बाप.....

आई प्रेमाने वागते
बापाला कठोर व्हाव लागत
रोगनिदानासाठी जस
इंजेक्षन टोचाव लागत

बापाला मी कधी
रडताना पाहील नाही
तोच जर रडला तर बाकीच्यांच काय
ही कल्पनाच त्यान्ना सहन होत नाही

दुनियादारी सोसून बाप
कठोर झाला आहे
प्रेमाने वागेल कसा
ठोकरच तर खात आला आहे

गुन्हा झाला काही तर
सजा देत असतो
तोच गुन्हा पुन्हा न करण्याची
हमी घेत असतो

सोसून सोसून सोसल किती
तो ही माणूसच आहे
दुनिया भरच्या गमान्ना तो
दारुत पीत आहे

स्वभावाने जरी कठोर दिसला
तरी मनाने कोमल आहे
लपवीत असला अश्रू तरी
आतून रडत आहे

रडून -रडून रडणार किती
अश्रुही आटले आहेत
रडण्यासाठी वेळ कुठय?
पोट पाठीला भिडलाय

बाप म्हणतोय...
"मी शिकू शकलो नाही
पण पोरांना शिकवायचय
अपुर्‍या माह्या स्वप्नांना
आता त्यांनीच पूर्ण करायचय

विकावा लागला घर-दार तरी
माग हटणार नाही
पोरांना शिकवन्या बिगर
मी सुखाने झोपणर नाही "/akshay rameshrao virulkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......