prawas

 

 

 

 

 




प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,


प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,

"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये

आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,

ते एका कागदावर लिहु...."

प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...

मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात

तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3

पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,

का ??
.
.
कारण की,

त्याने त्याच्या कागदावर

फक्त एवढंच लिहीलेलं असत..''मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे''

ते पण जर तु होकार देणार असशील तर.. ♥ ♥ ♥

मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना ♥ :-

५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेत काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेत ठेवणे. ♥

१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥

१५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥

१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥

२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥

२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्ना साठी केलेली मागणी. ♥

३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक. ♥

५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥

६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥

बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

स्वस्त, टिकावू, दर्जेदार बॉयफ्रेंडस विकणे आहेत...!

तुमचे सर्व लाड पुरवणारे, कधीच कटकट न करणारे,

तुम्ही केलीली बकबक शांतपणे ऐकणारे, मिसकॉल देताच फोन करणारे,

तुमच्या खरेदीचे बिल देवून ...बॅगस पण सांभाळणारे....

अतिशय उपयुक्त असे बॉयफ्रेंडस विकणे आहेत..!

एकदा वापरून खात्री बघा, न आवडल्यास बदलून पण मिळतील...!

थोड्या'कंजूस'बॉयफ्रेंड वर भारी डिस्काउॅट मिळेल..!

खास ग्राहकांच्या आग्रहास्तव'नवरे बनण्यास'लायक असे बॉयफ्रेंड पण विविध रेंज मध्ये उपलब्ध..!

खास"Exchange Offer"मध्ये आपला जुना, कंगाल

झालेला बॉयफ्रेंड घेवून या व नवा पैसेवाला घेवून जा...!

आमची कोठेही शाखा नाही..!

(ऑफर फक्त सिलेक्टेड मॉडेल वरच उपलब्ध...अति लागू )

काय लिहावं कस लिहावं हे काय कोणाला सांगाव लागतं

काय लिहावं कस लिहावं
हे काय कोणाला सांगाव लागतं
जे सांगण्यापलीकडच असतं
ते ह्रदयातून याव लागतं….


नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात …..
नजरेत भरणारी सर्वच असतात
परंतु ह्रदयात राहणारी माणसे
फारच कमी असतात ….


जीवनाच्या कोऱ्या कागदावर आठवणीचे चित्र रंगवायचे असते कारण कोणीच उरत नाही शेवटपर्यंत…..
शेवटी आपल्याला फक्त आठवनीवरच तर जगायचे असते…..

तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट

तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट


” कोणावर तरी प्रेम करण “


तुमच्या आयुष्यातील सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट


” तुमच्यावर कोणीतरी प्रेम करण “


तुमच्या आयुष्यातील सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट


” या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण “

प्रेम मागुन मिळत नाही प्रेम वाटावं लागतं

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित
भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु
म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे
धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद
उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी
पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं --

पण धाडस होत नाहि ...

पण धाडस होत नाहि ...

ती समोरून आली तरीही शब्धान्ना बांध
फुटत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
... धाडस होत नाहि ...
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच
मरतोय ,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार
करतोय ...
वही मागण्याशिवाय
कधी बोललो नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
माहित नाहि , ती मरते
का नाहि मज्ह्यावर ?
का तीच ह्रदय आहे ,फ़क्त एक "सजीव
कलेवर" ?
चांदण्यात फिरण्याचा आनंद
आम्हालाही मिळणार की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय, पण
धाडस होत नाहि ...
Valentine Day ला बूके
घ्यायला जातोय ,
खिशाचा विचार करून फुलावरच
भगवतोय ,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच
कोमेजतय ,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय ...
कितीही ठरवून गेलो तरी, ह्रदय मात्र
बोलत नाहि ,
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाहि ...
वाटतय , तिच्याही वहित असेल एखाद
फुल मज्ह्यासाठी ,
का आहे ही भोली समज
या वेड्या मनासाठी ?
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार
की नाहि ?
विचारीन विचारीन म्हणतोय,पण
धाडस होत नाही

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
.
.
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स
चा गेम
प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत
नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस
किती वर्ष???
तुला होकार द्यायला मी कधीची आहे
रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी
हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू
दे
गुंतत चालले
मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

तो चंद्र नकोय रे मला,

तो चंद्र नकोय रे मला,
फक्त तुझी शीतल सावली दे....
हे जग नकोय रे मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे...
स्वप्न माझी खूप नाही रे मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे...
नदीला या काठ दे...
वाटेला माझ्या वाट दे...
अडकलाय रे तुझ्यात जीव माझा...
आता फक्त आयुष्य भराची साथ दे...

किनारा म्हणाला लाटेला,

किनारा म्हणाला लाटेला,

नेहमीच का ग अशी घाईतच येतेस ?
... ... तहानलेले माझे अंग चिंब भिजवून जातेस

माझ्या जवळ थांबायला तुला कधीच नसतो वेळ
का बर खेळतेस माझ्याशी असा जीवघेणा खेळ ?

तुझ्यासाठीच तर मी वाट पाहतो भरतीची
तुला मात्र नेहमीच घाई असते परतीची ?

लाट म्हणाली किनाऱ्याला

तुझ बर आहे रे काठावरती तू आरामात बसतोस
थांबत नाही तुझ्याजवळ म्हणून माझ्यावरच रुसतोस ?

तुझ्याजवळच थांबाव अस मलाही खूप वाटत
धावून धावून बघ ना माझ पाणी किती आटत ?

परतले घाईने तरी पुन्हा तुझ्याकडेच ना येते ?
कितीही थांबवलं स्वत:ला तरी मन तुझ्याकडेच धाव घेते ..

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित
भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु
म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे
धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद
उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेड करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी
पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं

प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू

♥ प्रेम कधी नाही विचारत कि,"कोण आहेस तू ?" ............ ते फक्त म्हणते कि , " माझीच आहेस तू!!"
प्रेम कधी नाही विचारत कि," कुठून आहेस तू ?" .......... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच हृदयात राहतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " काय करतेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ."माझ्या हृदयाची स्पंदने चालवतेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " का दूर आहेस तू ?" ........... ते फक्त म्हणते कि ," माझ्याच जवळ आहेस तू !!"
प्रेम कधी नाही विचारत कि, " माझ्यावर प्रेम करतेस का तू ?" .............. ते फक्त म्हणते, " माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू !!" ♥

कधी येशील?????

कधी येशील?????

श्वेत नभांत निळसर आभा असेल
कुठेतरी सूर्यास्त होताना
रंग सांडलेले असतील
केशरी, गुलाबी, जांभळे
हळूहळू चांदण्याच्या दीप मला
लाखलाखायला लागतील
येशील का तू तेव्हा ???

जिथे किनारयाना धावत जाव वाटत
किनार्यांच्या मिठीत काही क्षण
लता जिथे विसावत असतील
तिथे येशील का तू भेटायला???

फुलांच्या अंगावर फुलपाखरांच्या
पंखावरचे रंग काही सांडलेले असतील
वार्यालाही जिथे बागडत रहाव वाटेल
गवताचे गालिचे दूरवर पसरलेले असतील
येशील का तू तिथे भेटायला ???
सांग ना कधी येशील ??
अबोल झाले मी माझ्याशीच
पुन्हा येऊन,
हातात हात घेऊन
स्वप्नांच्या जगात घेऊन जाशील का???

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$_

आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!___$___

खरे प्रेम केल्याचे हे फळ......प्रत्येक प्रेम करानार्याने जरुर वाचावे...



आठवण माझीही येइल मी गेल्यावर...!



रात्रि झोपेतून दचकून मी जागा होतो,

अणि या अंधारात तुला शोधायचा प्रयत्न मी करतो,

हताश होउन पुन्हा झोपायचा प्रयत्न मी करतो,

तेवढ्यात एक अश्रु डोळ्यातून गालावर ओघलतो,



सुरु होतो आठावनिचा तो खेळ,

नाही रहात पुन्हा झोपायचा ताल-मेळ,



असे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करावे,

त्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे,

आणि स्वप्नाच्या दुनियेत बांधलेले घर,

खाडकन फुटावे,



कुठे कमी पडत होतो,

प्रत्येक वेळी तुलाच तर समजुन घेत होतो,

तुझ्यावर येणार्या संकटाना,

परतीचा रस्ता मी दाखवत होतो,



तू केलेल्या प्रत्येक चुकावर,

माफ़ी मी मागत होतो,

तुझ्या चुकानी होणार्या त्रासाने ,

वेळोवेळी मीच रडत होतो,



तुझ्याकडून झालेली चुक तुला कधीच दिसली नाही,

माझ्या डोळ्यातून येणार्या अश्रुनाही किम्मत राहिली नाही,



कामाचा दबाव आहे असे म्हणून,

तू माला टाळत होतीस,

पण या कारणा खाली,

तूच माझ्या पासून दुरावत होतीस,



काम तेव्हा मीही करत होतो,

माझ्या कामाचा दबाव तुला दाखवत नव्हतो,

वाटत होते तुला माझ्या साथाची गरज आहे,

तुलाच मी समजुन घेणे हेच माझ्या नशिबात आहे,



तुझे काम हे कधी संपले नाही,

आपल्यातील वाढत गेलेले अंतर,

हे तर कधीच मिटले नाही,



दरोज झोपताना देवाकडे एकच गार्हने असते,

तू सदैव खुश रहावी हेच माझे मागणी असते,



आशा आहे तू पुन्हा माझ्याकडे परतावी,

पण तू येणार नाही हे वास्तव स्वीकारता येत नाही,



प्रेम माझे संपणार नाही मी मेल्यावर,

पण आठवण माझीही येइल मी गेल्यावर...आठवण माझीही येइल मी गेल्यावर..........

अबोल तुझ्या शब्दातले बोल तो बोलून गेला

अबोल तुझ्या शब्दातले
बोल तो बोलून गेला
निरागस तुझ्या डोळ्यातली
आसवे तो पुसून गेला

तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
उमटवूनी तो निघून गेला
ओठांवरचे नाजूक काहीतरी
नकळत तो खूलवून गेला


कोपर्‍यात हृदयाच्या
प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
पसरवूनी तो निघून गेला

दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
मैत्रीत तो जगून गेला
सतत तुझी काळजी करणारा
तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला.........................!!!

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे,

म्हणून ते प्रेम करायचे नसते,

नाही मिळाले ते परत तरी,

आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

दुखवले कितीही त्याने तरी,

हसून त्याच्या परत समोर जायचे असते,

कुठलीही अपेक्ष्या न ठेवता,

देत राहिल्याने प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

म्हणूनच नाही मिळाले परत,

तरी निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते…


प्रत्येक दिवसाला एक रात्र जोडलेली....

प्रत्येक दिवसाला एक रात्र जोडलेली....
प्रत्येक वाट मी त्या वळणावर सोडलेली...
जायचे होते मला दूर तुझ्या सोबत...
पण त्या स्वप्नाला तुझी आठवण जोडलेली...


तू जवळ आलीस कि...
तुझ्या बोटांना कुरवाळत राहतो...
हातावरच्या रेषांमध्ये तुझ्या...
माझे भविष्य पाहतो...


तू समजून गेलीस...
मला जे काही बोलायचे होते.....
जाता जाता ते क्षण देऊन गेली...
ज्यांनी मला छळायचे होते..


आज उजळल्या या दाही दिशा ..तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यात एकदा जागून पहा..
आयुष्याची मजा घेऊन पहा...
कुणी आपले नसले म्हणून काय झाले...
तुम्ही कुणा दुसऱ्याचे एकदा होऊन पहा...




प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू...
एक छापा अन एक काटा...
एकाच बाजून पाहून त्याला...
दुसरीला का असे टाळता....




आज उजळल्या या दाही दिशा ..
निळ्या नभात शोभते हि निशा...
दिवस आजचा शौभाग्याचा....
.... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

चांदण्यांच्या साक्षीने... दिलेले ते गोड वचन..

चांदण्यांच्या साक्षीने...
दिलेले ते गोड वचन....
तुझ्या माझ्या हृदयात...
सुरु आहे त्याचे सिंचन..




रुसलो मी कि तु मनवावे...
हृदयाच्या काही तारा छेडून जावे..
लाडात तू येताच मग...
चंचल मनाला लागते आवरावे...

तूच तर विश्वासाने .... दिलास हातात हात....

लावण्यवती तू आहेस जणू......
अप्सरा इंद्र नगराची ...
तू खुश असतेस नेहमीच ....
या हृदयातल्या दरबारी.


प्रत्येकाच्या पदरी...
आभाळा एवढे दु:ख...
खरी सोबत मिळाली तर....
विरतात नभी होऊन धुक




केला काय गुन्हा कि...
हि नियती माझ्यावर रुसली...
तुझी माझी प्रेम कथा..
लिहिण्या आधीच पुसली....




लिहितोय नवी कथा...
साथ तुझी फक्त दे....
प्रत्येक चुकलेल्या शब्दाला...
पुसण्यास हाथ तुझा दे....




तूच तर विश्वासाने ....
दिलास हातात हात....
अन म्हणालीस हळूच...
अजरामर राहील आपली साथ...




तुझा हाथ धरूनच....
गिरवला अ आ - आई...
तुझ्या कुशीतच ग...
शांत येते मला गाई....

गालावरून तुझ्या तो.. घसरलेला मी एक थेंब...

आज तुझ्या आठवणींनी...
पुन्हा हैराण केले...
जाता जाता त्यांच्या सोबत...
मलाच वाहून नेले...


आज तुझ्या सोबत मला...
तो समुद्र किनारा पार करायचाय...
वाळूवरून तुझ्या संगे....
दोन पावले चालायचय...




हातात तुझा हात घेता...
हृदयात होते धडधड...
सौंदर्य तुझे पाहायला....
बिचाऱ्या डोळ्यांची गडबड...



मिठीत माझ्या विसावलेली...
तुझ्या डोळ्यांची दोन पाखरे....
पापण्यांनी बोलतात काही...
तुझ्यातच माझे सुख रे....




तू मला पाहत गेलीस...
अन मी सुख शोधात होतो तुझ्यात....
तू खुदकन हसलीस अन...
आयुष्यभराचे सुख लाभले त्या क्षणात ...



हातावरच्या रेषा तुझ्या..
नागमोडी पसरलेल्या...
तुझ्या कडून माझ्या पर्यंत...
हृदयाच्या आकारात वळलेल्या...



गालावरून तुझ्या तो..
घसरलेला मी एक थेंब...
हृदयावर येताच तुझ्या...
विसावलेला मी एक थेंब...

तुझ्या शरीराला... केवड्याच्या...गंध...

तुला लपून पाहण्यात ...
एक वेगळीच मजा असते...
तू मागे वळून पाहताच....
तुझा कटाक्ष जीवघेणी सजा असते.



तुझ्या प्रत्येक आरोपाला...
मी आहे कारणीभूत...
तू नाही म्हतलेस तरी...
माझ्या विरूद्ध प्रत्येक सबूत...





मृगजळाच्या या वाटेवर..
कितीतरी वाटसरू भेटले...
त्यांना मागे सारत...
मी हे मृगजळ गाठले...




अस्तित्व नसतानाही..
प्रत्येकाला मृगजळाची ओढ आहे..
कितीही फ़सवे असले तरी...
हे मृगजळ किती गोड आहे..




पापण्यात तुझ्या ...
मला पाहताच झालेली चुलबूल..
माझ्या पापण्यांना त्याची..
हळूच लागलेली चाहूल...




शब्दांना तुझ्या मी...
गुंफ़ले एका ओळीत...
बघ सखे कसे विसावले..
ते सारे या चारोळीत..



तुझ्या शरीराला...
केवड्याच्या...गंध...
तुटो ना कधीही..हे,
आपल्या नात्याचे रेशमी बंध.

तुला माझी करण्याआधीच..

समोर तुला पाहताच...
लवतो डावा डोळा....
हसून तू पुढे गेलीस...
कि हृदयात येतो आनंदाचा गोळा...



आन्दाचे क्षण तुझ्या
हृदयात भरून जाईन...
तू समोर येताच....
मी तुझीच होऊन जाईन...



तुला माझी करण्याआधीच..
तू माझी होऊन जा...
हृदयातल्या बंद पाकळीत...
तू अलगद राहून जा...

एक मुलगी

एक मुलगी चालते आहे आपला रस्ता
खोल शांतशा डोहातील ती तरंग नुक्ता

जंतर मंतर जादू तंतर नाही तिला ठाव
तिचे तिला ठावूक आहे आपले कुठले गाव

होऊन अधीर वाऱ्यासोबत ती भांडत बसते
आपले खेळ ती ताऱ्यासोबत मांडत असते

जन्म काय ? मरण काय ? माहित नाही
कसले जगणे ..कसले वागणे ..विचारत राही

कोवळ्या नाजूक फुलापरी ती उधळी रंग
जगाच्या या रासामध्ये होते दंग

दु:खाला ती हसून टपली देते छान
खेदालाही मानत असते मान सन्मान

दिशांना ती करते आपल्या पायी चाळ
प्रिय तिलाही असेल साचा उघडा माळ

थक्क तिच्या डोळ्यांमध्ये स्वप्ने चार
तिला कधी ना या जिण्याचा झाला भार

वादळांसमोर छाती करून उभी असेल
पाहिल त्याला दिसेल ती नभी असेल

तरीही ती हळवी असेल खूप खूप
अश्रुंचेही कधी पीत असेल खारट सूप

मनी तिच्या राजस कोणी रावा असेल
इथून खूप दूर दूरच्या गावा असेल

आभाळाला पसरून बाहू म्हणते यार
काळ्याकुट्ट शाईसाठी ती ' गुलजार '

निघतानाही तिच्याचसाठी अडतो पाय
तिचे माझे नाते म्हणजे सकळलेली साय

गुणगुणताना गाणी तिची येते सय
अन् तिच्या दुरावण्याचे वाटते भय

Monday, December 5, 2011

विश्वास बसत नाही देवानंद देवा घरी गेले

हर फिक्र को धुएं में उडाता चला गया ...' असे म्हणत आपल्या सदाबहार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने हिंदी चित्रपट सृष्टीत पिढ्यानपिढ्या ' स्टार ' पण मनमुराद जगलेले असामान्य अभिनेत देव आनंद यांचे रविवारी लंडन येथे निधन झाले . हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या देव आनंद यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३ . ३० वाजता अखेरचा श्वास घेतला .

स्वत : ची वेगळी स्टाईल , वेगळ्या धाटणीची संवादफेक आणि तरल , मेलोडियस गाणी पडद्यावर जीवंत करण्याच्या अदाकारीने अनेकांच्या आयुष्यात आनंदाची पखरण करणाऱ्या ८८ वर्षांच्या देवसाब यांच्या निधनाचे वृत्त कळले आणि भारतवर्षातील त्यांच्या अमाप चाहत्यांसाठी रविवारची सकाळ सुन्न करणारी ठरली . बॉलिवूड असो की राजकारणी , समाजातल्या प्रत्येक स्तरातून देव आनंद यांच्यासाठी शोक उमटला . त्यांच्या पश्चात पत्नी कल्पना कार्तिक , मुलगा आणि मुलगी , नातवंडे असा परिवार आहे .

लंडनमध्येच बुधवारी अंत्यसंस्कार

सदाबहार अभिनेते देव आनंद यांच्या पार्थिवावर लंडन येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला असून देव आनंद यांची मुलगी व नात लंडनला पोहोचल्यावर बुधवारी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे . प्रकृतीने साथ दिल्यास देव आनंद यांच्या पत्नी कल्पना कार्तिकही लंडनला रवाना होणार आहेत .

देव आनंद यांच्या मृत्यूसमयी त्यांचे चिरंजीव सुनील देव त्यांच्यापाशी होते . वैद्यकीय उपचारासाठी त्यांना लंडन येथे काही दिवसांपूर्वी आणले होते . लंडनमधील हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते . स्थानिक वेळेनुसार रात्री दहाच्या सुमारास देव आनंद यांनी काहीच प्रतिसाद न दिल्याने सुनील देव यांनी , त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये नेले . मात्र , तेथे आणण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .

देव आनंद यांचे पार्थिवर मुंबईत आणण्याबाबतही विचार झाला होता . अखेर लंडनमध्येच अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले . कुटुंबीय लंडनमध्ये दाखल झाल्यावर मंगळवार किंवा बुधवारी अंत्यसंस्कार केले जातील , अशी ती माहिती त्यांचे व्यवस्थापक मोहन चुरीवाला यांनी दिली .

प्रार्थना सभा मुंबईत
अंत्यसंस्कार झाल्यावर देव आनंद यांचे कुटुंबीय मुंबईत परतणार असून त्यानंतर त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे .
..........

आयुष्यातील सर्व इच्छांची पूर्तता म्हणजे निवृत्तीचा क्षण ! माझे शरीर भलेही दुबळे झाले असेल , पण माझे मन अतिशय सशक्त आहे म्हणूनच मी पुढेच जात राहणार . मी केवळ जगत नाही , मी त्या जगण्याच्याही एक पाऊल पुढे आहे !
- देव आनंद
( २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका मुलाखतीत )
........

फिल्मफेअर कारर्कीर्द
१९५८ : कालापानी , १९६६ : गाईड , १९९१ : जीवनगौरव पुरस्कार . याशिवाय , मुनीमजी ( १९५५ ), लव्ह मॅरेज ( १९५९ ), कालाबाजार ( १९६० ) या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट नायकाचे नामांकन मिळाले होते .
....

वेळ माझ्या हातून निसटतो आहे !
मी सतत धावतो आहे . कारण वेळ माझ्या हातातून निसटतो आहे . मला कितीतरी गोष्टी सांगायच्या आहेत , पण वेळ कुठे आहे ? देव आनंद म्हणून मला पुनर्जन्म मिळाला , तर आणखी २५ वर्षांनी लोकांना आणखी एक तरुण अभिनेता मिळेल .
- देव आनंद ( ८७व्या वाढदिवशी )
....

ती त्रयी !
राज कपूर , दिलीप कुमार आणि देव आनंद ! या तिघांनी हिंदी सिनेमाला ग्लॅमर दिले आणि कृत्रिम नायकाच्या इमेजमधून ' हिरो ' चा आविष्कार घडवला . विशेष म्हणजे , वयपरत्वे राज कपूर आणि दिलीप कुमार यांनी सिनेमातून नायकाची कामे थांबवली . परंतु , देव आनंद मात्र कायम नायकच राहिले . १९८३पर्यंत त्यांनी जॉनी मेरा नाम , देस परदेस , हरे रामा हरे कृष्णा सारख्या सिनेमातून नवतरुणींचा नायक साकारला .
...

आय एम देव आनंद !
प्रसिद्ध अभिनेते ग्रेगरी पेक यांच्यासोबत नेहमीच देव आनंद यांची तुलना केली जात असे . स्वत : देवआनंद लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अशी तुलना फारशी पसंत नव्हती . एक काळ असा असतो जेव्हा आपल्यावर काही व्यक्तिमत्त्वांची मोहिनी असते . परंतु , जसे जसे मोठे होत जातो तसतसे आपले स्वत : चे व्यक्तित्त्व आपल्याला गवसत जाते . इंंडियाज ग्रेगरी पेक अशी माझी ओळख व्हावी , असे मला वाटत नाही . आय अॅम देव आनंद !
....

पुण्यातल्या आठवणीत रमले तेव्हा ...
मा . दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निधी उभारणीसाठी पुण्यात एस . पी . कॉलेजच्या मैदानावर लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा मोठा कार्यक्रम झाला . त्यास देव आनंद प्रमुख पाहुणे होते . कार्यक्रमाच्या मध्यतरांची वेळ आली तरी देव आनंद आले नव्हते . अखेर ते रंगमंचावर आले आणि उशिराचे कारण सांगताना म्हणाले , ' बऱ्याच दिवसांनी पुण्यात आलो . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . पुण्यातल्या रस्त्यांमध्ये आठवणी शोधत फिरत होता , म्हणून कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला '.
.....

आणखी दोन सिनेमांची तयारी !
देव आनंद यांचा शेवटचा सिनेमा ' चार्जशीट ' पडद्यावर आला आणि लागलीच पडद्याआड गेला . सेन्सॉर , मि . प्राइममिनिस्टर या सिनेमांचीही अवस्था अशीच होती . परंतु देवसाब त्यामुळे नाऊमेद झाले नव्हते . ' हरे रामा हरे कृष्णा ' च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू झाली होती . शिवाय त्यांना ' गाईड ' ही पुन्हा प्रदर्शित करायचा होता

प्रेमपत्र पहिले तिचे ,

प्रेमपत्र पहिले तिचे ,
सर्व काहीं सांगत होते.
आतुरलेल्या भावनांना ,
शब्द्फुलांनी सजवले होते.
सजवलेला प्रत्येक शब्द ,
फुलाप्रमाणे भासत होता .
अवखळ तिच्या नखरयापरी,
मनामध्ये ठसत होता .
पत्र जेंव्हा वाचुन झाले ,
आनंदाला उधाण आले .
तिच्या मधुर प्रेम वर्षावाने,
मनात प्रेमचांदणे खुलले .
पत्र तिला लिहिण्यासाठी ,
हात माझे सळसळले .
पेन घेतला , कागद घेतला ,
मग मला जाणवले .
पत्र तिला लिहीण्यापुर्वीच ,
शब्द सारे थिजुन गेले .
सुरवात , शेवट तिचीच घेतली ,
मजकुर फक्त माझा होता .
" आय लव यू "
पण तो सुध्दा तिच्या पत्रात ,
दिमाखात झळकत होता .

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं

उभं आयुष्य माझ दुखाच्या वणव्यात पेटलं
त्यावर कुणी सुखाची फुंकर घातलीच नाही
कवित्व माझ आज पण देताय ग्वाही
नशिबाने नेहमीच थट्टा केली
भाकरीच्या शोधात वाट हरवली
हजार पाचशेच्या नोटा
करीत राहिल्या मला टाटा
खिशात केवळ नाणी उरली
उभं आयुष्य वाया गेल
उर्वरित जीवनरूपी दर्पणी
स्वताच भविष्य पाहतोय
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का
एखादा कुबेर
माझ्यासाठी दार उघडेल का

आमोल घायाळ

आता माझ्या डोळ्यानी..

पाठीला पाठ लावून बसलो ..
तरी समोर तूच दिसतेस....
मागे वळून नजर भेट होताच....
लाजून गालात हसतेस...




समोर तुला पाहताच...
लवतो डावा डोळा....
हसून तू पुढे गेलीस...
कि हृदयात येतो आनंदाचा गोळा...



आता माझ्या डोळ्यानी..
तुझी वाट पाहणे सोडले आहे...
जेव्हा पासून त्यांचे नाते..
तुझ्या आठवणींशी मी जोडले आहे




अडगलीतल्या वहीत....
आज तुझी तस्वीर सापडली....
तिला पाहून मनात पुन्हा..
तुला भेटण्याची आशा जागी झाली...

खोको खोको च्या खेळात...

खोटा तुझा तो नकार....
नाकावर लटका राग....
हृदय जळतेय माझ्या साठी...
अन मनाचाही त्यात सहभाग..



तुझा माझा खेळ ..
खेळ तो भातुकलीचा....
मोठे होता होता...
मेल जुळे ना कुणाचा..




खोको खोको च्या खेळात...
तुझा नेहमीच मला असे खो...
मला वाटे तू सांगतेस...
तू फक्त माझाच हो...

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,
तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,

त्या गाजवलेल्या मद रात्री ,
त्या फुलणाऱ्या गुलाबी पहाट,

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,
ते गोड निरंतर असे संवाद,

आज न जाणो ती कुठे आहे,
तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,

या गुलाबी अशा थंडीने,
पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग

खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,




खूप थंडी आहे सखे,
मला अलवार मिठीत घे ना ग,

नकार तुझ्या ओठांवर..

मऊ मऊ चादरीत...
झोप माझी पळून जाई..
झोप मला शांत लागे..
तुझ्या मिठीतच गं आई..



दिवस सरता सरता....
तूझ्या आठवणी दाटून येतात...
तू कितीही नकार दिलास तरी....
त्या तुझ्या नकळत मला भेटून जातात...



दिशा बदलून जाते हवा....
तू येण्याचा भास होताच...
मी पण बहरून जातो....
तुझी चाहूल लागताच...




नकार तुझ्या ओठांवर...
मनात मात्र होकार....
हृदयाच्या बंद पाकळीत....
कधीच केला मी तुझा स्वीकार..

तुझ्या डोळ्यात मला... माझचं प्रतिबिंब दिसतं...

एकदा तुला भेटायचे आहे....
मांडीवरतुझ्या झोपायचे आहे...
खांद्यावर डोके ठेवून तुला...
पुन्हा पुन्हा निहारायचे आहे..



संध्याकाळचा संधी प्रकाशात.....
फुलून जातेस तू साजणे ....
तो रवी देखील विसरून जातो मग....
अस्ताला जायचे, पाहून तुझे गोड लाजणे....




चढली हि माझ्यावर ..
तुझ्या ओठांची नशा....
स्पर्श होता त्यांचा...
भुलवी माझी दिशा...




अळवावरच्या थेंबाला...
ओढ ही कुठली...
अळवाच्या पानावरचं...
त्याची जिवन शैली मिटली.



तुझ्या डोळ्यात मला...
माझचं प्रतिबिंब दिसतं...
तु मला पाहत असताना..
माझं मन ही तुझ्यात फ़सतं



तुला पाहते रे मी...
डोळ्यांचे पारणे फ़िटे पर्यंत...
डोळ्यात तुझं प्रतिबिंब साठवेन...
डोळ्यात प्राण असे पर्यंत...

आठव

सिगारॆट शिलगावताना ,
आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;

दुसऱ्यावर काठी उगारताना ,
शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;

दारुचा घॊट घॆताना ,
ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;

दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना ,
तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ;

इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना ,
तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ;

आग लावून जाळपॊळ करताना ,
तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ;

पॊलिसांचॆ फटकॆ खाताना ,
तुझी पहीली चूक आठव ;

दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना ,
तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;

स्त्रीच्या अंगावर हात टाकताना ,
तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ;

घरॆ अन वाहनॆ जाळताना ,
तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ;

हफ्तॆ गॊळा करताना,
घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ;

गुन्हॆगारांच्या यादीतला फॊटॊ पाहून ,
मित्रमैत्रिणींनी ठॆवलॆलं तुझं विशॆषनाम ( टॊपणनाव ) आठव ;

दगडफॆकीला दगड उचलताना ,
पाण्यात टाकलॆला खडा आठव ;

दंगली करुन दॆश बर्बाद करताना ,
तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;

 

 

 

 

 

स्वप्नात कुणाला असंही बघु नये

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

शब्द मी ओठावर अडखळलेला...

कधी कळलाच नाही तुझा तो ओझरता स्पर्श..
तुझं मन भरून मला पाहण...
खांद्यावर डोकं ठेऊन...
मला निहरात राहण..




शब्द मी ओठावर अडखळलेला...
शब्द मी मनात घोळणारा..
शब्द मी तुझ्या भावना समजणारा..
शब्द मी तुझ्या ओठांना बोलके करणारा..

जो हमारे बहुत करीब है

तु मला पाहुन...
रोज हसत पुढे जायचीस...
मी अजुन हि तुला पाहतोय का..?
सारखे मागे वळून पाहायचीस..




शेवटची भेट तुझी आठवता.....
आठवणी दाटतात मनात....
आठणींना पूर आला कि
जीव अडकतो कंठात...





दुर तू असलीस तरी..
तुझ्या आठवणी आहेत सोबत...
त्यांच्याच सहवासात तर..
मी रोज असतो रात्र रात्र जागत..



जो हमारे बहुत करीब है
उसे हम छू नही सकते
शायद इसे 'मजबूरी' कहते है, जो हमे
चाहता है
उसे हम पा नही सकते
शायद उसे 'नसीब' कहते है!"
इसी 'मजबूरी' और 'नसीब' के बीच एक
रिश्ता पनपता है
शायद इसे "मोहब्बत" कहते है!!...

चेहरया वरचा पदर जेव्हा..

तू बोलत असलीस कि..
नुसतेच तुला पाहत असतो.....
तुझ्या प्रत्येक शब्दाला....
माझ्या कवितेसाठी चाळत असतो...




चेहरया वरचा पदर जेव्हा..
हातुन तुझ्या सरकतो....
आकाशातील चंद्र देखील..
त्याचे प्रतिबिंब पाहून फ़सतो..



तुझ्या साठी जगायचे आहे....
तुला स्वप्नात जागवायचे आहे...
डोळे मिटता समोर तूच दिसावीस....
असेच काहीसे स्वप्न रोज पहायचे आहे...




रंग मी चढवला....
तुझ्या प्रेमाचा अंगावरी...
दूर असूनही तू, नाव तुझे....
सतत येते ओठावरी...



तुझ्या सौंदर्याने माझ्या ...
दाही दिशा सजलेल्या..
तुझ्याच स्वप्नात मी माझ्या...
साऱ्या रात्री जगलेल्या...




पोहचू दिलेच नाही कधी तुझ्या पर्यंत...
जे लपलय माझ्या शब्दात...
कसे सांगू गं तुलां मी....
अजुन ही जपतोय तुला स्वप्नात..

Wednesday, November 30, 2011

तु काल अनपेक्षित समोर आलीस...

तु काल अनपेक्षित समोर आलीस...
हृदयाच्या बंद दाराला ठोटावून गेलीस...
मी तुला विसरलो नाही अजुन..
याची जाण मला तू देऊन गेलीस..




कित्येक वर्षांनी लावलेला..
हाताच्या बोटावरून नेम...
असा आज रंगला होता..
छोट्य़ांसोबत गोट्यांचा गेम..

गुलाबी ओठांना तुझ्या... आकार त्या गुलाबाचा...

गुलाबी ओठांना तुझ्या...
आकार त्या गुलाबाचा...
स्पर्श करता फ़ुलुन
संच हा दोन गुलाब पाकळ्य़ांचा.



मी थेंब तो एक....
पानावरच आयुष्य जगलेला...
एवढसं माझं आयुष्य...
की त्या पानावरच विरलेला.




तु काल अनपेक्षित समोर आलीस...
हृदयाच्या बंद दाराला ठोटावून गेलीस...
मी तुला विसरलो नाही अजुन..
याची जाण मला तू देऊन गेलीस..

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....