ओळी फक्त माझ्या आईसाठी...........
......................
विश्वास ठेव तू मजवर आई
जन्म दिलास तू मजला
ऋण फेडू कसे मी आई
आयुष्याच्या त्या क्षणाला
सोसलेस तू माझ्यासाठी
दिलीस तू छत्राखाली छाया
कुरवाळत तू केलीस माया
नाही समजले मी या वेड्या प्रेमाला
कमनशिबी आज मी ठरले गं!
विश्वास ठेवू तू मजवर आई।।१।।
या मायेेचा गंध निराळा
दरवळत तो हृदयापाशी आला
जाता-जाता सांगून गेला
जिथे असशील तू वेड्या जीवा
सदैव असेल माझी साथ रे तुला
नाही समजले या वेड्या मनाला
वाट तुझ्याविना आज हरवले गं।
विश्वास ठेव तू मजवर आई ।। २।।
सांगते आज सत्य तुला जिंकीन हे सारे जग गं
अपेर्न तुझ्या चरणावर सांगेन अभिमानाने साऱ्या जगाला
तूच माझा गुरू, तुच माझा परमेश्वर
तूच माझी करुणा तूच माझे सर्वस्व गं।
विश्वास ठेव तू मजवर आई।। ३।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा