जाणीव

खिडकी पाशी उभी राहून ..
आकाशातले चित्र विचित्र तुकडे न्याहालताना
जाणीव होते .....हातुन काहीतरी निसटत चालल्याची

माझ्या वाट्याला आलेल्या मानासंच्या
सौम्य सुखदायी आठवनी आठवताना
जाणीव होते .... .ती मानसाच माझ्यापासून दूर होत चालल्याची

रक्ताची नाती नसताना
जे बंध घट्ट होते ........
आता जाणीव होते ......ते बंधच सैल पडत चालल्याची

मनाच्या बंद कप्प्यात साठवून ठेवलेले क्षण
एकांतात हलुवारपने कवटालताना
जाणीव होते .....ते क्षणच पुसट होत चालल्याची

मनात ओढ़ ही असल तर भेट ही घड़तेच
पण आता जाणीव होते....... प्रत्येक भेटीतील ओढ़ कमी होत चालल्याची

मनावरच्या खोल जखमांवरची खपली काढताच
ती भला भला वाहू लगते
अणि मग जाणीव होते .....ही खपली कधी भरलीच नव्हती याची

उद्याचा दिवस कधी उगवेल या प्रतिक्षेत
आजचा दिवस कधी मावालतो हे कलताही नाही
अणि मग जाणीव होते ......हे दिवस ही हातुन सुटत चालल्याची

ज्या आधाराची मला
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर गरज होती
आता जाणीव होते .......तो आधारच खुप दूर गेल्याची

कधी कधी हे आयुष्य
माणसाला कसे एकटे पाडते
याची प्रचिती येत असतानाच
जाणीव होते .......आपण ही फक्त एकाकी पडल्याची

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......