विसरू नको रे आई बापाला

झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया

तुला मिळेल बंगला माडी
त्याची भारी मोटार गाडी
आई बाप मिळणार नाही
हि जाण राहू दे थोडी
विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया

तुला मिळेल बायका पोर
गण गोत्र मित्र परिवार,
खर्चाने गुरफटलेला
हा मायेचा बाझार
विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया

आई बाप जिवंत असता
नाही केली त्याची सेवा
ते मेव्ल्यारती कश्याला
रे म्हणतोस देवा देवा
बुन्धी लाडवाचे जेवण करुनी
मग म्हणतोस जेवा जेवा
विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया

स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
तू समजून वूम्जून वेड्या
होऊ नको अविचारी,
जीवना मधली अमोल संधी
नको रे घालू वाया
विसरू नको रे आई बापाला
झिजवली त्यांनी काया ,
काया झीजवून तुझ्या चीरावर
धरली सुखाची छाया रे वेड्या
मिळणार नाही तुला
आई बापाची माया

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....