राजकारण

राजकारणाची लाट आता
गावा-गावात वाहू लागली
लहान-लहान गोस्टिंसाठी लोक
मंत्र्यांना भेटू लागली

लहान लहान गोस्टिंचा लोक
आता गाजावाजा करू लागले
नैसर्गिक आपत्तिमध्येही प्रतेकजण
थोडा-थोडा तेल टाकु लागले

आग विझवण्याचे कोणी एक
प्रयत्न करत नव्हता
आग विझवतोय हे भासऊन
पाण्याएवजी रॉकेल टाकत होता

आगीचा मुद्दा आता
राजनितिक झाला होता
दोन्ही पार्टयान्ना झगडण्याचा
मुद्धा भेटला होता

जो तो आपापली
ताकत आजमावत होता
नेतेगिरी करण्यासाठी
पुढे सरसावत होता

शेवटी काय होणार होत
प्रश्न थोडीच सुटणार होत
घर जळाले ते जडलेच
पण माणूस तरी कुठे वाचणार होत

कोण म्हणतो रजनीतिमध्ये
प्रश्न सोडवले जातात
प्रश्नांच्या चींध्या करून
नंतर कॉंप्रमाइज़ केले जातात

गरीब बिचारा उपाशी मरतो
पण नेत्यांना पार्टी चारतो
कुत्रे आपल्या ओळखीचे म्हणून
त्यांच्याकडुनच लचके तोडून घेतो...akshay R.virulkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

shivaji महाराज.......