कितीही संकटे आली तरी मरू नका जगायला शिका, मी अनाथाची माय झाले, तुम्ही गणगोत व्हा – सिंधुताई सपकाळ

– कितीही संकटे जीवनात आली तरी महिलांनी त्यावर मात करून जगायला शिकावे, मरू नये. दिवस उगवतो एका रात्रीचा इंतजार करा. मी अनाथाची माय झाले तुम्ही गणगोतत व्हा, असा मौलीक सल्ला जेष्ठ समाज सेविका सर्वांची माय सिंधुताई सपकाळ यांनी महिलांना दिला.
लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमीत्त देवस्थानच्या परिसरात खास महिलांसाठी महिलावरील अत्याचार व उपाय या विषयावर सर्वांची माय सिंधूताई सपकाळ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी यात्रेचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. दिलीपराव देशमुख, सौ. सुवर्णाताई देशमुख, सोमनाथभक्त अनुराधाताई देशमुख, महापौर सौ. स्मिता खानापूरे, यात्रेचे कोषाध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, सौ. गोजमगुंडे यांच्यासह देवस्निचे ट्रस्टी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, महिलांनी थोडं बदललं पाहिजे, महिला कशा दिसतात, यापेक्षा कशा असतात याला महत्व आहे. महिलांनी उघड्या भाया झाकाव्या मी अमेरिकेत नववारी साडीत गेले होते. तेथे नववारी साडीतील एकटीच महिला होते. म्हणून महिलांनी झाकून राहायला शिका. पण आपली पायरी सोडू नका. स्त्रीभ्रूण हत्या करू नका. अंग झाकण्यात जेवएी महिलांना किंमत आहे, तेवढी उघडे ठेवण्यात नाही. बाई नाही तर देशात काही नाही, मुलगा चांगला नसतो. कारण पाहूणे घरी आले तर आईने मुलाला दूध आणायला सांगितले. तर तो ग्लासला पैशाने वाजवत जातो, बापाची गरीबी झाकत नाही तेच मुलीला सांगितल्यास ती ग्लास व पैसे झाकून घेऊन जाते. मुलगी बापाची गरीबी झाकते. मुलीचा जन्म देशाची इज्जत झाकण्यासाठी आहे. मुले मोठी झाली की बदलतात. परंतु आपणाला माय बाप दोन्हीही हवे आहेत. माय काळजाचा दिवा करून मुला बाळांना जगवते. काळजाची वात करते, ती माय असते. म्हणून संसार तोडू नका. मुलीनो प्रेम जरूर करा पण हे प्रेम काळजापासून असावं, वरवरचं नसावं.
आजच्या मुलींना स्वयंपाक येत नाही, ते त्यांनी शिकावं. नवऱ्याला स्वत:च्या हाताचा स्वयंपाक खाऊ घातल्यास प्रेम वाढेल. नवऱ्याला भांडू द्या, तुम्ही भांडू नका. शेवटी भांडणारा तो थकतो. एकमेकाचे सुखदु:ख नवरा बायकोने समजून घ्यावे. संसार म्हणजे चिखल पाण्याचे नाते असते. नवऱ्याने प्रेमाने बायकोला थकलीस का म्हणावे. नवऱ्याला मोठं करण्यात बायकोचं योगदान असतं. खूप शिकून त्याबरोबर शिक्षणाची परिभाषा ओळखायला शिका.
देशासाठी पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून, एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यास मंत्र्याला सुद्धा संरक्षण न घेता त्या ठिकाणी जाता येत नाही. पत्रकार, फोटोग्राफर मात्र जातो असेही सिंधूताई म्हणाल्या. संसार बाईनेच करावा. हाफटाईम चौथी पास असलेली मी जगले. पोरीला वाचवा, जगवा. बाईची जात शोषीत असते, बाईच्या जातीला तयार करताना देवानं टाईमपास केला असेल. कितीही संकटे येऊ द्या, जगायला शिका, मरू नका. देव जगात आहे, मी हजारो लेकरांची माय आहे. तसेच गाईचीही माय आहे. गाईनेच मला वाचवले. म्हणून गाईला दिलेले वचन मी पाळले. दगडाने जन्मलेल्या मुलीची नाळ तोडले. दिवस उगवतो एका रात्रीचा इंतजार करा. मराठवाड्याच्या रेल्वेलाईन भागात मी भीक मागीतली. मी गाड्या बदलल्या मात्र जिंदगी बदलली नाही. तुमच्यात हिम्मत असेल तर वाईटातून चांगले घडते, त्यामुळे स्वत: मरण्यापेक्षा मरणाऱ्यासाठी जगायला शिका. असाही मौलिक सल्ला सिंधूताई सपकाळ यांनी महिलांना दिला.
माझे संरक्षण त्या काळी भिकारी सुद्धा करीत होते. सध्या मात्र आपण माणसंच माणसावर उठलेत. तुमच्यावर आकाश कोसळलं तर त्यावर पाय ठेवून उभा रहा, सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या जीवनातील आठवणी सांगताना सभामंडपातील सर्वच गहिवरून गेले होते.
माझी मुलगी मी सोडली असून दुसरा मुलगा दत्तक घेतला आहे. एक महिला रेल्वेत भीक मागत होती. ती मेली, त्याचा हा मुलगा आहे. विनय सिंधूताई सपकाळ असे त्याचे नाव आहे व तो सध्या एलएलबी करतो. सव्वा महिन्याचे बाळ होते. तेव्हापासून मी त्याचा सांभाळ केला. मी माझ्या पतीला माफ केले आहे. माझ्या पतीच्या अध्यक्षतेखाली माझा सत्कार होताना पती रडत होते, मी हसत होते व पतीने जेव्हा मला हाकलून दिले तेव्हा मी रडत होते, माझे पती सध्या माझ्या संस्थेत आहेत.
माझ्या संस्थेला अजूनही ग्रॅन्ट नाही, अमेरिकेत डॉलर गाणार होते, मात्र तेवढा भारत देश गरीब नाही. म्हणून मी मदत अमेरिकेकडून घेतली नाही. मात्र तेथील महिलांनी डॉलर दिले. शासनाने मला पुणे मांजरी येथे चार मजली इमारत दिली. त्यामुळे शासनाकडे मी परेपर्यंत ग्रॅन्ट मागणार नाही. आ. दिलीपराव देशमुख यांनीही मांजरीला माझे पिल्ले पाहायला यावे. लोकाश्रयावरच माझी संस्था असवलंबून आहे. देवाजवळ दिवा लावून लेकरं माझी वाट पाहतात. त्यामुळे मराठवाड्याने माईची झोळी भरावी. कासविनीला दूध नसते. परंतू तिच्याकडे पाहण्याने लेकराचे पोट भरते. माझ्या संस्थेत भेटायला या असेही जेष्ठ समाजसेविका सर्वांची माय सिंधूताई सपकाळ यांनी सर्वांना विनंती केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....