हिची, तिची कहाणी
'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?
'ही'चा नवरा मुलांना उठवून तयार करत असतो तेव्हा 'ही' स्वतःची तयारी करता करता मुलांचे डबे भरत असते. मुलांना शाळेत सोडलं की 'ही'सुद्धा ऑफिसच्या दिशेने सुसाट निघते. गडबडीत 'ही'चा ब्रेकफास्ट कधीच होत नाही.
रस्त्यात ट्रॅफिक जॅम नेहमीचाच. बुडाखाली गाडी असली म्हणून वेळेत पोहोचणं शक्य आहे असे थोडेच असते? पण मग गाडीत कोंडलेली हीच काय ती वेळ 'हिची' स्वतःची असते. अचानक आज तिला १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवतो. हिची नवी पहिली नोकरी आणि वरळीला हिच्या ऑफिसच्या फूटपाथवर बसणारी "ती". पथारी टाकून काहीबाही प्लास्टीकचे कंगवे, फण्या, आरसे विकायला बसलेली. बाजूला तिची ३-४ वर्षांची पोरगी खेळत असायची आणि मांडीत ६-८ महिन्यांचं दुसरं पोर. मध्येच कधीतरी गिर्हाईक आलं तर ते बाळ, त्या मुलीच्या मांडीत जाई. तिची मांडी ती केवढी! ते बाळ अर्धवट जमिनीला टेकलेलं. धुळीने माखलेल्या मुठी चोखत असायचं. ते विरलेले कपडे, पिंजारलेले केस, वाहणारी नाकं; पोरांचा अगदी अवतार असे.पोरांच्या नाकातून वाहणारा शेंबूड पुसायलाही आईला उसंत नसायची. उन्हा-तान्हात सुकायला घातल्यागत दिवसभर ती पोरं फुटपाथवर बसलेली असत. राग यायचा तेव्हा. 'सांभाळायला जमत नसेल तर कशाला जन्माला घालतात हे लोक ही पोरं?' असं वाटून जायचं. कधीतरी, रडणार्या मुलीला वसावसा ओरडताना आणि फटके देताना पाहिलं की जाऊन 'तिलाच' समज द्यावी असं वाटायचं.
पण मग कधीतरी समोरच्या चहावाल्याकडनं घेतलेला चहा फुंकून पोरीला देणं, दुपारच्या वेळी भाकरी पावाचा तुकडा भरवणं आणि भर रस्त्यावर पदराच्या आडोशाखाली बाळाला घेणं... तिच्यातल्या "आई"ची जाणीव करून द्यायचं. कदाचित इतरवेळेस, ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा तिला. प्रत्येकाची अडचण असते. मागून हल्का हॉर्न ऐकू येतो. ही भानावर येते. ट्रॅफिक सुटलं आहे.
इतकं करूनही ऑफिस गाठेपर्यंत उशीर होतो. नेहमीचंच आहे. रोज फक्त कारणं बदलतात. मस्टर वगैरेची भानगड नसली तरी आजूबाजूच्यांचे डोळे बरंच काही बोलून जातात. परवा तर मिटींगमध्ये उशीर झाला तेव्हा बॉसने 'पुढल्यावेळी तुमच्याकडून सर्वप्रथम अपडेट्स घेणार हं!' असा टोमणा मारला.
ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्ध्या तासात शाळेतून फोन येतो. 'मुलीचं अंग गरम आहे. घरी घेऊन जा.' ती नवर्याचा नंबर फिरवते पण तो मिटींगमध्ये आहे. फोन बंद. गेल्या आठवड्यात मुलगा घरी राहिला होता. सडकून ताप भरला होता तेव्हाही ऑफिसला दांडी मारावी लागली होती. नवरा टूरवर बाहेरगावी गेला होता. मुलाला शाळेतून 'पिक-अप' केलं, डॉक्टरकडे नेलं आणि पुढले दोन दिवस घरातून काम केलं. सर्व मिटींग्जना डायल-इन केलं. मुलाला हवं नको ते बघत कामही केलं.
मुलाचं डोकं दुखत होतं, तापाने अंग फणफणलं होतं. पाच वर्षांचा तर आहे. त्याला तू एकट्याने खोलीत झोप सांगितलं तर पटत नाही. आई जवळ लागते. 'ही'चा हात अंगावर ठेवलेला असला की शांत राहतो पण त्याला जवळ घेऊन मिटींगला डायल-इन कसं व्हायचं? खूपच पंचाईत झाली होती. शेवटी टीव्ही लावून दिला, कोंडून घातलं त्याला खोलीत आणि फोन लावला. नजरसारखी खोलीकडे जात होती. टीव्हीच्या आवाजात त्याच्या कण्हण्याचा आणि रडण्याचा आवाज पोहोचला नाही तर?
आणि आता पुन्हा मुलीचं आजारपण. 'ही' बॉससमोर उभी राहते. नजर ओशाळवाणी. 'मी घरी जाऊ का? मुलीला बरं नाहीये.' ही हळूच विचारते.
'आजही?? ३ वाजता क्लायंटबरोबर मिटींग आहे. डायल-इन करणं फारसं बरं दिसत नाही.' बॉस नाराजीने म्हणतो.
'मुलीला ताप आहे. शाळेतून फोन आला होता.' सांगताना 'ही'च्या डोळ्यात पाणी तरळतं.
'ठीक! पण ३ वाजता नक्की मिटींगला डायल-इन हो.' बॉसचा आवाज नरमतो पण डोळ्यातली नाराजी कायम राहते.
'ही' पर्स उचलून तडक बाहेर पडते. डोकं भणभणतंय. हे सर्व चाललं आहे ते पोरांसाठीच. त्यांच्या भविष्यासाठी. एकाच्या पगारात नाही भागत. दोन मुलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची ऐपत हवी म्हणून हा खटाटोप. मुलांना चांगलं आयुष्य जगायची सवय झाली आहे. भीती वाटते ती या आयुष्याला त्यांना मुकावं लागलं तर? संसाराची दोन्ही चाकं चालताहेत. एक चाक मोडलं तर? 'ही'ला नोकरी करायलाच हवी. मंदीचे दिवस आहेत. दोघांपैकी कोणाची नोकरी कधी सुटेल याचा नेम नाही. संसाराचं गाडं चालत राहायला हवं.
'ही' मुलीला शाळेतून पिक-अप करते. मुलगी तापाने फणफणली आहे. शाळेतली नर्स विचारते 'मुलीला शाळेत पाठवतानाच ताप असावा. तुम्ही पाठवलीतच कशी?'
'ही'च्याकडे उत्तर नसतं. सकाळच्या घाईत झोपाळलेल्या मुलीला शाळेत पाठवलेलं असतं. ती कुरकुरत होती किंवा तिचं अंग गरम होतं हे पाहिलेलंच नसतं. 'ही' पुन्हा ओशाळवाणी होते.
'ही' मुलीला उचलूनच घरी आणते. घरी आल्यावर तिचा ताप मोजते. १०४ भरतो. मुलीला ग्लानी आल्यासारखीही वाटते आहे. घरात दुसरं कोणी नाही. मुलीला हाका मारते पण ती 'ओ' देत नाही. तिची तब्येत खरंच खूप बिघडली असावी. 'हीला' काय करावं ते क्षणभर कळत नाही. 'ही'ला रडू फुटतं पण रडता येत नाही. सांत्वन करायला कोणी नाही. 'ही' एकटी. या घरात आणि या देशातही. ही नवर्याला फोन लावते. तो येतोच म्हणून सांगतो.. तू तिला इमर्जन्सीला ने... तशी 'ही' तडक निघते.
मुलीला उचलते आणि सुसाट गाडी हाकत इमर्जन्सी रूममध्ये पोहोचते. नवराही येतो. दोघे काळजीत. डॉक्टर सांगतात फ्लू आहे. तिला पुढले ४-५ दिवस तरी शाळेत पाठवू नका. 'ही' नवर्याकडे बघते. तो नजर फिरवतो. परवा बाहेरगावी जायचं आहे म्हणतो. 'ही' मान हलवते.
आता मुलगी बरी आहे पण डॉक्टरांनी ओव्हरनाइट हॉस्पिटलला राहायला सांगितलं आहे. 'ही'ला आठवतं की मुलगा शाळेतून घरी यायची वेळ झाली.
'ही' पुन्हा सुसाट घरी. नवरा मुलीजवळ थांबतो. 'ही' मुलाला शाळेतून घेऊन येते. त्याला दूध गरम करून देते आणि जरा सोफ्यावर टेकते. सकाळपासून 'ही'च्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही... 'ही'चं डोकं गरगरतं. अचानक नजर घड्याळाकडे जाते. ४ वाजायला आलेले असतात. ३ वाजताची मिटींग चुकलेली असते.... तिला फारसं काही वाटत नाही कारण डोकं आधीच "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" या विचाराने भरून गेलेलं असतं.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा