बलात्कार

कधी दिल्लीत,कधी पुण्यात
तर कधी मुंबईत होतोय बलात्कार
आणि घरोघरी महिला रोज
सहन करतात अत्याचार

शरीर आपला पण
अधिकार मात्र नाही
स्वाभिमानाने जगतो म्हटल
तर कुत्र्यांची काही कमी नाही

बाहेर निघतो म्हटल तर
शरीर सांभाळाव लागत
आणि दोन गोस्टी सांगितल्या तर
प्राणास मुकाव लागत

उपभोगाची वस्तू म्हणून
स्त्री कडे पाहील जात
संस्कृतीच्या गप्पा मारता-मारता
माणूस बनायच राहून जात

बलात्कार झाला की
मोर्चे काढले जातात
'लॉ अँड ऑर्डर' चा प्रश्न समजून
कुंपण तेवढे बांधले जातात

जिच्यावर झाला रेप
तिलाच 'एक्सप्लनेशन' द्याव लागत
'मर्दाच्या' भावना भडकावल्याचा
आरोप केल जात

'इंटेलेक्चुयल्स?' म्हणतात
मुलींनी शॉर्ट कपडे घालू नये
पीसाटलेल्या कुत्र्यांना
आमंत्रण देऊ नये

आदिवासी नागडे रहातात
म्हणून का तिथे रेप होत असतात?
आणि फॉरेन पेक्ष्या आपल्याकाडेच का
रेप चे प्रमाण वाढलेले दिसतात?

लहानपणीच मुलाला
'डॉमिनेंट' व्हायला शिकवल जात
मुलीच्या हाती बाहुल्या तर
मुलाला बंदुक दिल जात

मुलगा पाहत असतो
बाप आईला मारत असतो
मोठेपणी तोपण बापाच्या संस्कृतीचे
अनुकरण करत असतो

घराण्याची एज्जत म्हणून
मुलीकडे पाहील जात
कधी-कधी त्यामुळेच दुश्मणांना
आमंत्रण दिल जात

बलात्कार हा स्वतंत्र मुद्दा म्हणून
जो पर्यंत आपण बघत राहू
आणि प्रोटेक्षन दिल की विषय संपला
या भ्रमातच जगत राहू

तो पर्यंत मुलींवर होणारे
बलात्कार कधी थांबणार नाहीत
आणि कमीच भासले आपल्याला ते
तरी आत्याचार कधी थांबणार नाहीत

म्हणून म्हणतो मुला-मुलींना
एकसारख वागवायच ध्यानात घ्या
एकाला कुलदिपक तर दुसर्याला बोझ म्हणण्याची
मानसिकता तेवढी त्यागुण द्या

तरच कमी होतील बलात्कार
मुलगी बाहेर फिरू शकेल
आणि भारतामातेच्या सेवेत
आपले योगदान देऊ शकेल....akshay..r.virulkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....