शब्दा वाचून तिला सगळ काही कळते

ती: खूप दिवसा पासून काही तरी
विचारायचं होता... विचारू का?

तो: permission काय घेतेस...
विचार जे विचारायच्या ते...

ती: तू रोज कविता का करतोस?
तो: मनातल सगळ सांगण्यासाठी...

ती: मग कवितेत का रडतोस?
तो: माझ एकटे पण विसरण्यासाठी...

ती: कशी सुचते रे कविता तुला ?
कसे सुचतात रे शब्द ?
भिडते रे मनाला कविता तूझी,
अन वाचून होते, मी रे स्तब्ध...

तो: कशी सुचते ते मला माहित नाही,
पण लिहितो मी काही तरी...
शब्द नसतात ग त्यात,
रचत मी भावनांची रांगोळी ...

ती: कोणासाठी लिहितोस रे
ह्या सगळ्या कविता ?

तो: आहे कोणीतरी ...
जी माझी असून हि माझी नाही...

ती: ह्म्मम्म्म.... दिसते रे कशी?
राहते रे कुठे?
तो: दिसते ती परी सारखी,
अन राहते......
हम्म्म्म.....
राहते माझ्या हृदयात...
ती: (रागावून) नाही सांगायचं तर तस सांग...
पण फुकट पकावू नकोस ..

तो: चालेल सांगतो,
पण तू आता रागाऊ नकोस...
ती आहे परी सारखी ,
फक्त माझ्यशीच बोलणारी...
मनातल सगळ काही फक्त
मलाच येऊन सांगणारी...
दररोज मला भेटणारी,
अन माझ्या समोर बसून,
फक्त मलाच पाहणारी ....

ती: (विचारात गुंग होऊन)
कोण असेल ती????

तो: (तिच्याकडे पाहत हसतो,
अन मनातल्या मनात बोलतो )
तू समोर असून हि,
तुला सांगता येत नाही...
मनातल गुपित माझ्या,
का जणू मांडता येत नाही...
घाबरतो ग, हरवून बसेन मी तुला ,
कारण तुझ्या शिवाय,
आता मला जगणं जमत नाही....

काही वेळाने तिला कळतं,
त्याच्या मनातल गुपित,
आपोआप उलगडतं,
तो काहीही न बोलता,
ती सगळ बोलते,
मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाच नाव जोडते...
कळत नकळतच ते मित्र होतात, कळत नकळतच प्रेम जुळते,
तो काहीच बोलत नाही, तरीही,
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते...
शब्दा वाचून तिला, सगळ काही कळते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......