सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय......

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय.
जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
ही कही उपकाराची भाषा नाही.

आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही.

मी विसरून गेले होते,

आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.

हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.

म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय.

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मावल्यांनो,लेकीबाळींनो.तुम्ही शिकलात सवरलात.

पण नको तेवढ्या शहाण्या झालात.

विकृत स्त्रीमुक्तीच्याप्रत्येकजणी कहाण्या झालात.

माझा वारसा सांगून,स्वार्थासाठी राबता आहात.

या सगळ्या संतापापुढेआज मी भिड्भाड भुलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

बाईपणाचे दु:ख काय असते?

मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.

आरशात पाहून सांगा,

मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?

तकलादू आणि भंपकस्त्रीमुक्तेची नशातुम्हांला आज चढली आहे.

कपडे बदलेले की,पुरोगामी होता येते,

ही फॅशन तुम्ही पाडली आहे.

शिकली सवरलेली माझी लेकसंस्कृतीच्या नावाखालीनाकाने कांदे सोलतेय..

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मान नको,पान नको,आमचे उपकारही फेडू नका.

किर्तन-बिर्तन काही नकोझोडायची म्हनूनभाषणंही झोडू नका.

वाघिणीचे दूध पिऊनकुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.

धर्म-संस्काराच्या नावाखालीटाकाऊ परंपरा पाळीत आहात.

तुमच्या

चिपाडलेल्या डोळ्यातम्हनून हे अंजन घालतेय...

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला

आज काहीसुद्धा सोसायचे नाही.

काढणारे काढीत आहेततुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.

तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे.

एखादा दुसरा ’यशवंत’ शोधूनत्याला आधार द्यायला पाहिजे,

शाळा कॉलेजचे पिक तरहायब्रिडसारखे डोलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचारालापुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,

यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.

फक्त नवरे बदलणे,घटस्फोट घेणे,ही काही स्त्रीमुक्ती नाही.

माझी खरी लेक तीच,जी सत्यापूढे झुकत नाही.

सावित्री आणि ज्योतिबांपूढेआंधळेपणाने माथा टेकत नाही.

माझी खरी लेक तीच,

आम्हांलासुद्धा नव्याने तपासूनस्वत:ची भाषा बोलतेय.

आमचाही वसातावून-सुलाखुन पेलतेय.....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

आमच्याच मातीत,

आमच्याच लेकरांकडूनदूजाभाव बघावा लागला.

माझा फोटो लावण्यासाठीहीसरकारी जी.आर.निघावा लागला.

आपल्या सोईचे नसले की,

विचारांकडेही कानाडॊळा होतो.

समाजासाठी काही करायचे म्हटले की,

पोटात प्लेगचा गोळा येतो.

ज्योतिबांशिवाय सावित्री,

सावित्रीशिवाय ज्योतिबा,

समजून घेता येणार नाही.

विचारांची ही ज्योती,

एकटी-एकटी नेता येणार नाही.

सुनांना लागावे म्हणून तरलेकींनो,

तुम्हांला बोलतेय....

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...


आत्ता तरी आपण स्वतःला बदलणार का?

की चाललंय तस चालू देणार????

येणारा नवीन जीव तुमच्या प्रयत्नांची वाट बघतोय...............

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....