पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
५०१) मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का ! ५०२) बुडणायांना किनायावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! ५०३) मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. ५०४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप ! ५०५) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने पत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. ५०६) आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. ५०७) आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. ५०८) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. ५०९) अपमानाच्या पाययावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. ५१०) आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हियाला घणाचे घाव सोसावे लागते. ५११) आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते. ५१२) आशा ही उत्साहाची जननी आहे. ५१३) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ५१४) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्स...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

स्वामी विवेकानंदांचे विचार ..

स्वामी विवेकानंदांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. पण ‘नर करनी करे, तो नर का नारायण हो जाये|’ म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. नरेंद्रांचे विवेकानंद झाले ते निव्वळ त्यांच्या विचारधारेवर. जगातल्या प्रत्येक घटनेवर त्यांचे विचारधन हे सामान्यांना विचार करायला लावणारे आहे. अंधश्रद्धेबद्दल बोलताना ते म्हणायचे, श्रद्धेला डोळे नसतात. ती आंधळी असते. फार तर श्रद्धेचा एक मार्ग आहे आणि ज्ञानाचा एक मार्ग आहे. परंतु श्रद्धेचे अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा असे दोन प्रकार करण्यात काहीच अर्थ नाही. दुखावणे योग्य नाही. ज्याला स्वतःला प्रगती करून घेण्याचा मार्ग सापडत नाही तो श्रध्देचा मार्ग स्वीकारतो. तो मार्गच बंद केला तर त्याची प्रगती न होता अधोगतीच होईल. रोज सायंकाळी स्वामी गंगेच्या काठावर बसून विचार करीत असत. काशीमधले साधूसंत, संन्याशी स्वतःत मग्न आहेत. भारतातल्या तरुण पिढीला प्राचीन व समृद्ध वारशाचे भान नाही. ही आंग्लाळलेली पिढीसुद्धा स्वतःत मग्न आहे. या सर्वांचा मेळ घालण्यासाठी परस्पर संपर्क व समाजातल्या सर्व थरांतील लोकांपर्यंत संवाद साधणारी एखादी यंत्रणा उभी रहायला हवी, धर्मशास्त्...

स्वामी विवेकानंदांचा संदेश .....

स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते. स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्...

युवकांचा आदर्श

स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही नाट्यपूर्ण घटनांभोवती अनेकांचे मन घोटाळत रहाते. त्यांच्या विचारांची उत्तुंगता लक्षात घेतली जात नाही. रामकृष्णांचा दिव्य स्पर्श, शिकागोचे ते विख्यात भाषण, भगिनी निवेदिताचे भावसमर्पण अशा अनेक घटनांनी वाचक भारावून जातात. त्यांचे विचारधन हे दुर्लक्षित रहाते. स्वामी विवेकानंदांचे उपलब्ध साहित्य नऊ इंग्लिश खंडांत विस्तारले आहे. अजूनही काही भाग अप्रकाशित आहे. स्वामी जन्मभर बोलत राहिले. गुडविनसारखे लघुलेखक त्यांचे शब्द झेलत राहिले. एखाद्या वॉल्डो बाई हाती पेन घेऊन त्यांया पायाशी बसल्या. स्वत: विवेकानंदांनी हाती लेखणी घेऊन लिहिली ती फक्त पत्रे. उरले-सुरले त्यांचे विचारधन कागदावर उमटले ते त्यांच्या शिष्यांमुळे. स्वामी रंगनाथानंद हे त्यांच्या जीवनाचे भाष्यकार जगभर फिरले. वयाची 94 वषेर् पुरी करून नुकतेच कालवश झाले. त्यांचे अमोघ इंग्लिश वक्तृत्व पाहून थक्क झालेले श्रोते त्यांना विचारत : स्वामी हे भाषाप्रभुत्व, विचारप्रभुत्व कसे आणि कधी संपादन केले? यावर स्वामी रंगनाथजी म्हणत: ...

सत्यमेव जयते

अमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते. ‘जिन्हे देश कि फ़िक्र’,हे ह्या या नारयाने संपुर्ण भारतीयांची मने काबीज करण्यात आमिरला यश आल आहे. दिल पे लगेगी तभी बात बनेगी असं म्हणत तळागाळातील अनेक समस्यांना लोकांपर्यंत पोहोचवून आपण भारतीय आहोत आणि आपली नैतिक जबाबदारी विसरून चालणार नाही असा मोलाचा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. आमिरच व्यक्तिमत्व तसं ईतर कलाकारांपेक्षा भिन्न स्वरूपाच आहे,त्याचे चित्रपट जर आपण पाहिले तर social touch असणारे असतात. त्यात सरफरोश,मंगल पांडे,लगान,रंग दे बसंती ह्यांसाख्या सिनेमात आमिरची देशभक्ती आपल्याला पाहायला मिळते . तसेच अतिथी देवो भव ह्या भारतीय पर्यटनाच्या जाहिरातीत देखील आमिरची वेगळी छटा बघायला मिळते. सत्यमेव जयते ह्या show मधून सामाजिक जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने आपले मौलिक अधिकार ओळखावे हा त्यामागचा हेतू असल्याचं आमिरने स्पष्ट केलं आहे. सदर showच हे दुसर पर्व असून मार्च महिन्याच्या प्रत्...

मराठी बोध कथा : घोडा आणि नदी

एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....

परीस

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......