मी

मी एक भास आहे
चार दिवसांसाठी खास आहे
पुरलो तर अमरत्व
नाहीतर कोरडा घास आहे

मी एक दवबिंदू आहे
दोन मिनिटांचेच अस्तित्व आहे
नसेल जरी दीर्घायुष्य
तरी सूर्यप्रकाशात मला हिर्या-मोत्यांची चकाकी आहे

मी एक फूल आहे
लवकरच कोमेजनार आहे
आहो तोपर्यंत मात्र
बाग सुगंधित ठेवणार आहे

मी एक सूर आहे
क्षणांसाठीच ओठांवर आहे
क्षणांसाठीच का होईना
हृदय हेलाऊन टाकणार आहे

मी एक कविता आहे
एका पानावरच साम्राज्य आहे
कळले माझे अर्थ ज्याला
डोक्यात चिंगारी पेटनार आहे

मी एक स्वास आहे
जगण्या आणि मरण्यातला
जाण्यापुर्वी प्रतेकाला
जगन शिकविनार आहे

मी एक आस आहे
विश्वास असणार्‍र्यासाठी सर्वश्व आहे
जग ज्याच्यावर टिकून आहे
असा एक आशावादी द्रुष्टिकोन आहे

मी एक वेळ आहे
सर्वांसाठी एक आहे
सोबत राहणार्यांच जिंकन
मागे राहणार्यांच हरण निश्चित आहे

मी एक माणूस आहे
तुमच्यामधलाच एक आहे
वेगळेपण माझ जपण्या
सतत प्रयत्नशील आहे

मी एक थेंब आहे
काहीतरी खास आहे
पाण्यात तेलाच
तेलात पाण्याचा अंश आहे

मी एक अश्रू आहे
न बोलत व्यक्त करण्याचे गुपित आहे
मुकया भावना अनावर झाल्यावर
हृदयाचे तुकडे डोळ्यांतून वाहणार आहे....akshay virulkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....