मला देव भेटला

मला देव भेटला
मातृपितृ देवो भव
परमेश्‍वर इकडे तिकडे कुठेही नसतो तर आपल्या प्रत्येकाच्या घरातच असतो. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परमेश्‍वर म्हणजे दुसरं-तिसरं रूप तरी काय असते? तर आपले प्रत्येकाचे आई-बाबाच तर असतात. रोज सकाळी घरातून बाहेर पडताना त्यांना भेटून व नमस्कार करून बाहेर पडतो म्हणजेच मी रोजच्या रोज माझ्या देवांना नमस्कार करून बाहेर पडतो. जर मी घरी नसेन म्हणजे कामानिमित्ताने घरापासून कुठे दूरवर असेन तर मोबाईल अथवा इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या या परमेश्‍वरांशी रोज न चुकता संपर्क साधतो अथवा संवाद ठेवतोच. लहानपणापासूनच झालेले हे संस्कार असे सहज कसे सुटतील? आपल्या घरातल्या अथवा हक्काच्या देवांना कोणी इतक्या सहज विसरतो काय? आपल्या आई-बाबांना विसरणे म्हणजे सर्वात मोठे पाप आहे.
याव्यतिरिक्त आमच्या लातूरमधील लहान-मोठ्या देवळांना सातत्याने भेटी दिल्या आहेत. शिर्डी, तिरुपती अशा तीर्थस्थानांना भेटी देणे सुरूच असते, पण देवाकडून मी कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तशी ती कोणीही ठेवूदेखील नये. देवा मला तू हे दिलेस तर मी ते करीन असे गार्‍हाणे घालायची काहीही गरज नसते. परमेश्‍वर आपल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतच असतो. ‘तुझे मेरी कसम’द्वारे मी अभिनयाच्या क्षेत्रात आलो तेव्हा चार-पाच लहान-मोठे चित्रपट करीन. मी येथून निघून जाईन. अन्य एखाद्या क्षेत्रात करीयर करीन असे वाटले, पण ‘मस्ती’च्या यशानंतर माझा दृष्टिकोन बदलला व मी येथे करीयर करायचे व त्याचा आनंदही घ्यायचा ठरवले. हे सगळे देवाच्या कृपेने घडले असे मी मानतो, पण अल्लादीन, रण असे काही चित्रपट यशस्वी ठरले असते तर मी कॉमेडीशिवाय इतरही काही करू शकतो हेही सिद्ध झाले असते. आता ‘डबल धम्माल’द्वारे मी पुन्हा कॉमेडी भूमिकेत व तेदेखील चार रूपात तुमच्यासमोर येईन. ही तर देवाची कृपा.
- रितेश देशमुख

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......