रेम कधी सफल होते तर कधी नाही... ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत...


प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही ...
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही...



तुटत चाललीये आपली मैत्री

तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध


एकमेकांपासून विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या सागराच्या लाटा
प्राणवायू नसलेले श्वास आणि
पाण्याच्या शोधापासून दूर चाललेली वटवृक्षाची मुळं
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध


कधी हक्काचा वाटणारा आवाज,कधीच आसमंतात विरून गेलाय
आणि ते रागावण्यातल प्रेम ;छे ! प्रेम नव्हतंच कदाचित
चावून संपवलेली एखादी गोड कॅडबरी…. जशी आपली मैत्री
आणि चवीचा गंधही नसलेलं कॅडबरीचं कव्हर ...जसा मी
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध


दोघांनी मिळून उडवलेला ती पतंग वर वर आणि वरच गेला
गुरुत्वाकर्षणाविरुद्ध !!
पौर्णिमेलाही काळभोर असणारं आभाळ !! का ?
तर आपल्या खोट्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये म्हणून !
माझ्या अतिप्रीत किरणांना
तुझ्यापाशी अडवणारा ओझोनचा थर
घट्ट आणि घट्टच होत चाललाय
तुटत चाललीये आपली मैत्री
निसर्गाच्या प्रत्येक नियमाविरुद्ध



देवा तू चुकलास....

देवा तू चुकलास....


माणसाला बनवताना मन का दिलेस?


सगळं साठवण्याची कुवत का दिलीस?


टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही


मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास


आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात...


न कळते तर बरं झालं असतं....


आता केलीस ती चूक केलीस


पुन्हा मात्र चुकू नकोस.....


माणसासारखा बनू नकोस....


माणूस काय...... मुखवटाधारी


काय खरे काय खोटे कैसे समजावे म्या पामरी


मला वाटत तुला सुद्धा प्रश्न पडत असेल कधीतरी ,


की ज्याला निर्मिला मी ,तो मानव आहे का 'तोच ' तरी?


पुढच्या वेळेला सृष्टी निर्मिताना हे सार लक्षात ठेव....


काहीच innovative नाही जमल तर मन , भावना , हे "parts " manufacture करताना असले फौल्ट्स बाजुला ठेव....


एका चेहर्‍यावर दुसरा चेहरा.....हे सगळ मला नवीनच होत


जेव्हा कळल तेव्हा "नात्या"वर विश्वास ठेवण कठीण होत


सरडा सुद्धा इतक्या चटचट रंग नसेल बदलत


जितका सत्वर तुझा हा मुखवटाधारी असतो बदलत.....


विश्वासावरचा विश्वास उडून गेलाय


तितक्यात कोणीतरी बोलल, तो ना ,कधीचाच मरुन गेलाय.....


प्रत्येक नात्यातला स्वार्थ मज भासे


आणि म्हणून म्हणते....
देवा तु चुकलास......


अगदी काल - परवा पर्यंत 'तो' कित्ती गोड वागत होता....


आणि आज....
आज सगळे 'संदर्भ ' उलटे भासतात....


जीवाला जीव देईन जिथे तुझा जीव घेईन बनत......


काय उरला रे " त्या " माया-ममतेला अर्थ?


हे अस सगळ आता सोसवत नाही


दुसरा भोगतो ते ही पहावत नाही...


आणि म्हणून म्हणते....
देवा तु चुकलास......



संध्याकाळी

अशाच एखाद्या संध्याकाळी,
पाखरं घराकडं परतत असतील...
सुर्यही लगबगीत असेल निघायच्या...
पानाफ़ुलांनी कधीच अंग टाकलं असेल...
चंद्राची कोर डोकावत असेल हळूच अता...
सावलीही दूर होत असेल तुझ्यापासून...
....
........
मी जाणतो,
तू मात्र या सगळ्यांपासून दूर उभी असशील
आजही त्याच पाऊलवाटेवर !!!



मी या जगांत भरल्या..

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?


राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?


नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?


सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?


धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?


भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?


सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?


ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे



कधी मनाशी


कधी मनाशी सुसाट वारे चिकार येते,
कधी स्वत:ची चिडूनिया कीव फार येते..!

चुकार एकान्त फार येतो छळावयाला
म्हणून ओसाड आठवांनाच धार येते !

मनात आकारतात मोठी मधाळ स्वप्ने..
परन्तु जागेपणी नको तीच हार येते !

नव्या विटीची नवीन खेळी करून पाहू..
असे म्हणालो तरी जुनी का पुकार येते ?

विरून जावेत भूतकालीन पाश सारे..
परी सयीला तुझ्या नवी का बहार येते ?



आई

एक तरी मुलगी असावी,
'आई' म्हणून हाक ऐकावी,
प्रेमात माझ्या नखशिखांत,
भिजुन चिम्ब हसावी


एक तरी मुलगी असावी,
उमलताना बघावी,
नाजुक नखरे करताना,
न्याहाळायला मिळावी


एक तरी मुलगी असावी,
साजरी गोजरी दिसावी,
नाना मागण्या पुरवताना,
तारांबळ माझी उडावी


एक तरी मुलगी असावी,
माँचिंग करताना बघावी,
नटता नटता आईला तीने,
खुलण्याची तंत्र शिक्वावी


एक तरी मुलगी असावी,
जवळ येऊन बसावी,
मनातली गुपीत तीने,
हळूच कानात सांगावी


एक तरी मुलगी असावी,
गालातल्या गालात हसावी,
कधीतरी भावनेच्या भारांत तीने,
गळां मीठी घालावी


- आई



वाटतं सुखानेही तुझ्या कडे धाव घेतांना ...

वाटतं सुखानेही तुझ्या कडे धाव घेतांना
अचानक होणारा स्पर्श जाणावा,
चुकून डोळयातून थेंब गळाला
तर माझ्या मनातला घाव भरून यावा..


वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर
सर्वत्र पसरलेली मखमल असावी,
चुकून एखादा काटा कधी रुतला
तरी वेदना फुलाहून कोमल असावी..


वाटतं देवानेही तुझ्यासाठी
नवस न बोलता पावावं,
तू हाक मारन्या आधीच
स्व:खुशिने तुझ्या कडे धावावं..


तसं खुप वाटतं तुझ्याविषयी
पण हा कागद आहे म्हणुन बरं आहे,
आणि ऐकायचं झालं तर तुला
अखंड आयुष्य अपुरं आहे..


मागतो आहे बस सुख तुझ्या करता
ते तुला माझ्या शिवाय पण मिळावं,
जर माझ्या मुळे होतो असेल त्रास तुला
तर प्राण माझा याच क्षणी जावा...



५० वर्षानंतर आज महाराष्ट्र ची अवस्था खालील कविते प्रमाणे आहे

तेजाचे तारे तुटले मग मळेची सगळे पिकले !
लागती दुहीच्या आगी राष्ट्राच्या संसाराला ;
अति महामूर पूर येते ढोग्याच्या पावित्र्याला ;
खडबडात उडवी जेव्हा कोरडया विधीचा मेळा;
चरकात मान्यवर पिळती
सामान्य मुकी जनता ती ,
लटक्याला मोले येती ,
कौटिल्य स्वैर बोकाळे ! तेजाचे तारे तुटले !!


अचारविचारौघाचा नवनित्य रक्तसंचार
ज्या समाजदेही होता अनिरुद्ध करीत व्यापार
त्या देहा ठायी ठायी घट कसले बंध अपार
कोंडिले स्वार्थकोंड्यात,
जल सडले ते निभ्रांत
तरी धूर्त त्यांस तीर्थत्व
देऊनी नाडती भोले ! तेजाचे तारे तुटले !!


कर्तव्य आणि श्रेयाची हो दिशाभूल जेव्हां ती,
आंधळा त्याग उपजोनी डोहळे भिकेचे पडती;
अतिरेक पूज्यभावाचे फुंकिती विवेकेज्योती;
मग जुन्या अप्तावाक्याते
भलतिशीच महती येते,
राणीची दासी होते,
बुद्धीचे फुटती डोळे ! तेजाचे तारे तुटले !!


घन तिमिरी घोर अघोरी विक्राळ मसण जागवती;
ती ' परंपरा ' आर्यांची 'संस्कृती' 'शिष्टरूढी' ती;
'धर्मादी' प्रेत झाल्याची बेफाम भुते नाचवती;
सत्तेचे फक्त पुजारी उरले तेजाचे तारे तुटले !!



एक रुपयाचा विचार करणार मन

आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...


पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald's चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...


"वन रूम kitchen"मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...


जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...


तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं...
म्हनुणच ....
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय....
कारण .....
आता माझ standard वाढु लागलय



वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे

वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे.....
वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे
पण अजुनही खुप काही
करायच बाकी आहे....
आपल्याच माणसान्नी दिलेल्या
जखमा भरायच अजुन बाकी आहे...
तुझ्या प्रेमाची सवय
झाली होती मला!
म्हणुनच तुला विसरायचा
प्रयत्न अजुन बाकी आहे....
तुझ्या अमुल्य वेळेतला थोडा
अजुन वेळ देशिल का मला?
अजुनही प्रेमाचं तुझ
एक कर्तव्य अजुन बाकी आहे....
मला स्मशानापर्यंत
सोडुनच परतु नकोस
माझ्या काळजात तुझ्याबद्द्ल्च्या
भावना अजुन बाकी आहेत......
जाताना त्या तुझ्यासन्गे घेउन जा...
कारण माझ्या देहाच
जळणं अजुन बाकी आहे......
मला जाळताना रडु नकोस वेडे
नाही तर त्या यमालाही सान्गाव लागेल
जरा थाम्बतोस का माझ
तिला समजवण अजुन बाकी आहे...


------------ --------- --------- --------- --------- --------
तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी,
कुठल्याही मतभेदाला तिथे वाट नसावी,
मी आनंदात असताना हास्य तुझे असावेत,
तू दुखात असताना अश्रु माझे असावेत.



असे नेहमीच होत राहते

असे नेहमीच होत राहते
का...ते कळत नाही पण
असे नेहमीच होत राहते


तू अविरत बोलत राहतेस अन्
मी फक्त तुझ्याकडे पाहत राहतो
तू स्वत:हून काही करत नाहीस
पण तुझे सौंदर्यच भुरळ पाडत राहते
का...ते कळत नाही पण
असे नेहमीच होत राहते


जेव्हा माझ्या बरोबर असतेस
जग सुंदरहुनही सुंदर भासते
जाताना तू वळून पाहतेस
अन् काही न बोलता उगीच लाजतेस
का...ते कळत नाही पण
असे नेहमीच होत राहते


मी तुझाच विचार करत राहतो
अन् प्रेमात तुझ्या झुरत राहतो
प्रेम नाही ग़ सांगता येत शब्दांत
पण तुला ही का नाही कळत हे नि:शब्द प्रेम
का ग़ कळत नाही तुला....?



ती येणार होती

ती येणार होती, नाही आली......!
पण.............!
तिची आठवण मात्र येऊन गेली...!
शेवटी तिला भेटण्याची इच्छा मनीच राहून गेली...!
तरी पण ......!
भास झाला मनाला ..!
वाटल कि, ती आली...!
पण.............!
दार उघडून पाहतो तर काय....
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!
त्या खट्याळ वारयानेच माझी मस्करी केली.............!



हवी होती फक्त दोन अक्षरं

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'


'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी


धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या


वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर


गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर


हवी होती फक्त दोन अक्षरं



"आम्ही आमुच्या मनाचे राजे"

हसेल कुणी
रुसेल कुणी
कुणी गायील
आमचे गोडवे
आम्हा कुणा
काय त्याचे
आम्ही आमुच्या
मनाचे राजे.......
स्वप्नात रंगतो
मस्तीत दंगतो
कुणा न आम्ही
उगाच हिणवतो
कुणास मात्र
काय वाटते
आम्हास सुतक
काय त्याचे
आम्ही आमच्या
मनाचे राजे.......
वाटते पावसात
बेधुंद भिजावे
कुणाच्या गलवरील
थेंब टिपावे
डोळ्यात तिच्या
क्षणभर हरवावे
पण त्यांच्या नजरेच्या
तिराने घायळचे मरण
आम्ही मरतो
कुणाला मात्र
काय त्याचे
जो तो त्यांच्या
मनाचे राजे
जसे आम्ही
आमच्या मनाचे राजे........



भळभळत्या जखमेला

भळभळत्या जखमेला
दाबुन मी धरले आहे
तू फ़क्त एकदाच ये
थोडेच श्वास उरले आहे ||१||
विवशतेने जातानाही
मागे वळली होती
तुझ्याच नकळत तेव्हा तुझी
आसवे खळली होती ||२||
खात्री आहे मला
तू परत येशील
मी फ़क्त तुझीच आहे
म्हणत घट्ट मिठी मारशील ||३||
तुझ्या त्या मिठी साठी
आज मी जिवंत आहे
एकदाच मागे फिरून ये
श्वास थकले आहे ||४||
तू भेटलीच नाही तर
सरण माझे खचेल
वा-यावरती राख माझी
तुझ्या कुशीत बसेल ||५||
तू नाही आलीस तरी
मी राख होऊन येईल
मी फ़क्त तुझाच होतो
ह्याची खात्री देऊन जाईल ||६||



नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......

तुझ्यात पार गुंतुण गेलो मी,
कशातही उरून न रहिलो मी……


नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू,
अधूरा राहीन मी.. जर गेलीस जीवनातून माझ्या तू......


हसू नकोस तू अबोल अशी,
येऊन जा एकदा माझ्या मनाशी.......


नजरेत माझ्या नजर मिळव एकदा,
दिसतील तुझ्याच प्रतिमा त्यात अनेकदा......


प्रत्येक वेळी स्वपनांत येते तू अशी,
जणू एक स्थान करून जाते हृदयाशी.......


तुझे स्मित हास्य देऊन जाते एक आशा जगण्याची,
त्यात नाही उरली आता भिती मरण्याची........


नको घेऊस परीक्षा आता माझ्या प्रेमाची,
देऊन जाईल आठवण ती निरंतर आपल्या नात्याची......


आता फक्त तू तिथ मी.... अन् मी तिथ तू,
मिळून जगु आयुष्य दोघे....
नको “मी”.... अन् नको तो “तू",
आता फक्त “आपण” अन् “आपणच” दोघे…..
Tuesday, March 15, 2011



एक विनंती आहे .....

एक विनंती आहे .....
दुरच जायच असेल तर
जवलच येऊ नका,
busy आहे सांगुन टालायाच असेल
तर वेळच देऊ नका......


एक विनंती आहे .....
साथ सोडून जायचच असेल तर
हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर
मनात आधी भरूच नका.........


एक विनंती आहे .....
चौकशी भरे call कालजीवाहू sms यांचा
कंतालाच येणार असेल तर misscall च देऊ नका,
memory full झालिये सांगुन delet च
करायचा असेल तर नंबर save च करू नका.......


एक विनंती आहे .....
मौनव्रत स्वीकारायच असेल तर
आधी गोड गोड बोलूच नका ,
सीक्रेट्स share करायचीच नसतील तर
मनाच दार उघडूच नका.....


एक विनंती आहे .....
माझ्या कालजी करण्याचा त्रासच होणार असेल तर
मला आपल म्हनुच नका ,
अनोलखी होउनच वागायच असेल तर
माझ्या बद्दल सगळ जानुच नका ....


एक विनंती आहे .....
अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर
आधी डाव मांडूच नका,
रागावून निघून जायचच असेल तर
आधी माझ्याशी भांडूच नका .....


एक विनंती आहे .....
सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर
कृपया नात जोडूच नका ,
फाडून फेकून द्यायच असेल तर
माझ्या मनाच पान उलगडूच नका



माझे मरण

माझे मरण




होता श्वासात तेव्हा,
नव्हत कोणी डोकावून बघायला,
आज जेव्हा श्वासच उरला नाही,
तेव्हा आले सगळे बघायला,



नव्हत कोणी रडायला माझ्याबरोबर,
तेव्हा, नव्हत कोणी हसायला,
आज जेव्हा शांतपणे झोपलोय मुक्त होऊन,
तर, आले सगळे टाहो फोडायला,



आज पहा माझा काय थाट!
लोक जमतील मला अंघोळ घालायला,
आयुष्यभर नाही पाहिल कधी कापड,
आज नवीन पांढरे-शुभ्र वस्त्र मला नेसायला,



जेव्हा उपाशी होतो रात्रों-रात्र,
नव्हत कोणी एक घास खाऊ घालायला,
आज जेव्हा भुक मेली माझ्याच बरोबर माझी,
ठेवलाय माझ्यासाठी त्यांनी भात शिजायला,



जन्मभर लाथा मारून गेले जे मला,
आज आले माझ्या पाया पडायला,
शब्दाचाही आधार नाही दिला ज्यांनी,
आज चौघे-चौघे आले मला धरायला,



आज काय किम्मत 'त्या' रडण्याला?,
आज काय किम्मत 'त्या' छाताड झोडण्याला?,
ज्या घरात रहातच नाही आज कोणी,
आज काय किम्मत 'ती' घरपूजा करण्याला



खरच मनाला दार असत तर

खरच मनाला दार असत तर
खरच मनाला दार असत तर
सारया जगाला बाहेरच ठेवल असत
कुणाची काय मर्जी आहे
ते पाहिल्यावर त्याला आत सोडल असत


खरच मनाला दार असत तर
तुझी स्वप्न बाहेरच ठेवली असती
नुसतीच आशा ठेवन्यापेक्षा ती
पूर्ण झाल्यावरच त्याना मानत जागा दिली असती


खरच मनाला दार असत तर
तुझ्या आठवणी बाहेरच ठेवल्या असत्या
तुझ्या विचाराने येनारया अश्रुना
मनात जागा दिल्या असत्या


खरच मनाला दार असत तर
तुझे विचारही बाहेरच ठेवले असते
तुझ्या विचाराने मरन्यापेक्षा
मन रिकामे ठेवणे पसंत केले असते


खरच मनाला दार असत तर
शब्द मात्र या वेळी आतच ठेवले असते
असे कवितेत लिहिण्यापेक्षा
कायमचे मनात कोरुन ठेवले असते


खरच मनाला दार असत तर
खरच मनाला दार असत तर ...



पावसाची एक सर

पावसाची एक सर
अलगत बरसून गेली,
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली...


मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला,
पावसाचे काळे ढग माझ्या
डोळ्यांत साठवूनी गेला...


बेधुंद होऊनी मग
पावसाच्या सरी झेलत राहिली,
तुझ्या विरहाच्या पावसात
बेभान होऊन भिजत राहिली...


सुटला सोसाट्याचा वारा
अंगाशी येवूनी झोंबला,
त्या वा-यातही मला
तुझाच स्पर्श जाणवला...


नकळत शरीर स्तब्ध झाले,
मन माझे भूतकाळात रमले,
डोळ्यांत अश्रुंचे ढग साठले ,
बरसात राहिल्या तुझ्या आठवणी,
मन त्यातच भिजत राहिले...



सांगशील मला कधी?

सांगशील मला कधी?
प्रेमाचा अर्थच नव्हे,
त्याची व्याप्ती सांग मला
मी जे जे अनुभवलं,
प्रेमच म्हणतात का त्याला?
त्याचं दर्शन घेणं,
हा तर केवळ दिनक्रम झाला
डोळे मिटूनही तोच दिसणं,
हा भलताच उपद्रव झाला!
तो असल्यावर प्रसन्न वाटणं,
हा कदाचित योगायोग असावा
तो नसल्यास बेचैन होणं,
ह्याचा अर्थ काय लावावा?
तो कधी हसून बोलला,
आभाळाला हात टेकतात
जाणून बुजून दुर्लक्ष केल्यावर,
पाय जमिनीवर आणतात
मला त्याचा सहवास मिळेल
ही अपेक्षाच मुळी उणी
पण म्हणून का लगेच,
मनाला आवर घालू शकतं कोणी?
त्याला त्याचे प्रेम मिळो,
अडसर नको कधीच
माझ्या वाटेवर मृगजळ होतं,
समजून घे‌इन आधीच
'प्रेमाशिवाय जगणं शून्य',
असं का आहे थोडीच?
'आपण प्रेम करु शकलो', ही भावना,
समाधान दे‌इल नक्कीच!
म्हणून विचारते, खर सांग,
ही जाणीव कसली?
प्रेमंच जर नव्हतं, तर मग,
ही हुरहूर कसली?



दोन शब्द आईसाठी

दोन शब्द आईसाठी ......



------------
आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे


आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा


आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची


एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस


जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली


आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी


आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही


आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील



शेवटची भेट....!!!

शेवटची भेट....!!!
रस्ता ओलांडताना अचानक
ओळखीचा चेहरा दिसला
अन पहिल्या प्रेमाची
आठवण देऊन गेला!१!
वाटलं द्यावी हाक
पण स्वताला आवरलं
कारण तुझ्या हाताला
लहानशा मुलानं धरलेलं!२!
आठवली शेवटची भेट
जेव्हा आपण भेटलेलो,
अन कॉलेजमध्ये झालेल्या प्रेमाची
शेवटी सांगता करायला आलेलो!३!
सतत बडबडणारी तू
त्या दिवशी शांत होती
डोळ्यात मात्र तुझ्या
खोल आसवं दाटलेली होती!४!
मी असाही अबोल,
माझीतर वाचाच गेली होती
आता वेगळ व्हायचं म्हणून
पायाखालची जमीनच सरकली होती!५!
मी दिलेला हिरवा ड्रेस
तू परिधान केला होता,
मी मात्र, तू दिलेला शर्ट
कपाटात जपून ठेवला होता!६!
शेवटच तुला डोळे
मनात साठवत होते,
तुझे डोळे मात्र मला
भिडण्यास काचरत होते!७!
न राहवून शेवटी हाथात
माझ्या लग्न-पत्रिका दिली
अन माझ आभाळच फाटल्याची
तेव्हा मला जाणीव झाली!८!
मी निघते,
म्हणून तू पाठमोरी झाली
अन तुझ्या पाठीवर काठीचे व्रण
असल्याची मला धूसर जाणीव झाली!९



आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय


नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् ‍ या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...


आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय



दादर म्हणजे दादर असतं

दादर म्हणजे दादर असतं
मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!
दादर म्हणजे दादर असतं


श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,
सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव
पार्कात विराजती उद्यान गणेश
नांवाजलेली शाळा-कॊलेजं
म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!
विद्यार्जन नि विद्यादानाला
जे सदैव सप्रेम सादर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर असतं!


वसंत देसाई, वसंत प्रभू
सी रामचंद्र नि सुधीर फडके
दादरचेच तर होते
ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर
चक्क नौशादसाहेब झोपत होते!
मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची
‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे
लताजींची रिहर्सल चालायची!
असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…
म्हणूनच गडया,
दादर म्हणजे दादर असतं...


छबिलदासचा फर्मास बटाटावडा
नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’
नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर
नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,
खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं
दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं
ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..
दादर म्हणजे दादर असतं...


शिवाजी पार्कच्या मैदानाला
एक किलोमीटरचा कटटा असतो,
तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत
इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!
चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो
’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा
मात्र निराळाच ढंग असतो!
पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी
काला-खटटा च्या गाडीवर मात्र
गि-हाईक हमेशा हजर असतं...
नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर असतं


हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत
साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत
लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत
फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!
पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ
फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ
भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का
गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का
अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत
दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!
हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं
दादर म्हणजे दादर असतं...


पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर
नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर
इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण
नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण
सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं
ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं
ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई
त्याच लोकांचं इथे घर असतं,
दादर म्हणजे दादर असतं.

माझ्यावर प्रेम करणारी असावी
चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी
ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी
यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी
बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी
हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी
ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी
ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी
केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी
थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी
हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी
इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी
चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी
तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी
जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी
आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी
प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी
तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी
पण नाही माझ्या नशिबी ही प्रेयसी येईल का नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......