लक्षात नसलेला बाप

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशा अनेक ओळी, कविता, चारोळ्या, तुम्ही ऐकल्या असतील वाचल्या असतील. एवढेच नाही तर आई या विषयावर आपल्या थोर लेखकांनी पुस्तकच्या पुस्तक लिहून ठेवली आहेत आणि तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपल्या बाई किंवा गुरुजींने पण आपल्याला आई ह्याच विषयावरच निबंध लिहायला किंवा भाषणे बोलायला सांगितली असतील. अशी ही आहे आईची महती आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत वाचत आलो आहोत. काय चुकीच आहे त्यात, आई आहेच मुळात एवढी श्रेष्ट.
पण आईला महत्व देता देता आपण आपल्या बापाला म्हणजेच वडिलांना कधी विसरलो ते समजले देखील नाही. वडील, पप्पा, डॅडी, बाबा हेच शब्द ऐकायला किती बरे वाटतात पण ह्याच शब्दांची जागा आता एका ‘बाप’ या शब्दानी घेतली. आपण एकाध्या ला विचारताना सहज विचारतो की अरे तुझ्या बापाचे नाव काय ? पोरा पोरानं मध्ये आपण एकाध्याला सहज त्याच्या बापाच्या नावाणे चिडवतो किंवा हाक मारतो पण मुळात आपण हेच विसरतो की त्याच बापामुळे आपली आज ओळख आहे अस्तित्व आहे. काही महारथी पोर आपल्या बापाचा उल्हेख ‘हिटलर’ म्हणून देखील करतात ते बोलताना सहजच बोलतात की ‘अरे आज घरी शांतता आहे कारण आमचा हिटलर घरात नाही’. तोच बाप घरी आला की बोलतात आला हिटलर घरात.
खरचं का हा बाप आहे एवढा वाईट ? हा प्रश्न तुम्हीच तुमच्या मनाला विचारा. दारू पिणारे आणि दारू पिऊन शिव्या देणारे, मारणारे बाप देखील असतील ना. नाही कुठे बोलतो मी, पण शंभरातले दोन टक्केच असतील. आपण आता पर्यंत नाण्याची एकच बाजू बघत आलेलो आहोत, पण ह्या बापाची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्नच कधी केला नसावा किंवा गरजच वाटली नसावी.
आई घराचे मांगल्य असते पण बाप त्या घराचे अस्तित्व असतो पण ते अस्तित्व आपण मान्यच करत नाही. उलट त्या अस्तित्वाची आपल्याला एका प्रकारे भीती वाटते किंवा त्रास होतो. पुराणात पण आईलाच जास्त महत्व दीले गेले आहे. तिच्यावरचं कविता आणि श्लोक लिहिले गेले आहेत. जिजाऊणे शिवाजी घडवला पण त्या साठी शहाजीने मात्र जीवाचे रान केले. श्रीकृष्णातील देवकी व यशोधा आपण पहिल्या पण भर पावसातून श्रीकृष्णाला आणलेल्या वासुदेवाला मात्र आपण विसरलो. राम हा कौसल्याचा पुत्र असला तरी पुत्र शोकाने मात्र दशरथच मरण पावला. हे फार कमी लोकांनाच माहिती आहे.
आईकडे अश्रूंचे पाट असतात पण बापाकडे संयमाचे घाट असतात. रडणारी आई सर्वांनाच दिसते पण आतल्याआत तडफडणारा बाप कोणाला दिसत नाही. आई रडून मोकळी होते पण सांत्वन मात्र वडलांनाच करावे लागते. शेवटी जोती पेक्षा समईच जास्त तापते ना ? तरी पण जास्त महत्व मात्र जोतीलाच मिळते. बिचाऱ्या या बापाला स्वताचा बाप मेला तरी रडता येत नाही, का तर लहान भावंडाना आधार द्यायचा असतो. स्वताची आई गेल्यावर लहान बहिणींना साभाळायचे असते. एखाद्या लग्न सोहळ्याला आपण सर्व जातो पण कोणाच्या अंत यात्रेला बापालाच जावे लागते. स्वताची पत्नी सोडून गेली तरी काही बोलता येत नाही कारण लहान पोरांना सांभाळायचे असते. आपल्या खेळण्या-बागडण्याच्या वयात लहानपणीच शिक्षण सोडून स्वताच्या भावनडांची आणि घराची जवाबदारी आपल्या नाजूक खांद्यावर घेण्याचे दु:ख काय असते ते फक्त या बापालाच माहिती असते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आपण विसरतो.
वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपलांकडे पाहिलेकी त्यांचे प्रेम कळते आणि त्यांची फाटकी बनियान पाहून कळते, आपल्या नशिबाची भोके त्यांच्या बनियानला पडलि आहेत. वडलांचा दाडी वाडवलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलगा सलून मध्ये जाऊन पन्नास-साठ रुपये खर्च करेल मुलगी दहा वेळा ब्युटी पार्लर मध्ये जायील, पण तोच बाप दाडीचा साबन संपला तर अंगाचा साबण लावून दांडी करतो. तो आजारी पडला तर कधी लगेच डॉक्टरकडे जात नाही, त्याला आजारी पडण्याची भीती मुळीच नसते पण काळजी असते ती डॉक्टर घरी बसून आराम करायला सांगेल याची. तो पोरांना दर महिन्याला कपडे घेयील बायकोला महागातली साडी घेयील पण स्वता मात्र जुनेच कपडे वापरेल. का ? तर फक्त महिन्याचा बजेट सांभाळण्यासाठी. पोराला पोरीला अयपत नसेल तरी इंजीनीयरिंग, मेडिकलला घालेल. दर महिन्याला न चुकता पैसे देखील पाठवे. पण सर्वच नसले तरी काही कारटी त्याच पैशानी परमीट रूम मध्ये मित्रानां पार्ट्या देतात. घरामध्ये कोण जर खरच बापाला ओळखत असेल तर ती असते त्याची लेक म्हणजेच पोरगी. पण ती पण शेवटी कुणाच्या प्रेमात पडली तर तीही ह्या बापाल विसरते आणि त्याला सोडून सासरी निघून जाते. बाप सहसा श्रीमंत पोरीच्या घरी जात नाही. पण गरीब मुलीच्या घरी महिन्यातून एक तरी चक्कर नक्कीच मारेल. पोराला चांगली नोकरी मिळावी म्हणून साहेबाचा उंबरठा झिजवणारा बाप देखील हाच असतो. पण बायको आल्यावर बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारा आणि बायकोच्या हातात पगार ठेवणारा पोरगा देखील तोच असतो. चटका बसला ठेच लागली तर आईग.... असा शब्द लगेच बाहेर येतो पण एखादा ट्रक समोर आला तर बापरे चं शब्द बाहेर येतो म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टीनं साठी आई चालून जाते पण मोठ्या गोष्टीनं साठी बापच लागतो. पोरगा पास झाल्यावर त्याचे कौतुक करणारी आई मात्र दिसते पण गुपचूप पेडयांचा पुडा आणणारा बाप कोणाला दिसत नाही.
शेवटी काय तर कोणाचा मुलगा होणे टाळता येत नाही पण बाप होणे टाळता येते पण तो तसे करत नाही. जो पर्यंत बाप आहे तो पर्यंत त्या आईला महत्व आहे, बाप घरात असलेल्या घरात कोण वाकड्या नजरेने बघत नाही. का तर तो त्या घराचा कर्ता असतो वडीलधारा असतो. तो काही करत नाही पण घराला आणि घरातल्यांना एकत्र धरून असतो. म्हणूनच बाप बाप असतो. तरी पण या बापाला आपण अस का विसरतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......