स्वामी विवेकानंदांचे विचार ..
स्वामी विवेकानंदांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. पण ‘नर करनी करे, तो नर का नारायण हो जाये|’ म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. नरेंद्रांचे विवेकानंद झाले ते निव्वळ त्यांच्या विचारधारेवर. जगातल्या प्रत्येक घटनेवर त्यांचे विचारधन हे सामान्यांना विचार करायला लावणारे आहे. अंधश्रद्धेबद्दल बोलताना ते म्हणायचे, श्रद्धेला डोळे नसतात. ती आंधळी असते. फार तर श्रद्धेचा एक मार्ग आहे आणि ज्ञानाचा एक मार्ग आहे. परंतु श्रद्धेचे अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा असे दोन प्रकार करण्यात काहीच अर्थ नाही. दुखावणे योग्य नाही. ज्याला स्वतःला प्रगती करून घेण्याचा मार्ग सापडत नाही तो श्रध्देचा मार्ग स्वीकारतो. तो मार्गच बंद केला तर त्याची प्रगती न होता अधोगतीच होईल. रोज सायंकाळी स्वामी गंगेच्या काठावर बसून विचार करीत असत. काशीमधले साधूसंत, संन्याशी स्वतःत मग्न आहेत. भारतातल्या तरुण पिढीला प्राचीन व समृद्ध वारशाचे भान नाही. ही आंग्लाळलेली पिढीसुद्धा स्वतःत मग्न आहे. या सर्वांचा मेळ घालण्यासाठी परस्पर संपर्क व समाजातल्या सर्व थरांतील लोकांपर्यंत संवाद साधणारी एखादी यंत्रणा उभी रहायला हवी, धर्मशास्त्...