ही इज़ माय बेस्ट फ्रेंड
जतिन आणि रियाची ओळख महाविद्यालयाच्या पहिल्या दिवसापासून झाली होती. दोघांच्याही आवडीनिवडी मिळत्या जुळत्या असल्यामुळे दोघांना एकमेकांजवळ येण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.
प्रत्येक चांगल्या गोष्टीला विरोध केला जातो हा जगाचा नियम आहे. या दोघांची मैत्रीही बाकीच्या विद्यार्थ्यांच्या आवडत नसे आणि सर्वांनी रिया आणि जतिनच्या विरोधात एकमेकांचे कान भरण्यास सुरवात केली. हळूहळू दोघांमधील संबंध दूरावत गेले आणि चांगले मित्र असणारे रिया आणि जतिन आज एकमेकांपासून दूरावले गेले. कारण एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे आणि लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांनी एकमेकांशी चर्चा केली नाही.
एका महापुरूषाने म्हटले आहे की, 'मनुष्य मित्राचा मृत्यू सहन करू शकतो, मैत्री नाही.' मैत्री आयुष्यभर ठेवण्यासाठी काही लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
WD
मुलींना हे आवश्यक आहे
मुलीने मैत्रीत प्रामाणिक आणि मर्यादा कधीही विसरू नये. आपली मर्यादा स्वत: ठरवून घ्यायला पाहिजे. आईवडिलांपासून आपल्या मित्रांची माहिती लपवू नये.
कुणालाही न सांगता एकटेच घराबाहेर पडू नये. शक्य झाल्यास समूहाने बाहेर जावे.
मुलींनी एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करावा किंवा नंतर चर्चा करावी. ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या मैत्रीचे नुकसान करू नये.
WD
मुलांना आवश्यक बाबी
मैत्रीचे नाते खूप पवित्र आणि मोठे असते. मैत्रीत कोणी मुलगा किंवा मुलगी नसून मित्र केवळ मित्रच असतो. त्याचा फायदा घेऊ नये. एखाद्याने आपल्यावर विश्वास ठेवला तर त्याचा आदर करावा. दुसर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊ नये. आपला मित्र चुकीच्या मार्गाने जात असल्याचे कळल्यावर त्याला समजावून सांगणे आणि साभांळणे आपले कर्तव्य आहे.
आज जगात मुलगा आणि मुलीची मैत्री असणे वाईट मानले जात नाही, कुणीही त्यांना वाईट नजरेने बघत नाही.
आज मैत्री दिवस आहे, म्हणजे मैत्री साजरी करण्याचा दिवस आहे. मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या मर्यादेत राहून आपल्या मित्राप्रती विश्वास ठेवला तर त्यांची मैत्री शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत नाही, तर आयुष्यभर राहील आणि काळाबरोबर अधिक दृढ होईल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा