करिअर

करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे काही त्यांच्या क्षेत्रात मिळवतात ती त्यामुळे संबंधित क्षेत्रातली आदर्श होतात. मग तुम्ही आम्ही मागे का?

करिअरचा नेमका अर्थ कळला तर हे कोडं सुटू शकतं. शाळा कॉलेजमध्ये असताना अमुक तमुक क्षेत्रातलं शिक्षण घेणं करिअर असतं. कॉलेजमधून बाहेर पडताच एखादी तगड्या पगाराची नोकरी मिळवणं करिअर होतं. थोडा काळ तिथे जातो न जातो तेव्हा प्रमोशनपासून परदेशातजाण्यापर्यंतचे वेध लागू लागतात, त्याला करिअरचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यात करिअर कुठे आहे. इथे आपणच विणलेल्या कोशातून बाहेर पडायला हवं. नेमकं आपल्याला काय हवं, हे उमजायला हवं.(हीच तर खरी गोम आहे) एखाद्या भल्या मोठ्या क्षेत्राची निवड करण्यापेक्षा आपल्याला काय करायला आवडतं, हे शोधून काढलं तर उत्तम. मेडिकलला जायचंय असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर व्हायचंय की फार्मा कंपनी काढायची हे आताच ठरवा. इंजिनीअर व्हायचंय असं म्हणून भागणार नाही. त्याच्या भारतातच ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत.

राहुल गांधीला कधी डान्स करताना पाहायलंय का, मुकेश अंबानीला क्रिकेट खेळताना पाहयलंय का, उत्तर अर्थातच नाही असतं. यांनी त्यांच्या आयुष्यात एका ठराविक गोष्टीला प्रचंड प्राधान्य दिलंय. त्यामुळं त्यांची कारकीर्द घडत जाते. शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर ते आयुष्याच्या एका टप्प्यावर फक्त उपजिविकेचा मार्ग निवडून थांबत नाहीत तर तो मार्ग जगायला सुरुवात करतात. त्यामुळे कोट्यवधीतून कुणीतरी एकच शास्त्रज्ञ होतो, एखाद्यालाच नोबेल मिळतं, श्रीमंतांच्या यादीत येणारी माणंस हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात, संपूर्ण देशाची सत्ता हाती घेणारा तर विरळच, त्यामुळे उपजिविकेचा मार्ग म्हणजेच करिअर निवडा आणि त्याला तुम्ही किती डायमेन्शन्स देऊ शकतात ते पाहा. यश त्यातच तर लपलेलं नाही ना…

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....