आई-वडील...
आई-वडील.... बस शब्दच संपतात माझे हे दोन शब्द ऐकल्यावर ,
उर भरून येतो त्यांच्या आठवणी मनात दाटल्यावर .
पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई ,
त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही.
आई निर्मल पवित्र तर गंभीर अन संयमी पिता ,
वडील पुरण वेद तर आई साक्षात गीता .
मुलांचा आनंद हा त्यांना पर्मानंदाचे सुख देतो ,
पण हा मुलगा त्यांना वृद्धाश्रमात नेऊन आपली जबाबदारी झटकून देतो .
हि मुले आयुष्यातल्या सुखांमध्ये आई वडिलांना विसरतात ,
ज्यांनी बोटाने धरून पायावर उभे केले त्यांचा हात धरायला कचरतात .
"आमच्या साठी काय केल?","हे तर तुमचे कर्तव्य होत !" असे म्हणून दाखवतात ,
पण बोचऱ्या शब्दांच्या वेदना फक्त आई-वडील बनल्यावरच जाणवतात .
कितीही मोठे झाले तरी ते तुम्हाला लहान म्हणून पाहत असतात ,
लाचारी म्हणून नाही तर फक्त प्रेमापोटी ते तुमच्याबरोबर राहत असतात.
आई-वडील खरच इतके महान आहेत ,
देव शिक्षा करेल मुलांना म्हणून ते बोलतात "ते तर अजून लहान आहेत.! "

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा