बळीराजाचा इतिहास




शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये बंद करून टाकलीत.
बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता.आपल्याकडे सुपीक शेतीमध्ये सर्व जनतेला ज्ञान होते.शेतकर्यांना सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती.प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती.कुठलाच अधर्म नव्हता.शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट होते.स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असे.अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती.दस्युचे स्वत:ची सम्रुद्ध नगरे होती.याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.असं हे सुखी व सम्रुद्ध राज्य परकीय आक्रमकांनी नष्ट केले.
युरेशियन लोकांचे आक्रमण
सुमारे साडे पाच हजार वर्षापुर्वी उत्तर ध्रुव युरेशिया,इराण,इजिप्त ह्या मार्गाने खैबर खिंडीतून सम्रुद्ध भारतात अत्यंत क्रुर,कपटी,अज्ञानी,असंस्क्रुत युरेशियन आक्रमकांच्या टोळ्या आल्या.त्यांनी आक्रमकपणे इथली विकसित सिंधू संस्क्रुती उद्ध्वस्त केली.पण इथल्या बहुजन समाजाने ही आक्रमणे सहजपणे परतावून लावली.बहुसंख्य बहुजनांपुढे आपलं काहीही चालत नाही.हे लक्षात आल्यावर बहुजनांशी जुळवून घेऊन त्यांच्यात भेदनिर्मिती,कपटनितीचा वापर,अप्सरा तंत्राचा वापर केला.बहुसंख्य बहुजन समाज त्यांच्या गोड-गोड फ़सला व कायमचा गुलाम बनला.
ह्या पार्श्वभुमीवर बहुसंख्य समाजातील कर्त्रुत्ववान पुरुषाला मारणारे आदर्श अवतार बनविले.त्यातूनच "विष्णू दशावतार" कल्पना त्यांच्या मनात आली.दशावतारातील त्यांचे खरे पुरुष मत्स्य, कच्छ, न्रुसिंह, वामन,वराह आणि परशूराम हे सहा अवतार.वेद,पुराणे अनेक ग्रंथांच्या माध्यमातून बहुजनांच्या मेंदूवर जाणीवपुर्वक बिंबवले यातील एक अवतार(बामन अवतार) वामन अवतात आपण थोडक्यात समजून घेऊया.
पुराण कथाकारांची भुमिका :-
पुराण कथाकारांची बळीराजाचे वर्णन अत्यंत शूर, दानशूर व प्रजावत्सल राजा असे केले आहे.बळीराजाने देवांचे फ़जिल लाड,थोतांड नाकारले.इंद्र,ब्रह्मदेव या देवाच्या प्रमुखांना बळीराजाने पिटाळून लावले.आपले बळीराजापुढे काहीही चालत नाही हे पाहून बळीराजापुढे शरण जाऊन देवांने वामनाचा अवतार धारण केला.बळीराजास तीन पावलांची भुमी दान मागितली.पहिल्या पावलात प्रुथ्वी,दुसर्या पावलात स्वर्ग व्यापुन टाकले.तिसरे पाऊल ठेवायला जागा नसल्यामुळे वामनाने पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले व बळिराजास पाताळात पाठवले म्हणजे ठार मारले.
महात्मा जोतिराव फ़ुले यांनी केलेली या कथेची चिकित्सा :-
चिकित्सा करताना फ़ुले समग्र वाड:मयात म्हणतात वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता.प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे.माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते.वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची ....फ़ाटून गेली नसती काय ? (फ़ुले समग्र वाड:मय) डॉ.आ.ह.साळूंखे - बळीवंश या पुस्तकात प्रुष्ठ क्रमांक २०१ वर म्हणतात वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते.लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता.तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते.म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला.तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
याचात अर्थ आजची आपली स्थिती सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहे.तुम्हाला ट्रेनिंग दिलय, तुम्ही तुमच्यात भांडणे करा पण चुकुनही आमच्यावर वार करू नका.तुमची नखे काढून टाकलीत.तुमच्या दाताला रक्ताची चव लागू नये म्हणून तुम्हाला पिंजर्यात कोंडून ठेवलय.एका विशिष्ट चौकटीत आपण बंदिस्त आहोत.जन्मापासून तर मरे पर्यंत आपल्याला बामन चिकटलाय.अरे आठवा आपल्या पुर्वजांचा इतिहास आणि तोडा सर्व गुलामीच्या चौकटा. कोणाच्या आदेशावर कशाला चालता.आपल्याला डोकं आहे ना ? काय खरं आणि काय खोटं तपासून घ्या.अरे कॊण दिड फ़ुट असलेला वामन आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" असं म्हणतात. याचाच अर्थ बळीराजा महान असला पाहिजे आणि वामन वाईट असला पाहिजे.तेंव्हा प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे.इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" ॥ "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....