आमच रोज एका नवीन मुलीवर प्रेम जड़ते..

आमच रोज एका
नवीन मुलीवर प्रेम जड़ते
आज हिच्यासाठी धड धड लेले ह्रदय
उदया तिच्यासाठी धड धड ते !!!१
एखादी चिकनी दिसलीच की
लगेच आम्ही ओळख काढतो,
आणी ओलखिचा मामला मग
दोनच दिवसात दिलापर्यंत पोहोचवतो....!!!!
पण साला आमच्या प्रेमाला,
कधी होकराच मिळत नाही..
एवढे प्रयत्न करूँ साला ,
एक पोरगी पटत नाही....!!!१
अहो तिला पटव न्या साठी,
आम्ही काय काय प्ल्यान आखतो.
पॉकेट मनितले ५०० रुपये
खास तिच्यासाठी ठेवतो
पण साला प्रत्येक वेळी हे
प्ल्यान चक्क फसतात
बिलापरी बिल ही जाते
अणि मित्रही आमच्यावर हसतात...!!!!१
आम्ही तसले धोकेबाज नाही
मुलीना फसवन्याचा धंधा आमचा नाही
पण एक जर नाही म्हणाली तर
दुसरिची वाट का पहु नए...!!!!!१
अत आमच्या प्रेमाला
नकार झाले लाई
आता कोणी नाही म्हणले
तरी हसू येई.....!!!
अहो प्रेम भंगात RADNARYA प्रत्येकाला
याच नवल वाटत
तिच्या नकारावर आम्हाला हसताना पाहून
यांच्या तोंड्च पानी पळत...!!!!
तश्या कॉलेज मधल्या मुली,
नेहमीच असतात खास.
त्यांचे ते अमेरिकन कपडे,
अणि सेंट चा सुवास.
त्यांच्या अश्या राह्न्यामाग्चा
उद्देश आम्ही जानतो
म्हणुन आम्ही रोज एका नवीन मुलीच्या प्रेमात पडतो ....!!!!

तू अलगद हात धरलास नि...

तू अलगद हात धरलास नि
खांद्यावर भार टाकलास
तू सावरलसं तुझ्या केसांना
पण चेहरा माझा झाकलास
 
तू अलगद हात धरलास
स्वप्नांचा मी राजा झालो
ह्या धगधगीच्या जिवना पासून
काही क्षण वजा झालो
 
तू अलगद हात धरलास
एक वेदना काळजात शिरली
मी काही बोलणार इतक्यात
शब्दाविणा कविता अवतरली
 
तू अलगद हात धरलास
स्पर्शात मी मिसळून गेलो
चिखलात रुतलेला मी कमळ
देव चरणांच्या जवळून गेलो
 
तू अलगद हात धरलास
मी झेलल्या चांदण्यांच्या गारा
तू रेषां मध्ये हरवलीस
मी रचला भविष्य सारा
 
तू अलगद हात धरलास
मी कल्पनेत बुडत गेलो
माझ्या वास्तवाची झालीस सावली
मी काट्यां मध्ये बागडत गेलो
 
तू अलगद हात धरलास
काय बोलावे तेच सुचेना
भावनांचा अख्खा गाव गिळताना
शब्दाचा एकही अंकूर फुटेना
 
तू अलगद हात धरलास, नि
माझ्या डोळ्यांत हरवून गेलीस
इवलसं घर कुठे बांधायच आहे
तू डोळ्यात वास्तू ठरवून गेलीस
 
तू अलगद हात धरलास,
नि बोटं गुंफवलीस बोटात
मनात माझीच मिरवणूक निघाली
वाजत, गाजत थाटात
 
तू अलगद हात धरलास, नि
मुक्यानेच मागून गेलीस
हृदयाला स्पर्श करून, का गं
परक्या सारखी वागून गेलीस
 
तू अलगद हात धरलास, नि
काळजाचा ठोका चुकला माझा
वर म्हणालीस, "तुला काहीच नाही कळत"
अस का वागतोस तू राजा
 
तू अलगद हात धरलास
मी त्या क्षणांचा होत गेलो
तू नसताना जवळी
तुझ्या स्वप्नांचा होत गेलो
 
तू अलगद हात धरलास
मी संथ निथळत वाहणार
तुझ्यात इतका मिसळल्यावर
माझ्याकडे कसा मी राहणार
 
तू अलगद हात धरलास
मी श्वास रोखून धरला
पुढचा श्वास मी
तुझ्या श्वासाने भरला
 
तू अलगद हात धरलास
मी रंगात भिजून गेलो
आभाळ कवेत घेऊन
मी इंद्रधनूत निजून गेलो
 
तू अलगद हात धरलास
देह माझा जरा थरथरला
कसा व कधी, कळलचं नाही
हर्शाचा थवा मनी उतरला

एकच वेळ …!!

एकच वेळ …!!
मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे …!!
मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!
मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!
मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे …!!
मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!
मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे …!!

तू अशी तू तशी…

चमचमत्या किनारीची,
तु कोरीव चांदणी,
गोर्‍या चेहर्‍यावर तुझ्या
नांदते हास्य नंदिनीतू अशी कोमल,
फुलांची गंधराणी,
तुला पाहता दरवळे,
सुंगध मनोमनी..
तू अशी शीतल,
आळवावरचे पाणी,
तुला छेडीता
अंग घेतेस चोरूनी ..
तू अशी रंगाची
रंगेल ओढणी,
टिपक्यांच्या गर्दित,
नक्षी लपेटूनी..
तु अशी मऊ,
मखमल मृगनयनी,
ठाव तुझ्या कस्तुरीचा घेता,
फिरतो मी वेड्यावानी..
तु अशी ओली
सरसर श्रावणी,
चिंब देहावर
नितळले मोत्याचे मणी..
तु अशी स्वप्नांची,
ऐकमेव राणी,
तुला आठवता
गातो मी गाणी..
तु अशी तु तशी
जिव गेला मोहरूनी,
छेडता तुला अवचित
गेलीस तू लाजूनी..

अजून मला बरंच काही पहायचंय...

अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं..

तू आणि मी..

तू सुई, मी दोरा
तू काळी, मी गोरा
तू पोळी, मी भात
तू फुटबॉल, मी लाथ
तू बशी, मी कप
तू उशी, मी झोप
तू बॉल, मी बॅट
तू उंदीर, मी कॅट
मी मुंगळा, तू मुंगी
तू साडी, मी लुन्गी
तू लव्ह, मी प्रेम
तू फोटो, मी फ्रेम
तू डोकं, मी केस
तू साबण, मी फेस
तू निसर्ग, मी फिजा
तू कविता, "मी माझा"
तू घुबड, मी पंख
तू विंचू, मी डंख
तू साम्बार, मी डोसा
तू बॉक्सर, मी ठोसा
तू कणीक, मी पोळी
तू औषध, मी गोळी
तू पेट्रोल, मी कार
तू दारु, मी बार
तू दूध, मी साय
तू केस, मी डाय
तू चहा, मी लस्सी
तू कुमकुम, मी जस्सी
तू तूप, मी लोणी
तू द्रवीड, मी धोनी
तू बर्फी, मी पेढा
तू बावळट, मी वेडा
तू कंप्यूटर, मी सीडी
तू सिगरेट, मी बीडी
तू दही, मी लोणी
तू केस, मी पोनी
तू कंप्यूटर, मी मेल
तू निरांजन, मी तेल
तू टायगर, मी लायन
तू दादर, मी सायन
तू टक्कल, मी केस
तू कन्टीन, मी मेस
तू केस, मी कोंडा
तू दगड, मी धोंडा

प्रेमाला उपमा नाही..

प्रेमाला उपमा नाही
कारण उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पानी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपला पैसे नाही,
पैस्याला नोकरी नाही,
नोकरीला डिग्री नाही,
डीग्रीला शिक्षण नाही,
शिक्षनाला कॉलेज नाही,
कॉलेजला पोरी नाही,
पोरींशिवाय प्रेम नाही,
म्हणुन प्रेमाला उपमा नाही.

आयुष्य विणतेय...

आज म्हटल आयुष्य विणायला घेउया
जमतय का ते बघुया
वाटल अगदी सोप असेल
रंगसंगती जमून आली की आयुष्यही सुंदर दिसेल

प्रश्न पडला धागे कोणकोणते घ्यायचे
एक दोनच की सगळेच वापरायचे

मग ठरवल फक्त छान छानच धागे घेऊ
एक काय दोन काय सगळेच एकमेकांत विणु

सुरुवात केली वात्स्ल्याच्या धाग्याने
धागा होता फार उबदार आणि मुलायम
म्हटल छान आहे हा धागा
धाग्याने ह्या विण राहील कायम

मग घेतला मैत्रीचा धागा
म्हणता म्हणता -याच भरल्या जगा
थोड थोड आयुष्य आकार घेऊ लागलेल
पण अजुनही बरचस विणायच बाकी रहिलेल

एक एक धागा आशेचा, सुखाचा आणि आनंदाचा घेतला
प्रत्येक धाग्यात तो आपसुकच गुंफत गेला
हळू हळू विण घट्ट होत होती
तरीदेखील कसली तरी कमी मात्र होती

मग घेतला एक नाजुक प्रेमाचा धागा
धागा होता सुंदर आणि रेशमी
धाग्याने त्या आयुष्याला
अर्थ आला लागुनी

एक एक घेतला धागा
यशाचा, कीर्तीचा आणि अस्तित्वाचा
आयुष्याला त्यामुळे एक नवा
उद्देश्य मिळाला

सगळेच धागे छान, सुंदर आणि प्रसन्न होते
तरीदेखील त्यांच्यातल्या एकसारखीपणाने मन मात्र खिन्न होते

थोड़े धागे पडले होते
निवांत बसून असेच
म्हटल बघुया तरी ह्यांच्यामुळे
आयुष्य होतय का सुरेख

मग घेतला एक धागा दुक्खाचा एक निराशेचा
एक धागा अपयशाचा आणि एक धागा पराजयाचा
हे चारही धागे विणता एकमेकांमधे
आयुष्याला खरा अर्थ लाभला त्यांच्यामुळे

अपयशाशिवाय यश नाही
दुक्खाशिवाय सुख नाही
पराजयाशिवाय जय नाही
आणि निराशेशिवाय आशा नाही

महत्व पटल आहे सर्व धाग्यांच आज मला
सुंदर सुंदर धाग्यांनिच फक्त मजा नसते आयुष्याला

साध्या सुध्या लोकरीच्या विणकामातही
रंगसंगती ही लागतेच
मग आयुष्य विणतानाच
आपल्याला भीती का वाटते?

सर्व धागे एकमेकांत विणुनच
एक परिपूर्ण आयुष्य बनत
कुठला धागा कुठे, कसा वापरायचा
हे मात्र ज्याच त्याच्यावर असत 


मैत्री अशी असते...

मैत्री अशी असते...
रातोरात रडवणारी
आसवाणी भीजवणारी
हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री

मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते

रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात

मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान

मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी

कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात

मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल

मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी
जशी....

जीवनाच्या प्रवाहात...

जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात..

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात..

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार..

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..   akshay r. virulkar mo.9175725337

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....