ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात



ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात..
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात..
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो..
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते..
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येत
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील...

तू पाठमोरी होताना..

पापण्या ओल्या झाल्या,
तू परत फिरताना,
घन ओथंबून आले,
सांज अशी सरताना ॥

आठवणी जाग्या झाल्या,
विरह तुझा छळताना,
रात सारी जागून
गेलीचांदण्यात तुला शोधताना॥

सुंगधही विरून गेला,
पंख तुझे वेगावताना,
रंग सारे विस्कटले,
तू पाठमोरी होताना॥

किनाराही उदासून गेला,
ओहोटीत तू धावताना,
उचक्याही कंठात आल्या,
एकांत असा घालवताना॥

श्वासाही अडकून गेला,
तु नजरेआड होताना,
उर सारा भरून आला,
क्षितीजे अशी दुर जाताना॥

26 नोव्हें 2008

तू...

प्रेम माझे तूच आहे
प्रेयसी ही तूच आहे
साथ माझी तूच आहे
वेड माझे तूच आहे।।

स्वप्न माझे तूच आहे
स्वर्ग माझा तूच आहे
जिवनात या सार्या
सर्व काही तूच आहे।।


मुक्त कंठाने रडतो मी ...

रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी
नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी
नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी
एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी ........

3 फेब्रु 2008

तर...

वाटणारी प्रत्येक गोष्ट
शब्दांत मांडता आली तर...
मनातली प्रत्येक भावना
बोलुन दाखवता आली तर...

तुझ्यावर प्रेम आहे,
हे सहज सांगता आलं तर..
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही,
हे पटवुन देता आलं तर...

तुझी खुप आठवण येते
हे विसरुन जाता अलं तर....
तुझ्या पलिकडे सुध्दा आहे
हे जाणुन घेता आलं तर...

माझं सुध्दा अस्तित्व आहे,
हे समजुन घेता आलं तर...
तु फक्त माझीच आहेस,
हे तुला न सांगता कळलं तर..

तु अशिच जवळ रहा,
हे स्पर्शानं सांगता आलं तर...
तु जवळ नसतेस तेंव्हा,
तुझा स्पर्श जाणता आला तर..

किती बरं होईल,
जर मन वाचता अलं तर...
शब्दांपलिकडलं काही
तरीनजरेनच जाणता आलं तर...

हे सगळेच "तर" नाहीसे होतील
एकदाच म्हणालीस जर...
"मी सुखी होईन,
जर तु माझाच झालास तर..!"

प्रेमात पडणं सोप नसतं

प्रेमात पडणं सोपं असतं
पण प्रेम निभवणं कठीण असतं

हातात हात घेऊन चालणं सोपं असतं
पण तोच हात आयुष्यभर हातात घेऊन
पाऊलवाट शोधणं कठीण असतं

कधी कधी एकमेकांत गुंतत जाणं सोपं असतं
पण ती गुंतवणुक आयुष्यभर जपणं कठीण असतं

माझा तुझ्यावर विश्वास आहे हे म्हणनं सोपं असतं
पण तोच विश्वास कायम ठेवुन वाटचाल करणं कठीण असतं
प्रेमात खुप वचनं आणि शपथा देणं सोपं असतं
पण ती वचनं आणि शपथा निभवुन नेणं मात्र कठीण असतं

प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं
पण खरं बोलुन प्रेम टिकवणं मात्र नक्किच कठीण असतं

म्हणुन सांगतो प्रेमात पडणं
सोप नसतं, सोप नसतं, सोप नसतं ..!

20 डिसें 2007

एक प्रेयसी पाहिजे...

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर एकमेकांसोबत, घालवलेल्या
अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी..
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले
एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..
आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी
एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात
एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………
आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

एक दिवस असा होता की...

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

खाली डोकं, वर पाय !

जेव्हा तिला वाटत असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत,
तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

जेव्हा ती लाजत म्हणते,
"आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता,
"दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !"
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

तु...

खुप दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,

मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!

तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली,
वाटलं असंच तु बोलत राहावस,
माझ्या कानात गोड हसत राहावस!

तुलाही कदाचित वाटलं असेल,
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल!

वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची,
का देऊ मी याला उपमा इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!

इच्छा झाली होती काहितरी विचारायची,
तुलाही आवड होती काहितरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!

कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी

तुझ्या श्वासात राहत होतो मी
तुझ्या आठवणीत जगत होतो मी
रोज रात्री स्वप्नात माझ्या
फ़क्त तुलाच पाहत होतो मी

त्या सरसरत्या पावसातत्या ओल्या
चींब दिवसात
चोरुन चोरुन भिजत भिजत
फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी

कित्येक मित्र जवळ असुन
कुठेतरी एकटाच बसुन
फोटो तुझा समोर ठेवुन
अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी

स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना
रात्री तुला स्वप्नात बघतांना
भरदिवसा तुझे भास होतांना
तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी

आजही तुझी वाट पाहत असतांना
अजुनही तुझ्या प्रेमात जगत असतांना
माझ्यापासुन दुर, तुही दु:खी आहेस
हे तुझ्या उदास चेह-यावर वाचत होतो मी

तुझ्या विरहात एकटाच जगुन
भावना माझ्या मनातच दाबुन
आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी
कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी

माझे मन फक्त

माझे मन फक्त
तुझेच गाणे गाते...
सुर ताल आठवणींचे
मनोमनी उधळत राहते...

माझे मन तुझ्या
थकव्याचा विसावा..
तुझ्या मनाचा अल्पविरामही
पुरेसा व्हावा...

माझे मन तुझ्यासाठी
फुलांनी भरलेले मुक्तांगण...
तुझ्या चेहर्‍यावर पसरलेल्या
हास्याचे ते तुषारी आनंदवन

माझे मन तुझ्या
प्रेमाचा पसारा...
तुझ्या मायेचा हा एक
अजब खेळ सारा...

माझे मन कधी कधी
तुझ्या अश्रूधारांचा पाझर...
अन कधी भावनेच्या पुराला
घातलेला सहानभुतीचा आवर...

माझे मन तुझेच घरटे...
जिथे तुला सारे सुखस्वर्गापरी भासते..

पण तुझे मन माझीया
स्वप्नांचे माहेर...
अस्तित्वात त्यांला
तुझ्या अखंड साथिचा आहेर..

प्रेम - कुसुमाग्रज

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावणइंद्रधनू बांधील काय?

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा होजाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्याभातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धामेघापर्यंत पोचलेलं

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं

तुला मनसोक्त हसताना पहायचंय

तुला मनसोक्त हसताना पहायचंय
निदान त्यासाठी तरी मला विदूषक बनुन तुझ्यासमोर यायचय

तुझ्या मनातले सारे काही जाणुन घ्यायचय ,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनतास बसायचय.

तुझ्या मऊ केसांवरुन हळुवार हात फ़िरवायचाय ,
निदान त्यासाठी तरी एक गजरा तुज़्या केसात माळायचाय ,

तुला माझ्यासाठी बेचैन होताना पहायचय,
निदान त्यासाठी तरी ठरलेल्या वेळेच्या ऊशिरा यायचय.

तुला अनिवार रडतना पहायचय,
निदान त्यासाठी तरी मला खोट खोट मरायचय.

प्रेमात पडलं की..

प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात
खरं सांगायचं तर थोडसं
वेड्यासारखंच वागतात.


यात काही चुकीचं नाही
सहाजिकच असतं सारं
एकदा प्रेमात पडलं की
उघडू लागतात मनाची दारं

मनातल्या भावना अलगद मग
कागदावरती उतरतात
डोळ्यांमधील आसवंसुद्धा
शब्द होऊन पसरतात

रात्रंदिवस तिचेच विचार
आपल्याला मग छ्ळू लागतात
न उमजलेल्या बरयाच गोष्टी
तेव्हा मात्र कळू लागतात.

डोळ्याशी डोळा लागत नाही
एकाकी रात्री खायला उठतात
ओठांपाशी थांबलेले शब्द
कवितेमधून बाहेर फुटतात

गोड गोड स्वप्नं बघत मग
रात्र रात्र जागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसही
प्रेमात निरनिराळे अर्थ असतात
गणित, भूगोल, व्याकरण सारी
इथल्या व्यवहारात व्यर्थ असतात

अंगात फाटकी बनियन असली
तरी इस्त्रीचा शर्ट घालतात
जग जिंकल्याच्या तोरयात
छाती फुगवून ऎटीत चालतात

सभोवताली काय चाललंय
कशाचच नसतं भान
चालता बोलता तिचाच विचार
'तिचं हसणं किती छान?'

ठाणे, बोरिवलीच्या पुढे
एकदाही आपण गेलेलो नसतो
तरी तिच्यासाठी चंद्र-तारे
तोडून आणायला तयार असतो

तुझ्यावर खरंखुरं प्रेम आहे
असं हजारदा सांगतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.


तिने हातास स्पर्श केला
तरी खूप आधार वाटतो
ती समोर नसल्यावर मात्र
खोल खोल अंधार दाटतो

फार कठोर वाटणारी माणसंही
अशा वेळी फार हळवी होतात
खरं सांगतो रात्र रात्र
अंधारात एकटीच गातात

अशाच वेळी आपल्यामधील
चांगला माणूस बाहेर पडतो
हळवा होऊन दुसरयासाठी
एकदातरी मनसोक्त रडतो

आपल्या इच्छा, आपली स्वप्ने
सारीच आपण बाजूला सारतो
दुसरयासाठी आनंदाने झुरतो
जेव्हा आपण प्रेम करतो

चुकून देवळात गेल्यावरही
फक्त एकच गोष्ट मागतात
प्रेमात पडलं की सारेच जण
कविता करायला लागतात.

ओढ

जवळ माझ्या नसलीस तरी...
सहवास मला तुझा आहे...
एकल्या ह्या जिवाला....
साथ फक्त तुझीच आहे....

संध्याकाळच्या वारया सोबत...
मी तुझाच गंध अनुभवत असतो..
व्याकुळ करते तुझी आठवण..
अन श्वास घेणेही मी बंद करतो...

उघड्या डोळ्यांसमोर माझ्या...
तुझ्या आठवणींच पडदा पडतो....
जगाचा विसर पडतो मला...
असा तुझ्यात मी गुंततो

तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण...
माझ्या हृदयातुन पाझरतो...
अन विरह दु:खाने मग...
तोच गालावर ओघळतो.....

ही ओढ कसली लागली मला...
हे मला न उमजे....
सांग सये यालाच का...
प्रेम म्हणतात सारे...?

प्रेमाचा इंद्रधनू...

जिवनाच्या एका नाजूक वळणावर
भावनांच्या सागराला प्रलय येतो
प्रत्येकाच्या जिवनात कधी ना कधी"
प्रेमाच्या इंद्रधनूचा" उदय होतो

प्रेम म्हणजे भावनांच्या आकाशात
उत्तुंग मारलेली भरारी असते
स्वप्नांच्या विश्वात अधांतरी तरंगताना
नकळतच हृदयचं फरारी असते

प्रेमात हवी फक्त एक नजरभेट
स्वप्नांचे झोके झुलण्यासाठी
अवचित हलकेच स्मित हास्य
अक्षतांचं चांदणं झेलण्यासाठी

प्रेम म्हणजे भावनांपुढे
विचारांनी हार स्विकारलेली
प्रेम म्हणजे मनापुढे
मेंदूने शरणागती पत्करलेली

ठराविक व्यक्तीवर प्रेम करायचं
असं कधी ठरवायचं नसतं
प्रेमाचय रणभूमीवर
फक्त हृदय हरवायचं असतं

प्रेम म्हणजे रात्रभर
स्वप्नांचे झुलणारे झोके
प्रेम म्हणजे नाजूक स्पर्शाने
हृद्याचे वाढणारे ठोके

प्रेम म्हणजे संकटातही
पाठीशी उभी राहणारी स्फूर्ती
प्रेम म्हणजे मनाच्या मंदिरात
हाडामासाची पुजलेली मूर्ती

प्रेम म्हणजे कुंकुवाच्या रूपात
कपाळावर सौभाग्याचं रूजणं
प्रेम म्हणजे मंजळसुत्राच्या रूपात
गळ्याभोवती विश्वासाचं सजणं

प्रेम म्हणजे वेडं होणं
गर्दीत सुद्धा एकटं वाटणं
दूर कुठेतरी आकाशात
भावनांच्या चांदण्यांचं दुकान थाटणं

प्रेम म्हणजे भावनांचा समुद्र
ओहोटीचा नसून फक्त भरतीचा
प्रेम म्हणजे हृदयाचा तो प्रवास
मार्ग नाही जिथे परतीचा

खऱ्या प्रेमाचा अर्थ
खरचं किती खोल असतो
एकाच्या डोळ्यात इवलासा अश्रू
दुसऱ्यासाठी प्राणांहून अनमोल असतो

प्रेम म्हणजे भावनांचं आभाळ
ज्याला कुठेच अंत नाही
प्रेमाखातर प्राणही गेला
तरी मनाला त्याची खंत नाही

प्रेम म्हणजे बंधन
प्रेम म्हणजे स्पंदन
प्रेम म्हणजे स्वतः झिजून
इतरांसाठी सुवासणारं चंदन

कधी कधी असंख्य भेटी घडूनही
प्रेमाची भावना जागत नाही
तसं प्रेमात पडायला कधी कधी
ती भेटचं घडावी लागत नाही

प्रेम म्हणजे दोन मनांना
आपुलकीनं जोडणारा सेतू असतो
प्रिय व्यक्तीच्या सुखासाठी धडपड
हाच प्रेमाचा निरागस हेतू अस्तो

प्रेम म्हणजे प्रियजणांच्या
चेहऱ्यावर उमटणारा हर्ष असतो
प्रेम म्हणजे जिवात दडलेल्या
आत्म्याचा स्पर्श असतो

प्रेम म्हणजे भावनांची ठिणगी
जी हृदयात अवचित पेट घेते
जीवनाच्या एका नाजूक वळणावर
अविस्मरणीय स्वप्नांची भेट देते

प्रेम म्हणजे क्षितीज
मिलन दोन मनांचं
प्रेम म्हणजे ते शिखर
दोन जिवांच्या आपलेपणाचं

प्रेम म्हणजे दोन मनांचा सेतू
जो भवनांशिवाय बांधता येत नाही
प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन
नुसतं स्पर्शानेच साधता येत नाही

प्रेम म्हणजे आठवणीत वाहणं
प्रेम म्हणजे विचारात राहणं
प्रेम म्हणजे कल्पनेच्या नजरेतून
स्वप्नांचं रम्य विश्व पाहणं

प्रेम म्हणजे वहीत एखादं
गुलाब जपून ठेवलेलं
प्रेम म्हणजे मनात एखादं
प्रतिबिंब लपून ठेवलेलं

प्रेम म्हणजे सुरळीत मार्गावरही
पावलांचं अचानक अडखळणं
प्रेम म्हणजे झोपेत अलगद
उशीला हळूच कुरवाळणं

प्रेमात हे असचं असतं
संभाषणाचा भार डोळे पेलत असतात
ओठ जरी स्थिर राहिले
तरी डोळे मात्र बोलत असतात

प्रेम म्हणजे प्रिय जणांच्या सहवासात
मिळणारी शीतल छाया असते
तर कधी आईच्या कुशीत
फुलणारी वेडी माया असते

प्रेम ह्या दोन अक्षरातच
जीवनाचा खरा अर्थ दडला आहे
त्या अर्थाच्या शोधातच त
रएक जीव दुसऱ्यावर जडला आहे

प्रेम असं बंधन आहे
जे कोणासही चुकलं नाही
असं एकही हृदय नाही जिथे
प्रेमाचं चांदणं लुकलुकलं नाही

प्रेम म्हणजे विश्वास
प्रेम कधी ठरते शिक्षा
प्रेम म्हणजे पतिव्रता सीतेनी
दिलेली अग्नी परीक्षा

खरं प्रेम एकदाच होतं
ते कधीही विसरता येत नाही
शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही

प्रेम हे असचं असतं
थोडसं हसवतं,
थोडसं रडवतं
कधी शून्यात आणून सोडतं
तर कधी शून्यातून विश्व घडवतं

"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो

पाहताना तुला...

पाहताना तुला,
दिसताना तुला
सांगताना तुला,
ऐकताना तुला

काय वाटे मला,
काय वाटे तूला?
सांगतो मी तुला,
सांग तू ही मला

मन माझे असे,
झाले वेडे कसे?
प्रेम माझे असे,
काय करते कसे?
पाहताना तुला...

18 डिसें 2007

स्वप्न

ह्या खांद्यावर डोकं ठेवून
तिला झोपवास वाटतं
थोड़ा वेळ मागे थांबून
सोबत बसावसं वाटतं

ज्या स्वप्नांमधे माझ्या
सगळ्या रात्री जागतात
त्या स्वप्नांमधे हरवून
तिलाही जागावसं वाटतं

माझे आसू पुसून ती
आमच्या सुखात हसतें
छोट्या छोट्या गोष्टींमधे
खोटं खोटं चिडते

पण,
भेटीनंतर निघते म्हणताना
तिचं पाऊल आडतं
बाकी सगळ्या जगाचा
विसर तेव्हा पडतं

तिनं माझ्या प्रेमात
अगदी आकंठ बुडावं
ह्या सुंदरश्या स्वप्नातलं
सगळ खरं व्हावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....