पण जीव तरीही जडतातच न

कुणाचेच नसतात हक्क कुणावर
पण तरीही डोळे भरतातच ना?
"अपेक्षाच करू नये अश्या"
पण अपेक्षा तरीही उरताताच ना?
सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना?

हिशेबच मांडायचा सगळा
तर आकडेही पडतील कमी
तरीही सुख मोजतांना
पापण्या तुझ्याहि भिजतातच ना?
सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना?

लाख असेल झाला
दगड तुझ्या काळजाचा
पण झिडकारतांना हात माझा
मनात वेदना असतातच ना ?
सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....