५०१) मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का !
५०२) बुडणायांना किनायावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !
५०३) मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका

सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही.
५०४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप !
५०५) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने पत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
५०६) आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
५०७) आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
५०८) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु.
५०९) अपमानाच्या पाययावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
५१०) आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हियाला घणाचे घाव सोसावे लागते.
५११) आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते.
५१२) आशा ही उत्साहाची जननी आहे.
५१३) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
५१४) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
५१५) आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो.
५१६) आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते !
५१७) अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
५१८) अंधारच नसता तर चमकणाया तायांना काही किंमतच उरली नसती.
५१९) आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.
५२०) आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वायाबरोबर आपोआप पसरत जातो.
५२१) असत्य हे अपंग पाण्यापमाणे असते, दुसयाच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.
५२२) असत्याचा विजय झाला
री तो क्षणभंगूर असतो.
५२३) इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
५२४) उद्योगी माणूस कधीच निर्धनम नसतो.
५२५) कोणतीच वेळ

शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
५२६) कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.
५२७) कोणी कितीही चिडवण्याचा पयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
५२८) कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
५२९) कोमलता हा ह्रदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि ह्रदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
५३०) खरा आनंद हा दुसयांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
५३१) खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा.
५३२) घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाया गोष्टींकडे पाहत रहा.
५३३) गवताच्या पात्यावरुन वायाची दिशा ओळखायला शिका.
५३४) घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
५३५) घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाडमयाचे कार्य आहे.
५३६) चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.
५३७) छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते.
५३८) चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंतःकरणात चंद्राची शीतलता हवी.
५३९) जे अंतःकरणातून येते तेच अंतःकरणाला जाऊन भिडते.
५४०) ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना पत्येक गोष्टीची कमतरता असते.
५४१) जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसयाचे दुःख कसे कळणार ?
५४२) ज्याची कृती सुंदर तो सुंदर !
५४३) जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.
५४४) ज्योतीचं म्हत्त्व, पावित्र्य अंधारात चाचपडणायांनाच कळंत.
५४५) जीवनातला अंधःकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य !
५४६) ज
ातील बहुतेक सज्जनांच्या वाट्ययाला दुःख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून !
५४७) ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
५४८) झयाचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते.
५४९) जो स्वतः उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो.
५५०) ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
५५१) तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल.
५५२) थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली !
५५३) थोर काय अगर सामान्य काय ! पत्येकाला पत्येकाची गरज ही असतेच.
५५४) दुर्बल व्यक्ती एखादे उच्च ध्येय समोर ठेवून समाजात वावरु लागते तेव्हा धाडस व साहस हे गुण तिच्यात आपोआप येतात.
५५५) दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.
५५६) दुसयाचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
५५७) दुसयाचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.
५५८) दुसयाला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
५५९) दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.
५६०) दुसयाचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.
५६१) ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.
५६२) नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.
५६३) नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.
५६४) नियमितपणा हा दुसयाच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
५६५) पत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
५६६) पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो, तो आपोआप जिरू द्यावा लागतो.
५६७) कलेची पारंबी माणसाला बळ देते.
५६८) फुल

ांच्या पाकळ्या तोडणायाला फुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.
५६९) बुद्धीमत्तेपेक्षा चारित्र्य श्रेष्ठ आहे.
५७०) काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वतःला बदला.
५७१) मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
५७२) मुलांच्यात बदल हाच शिक्षकाचा आनंदाचा ठेवा !
५७३) माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
५७४) माणसाचं छोट

दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
५७५) माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता

येते.
५७६) मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
५७७) नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.
५७८) मोठ्या लोकांचा मत्सर करु नका; कारण त्यामुळे तुमचा क्षुद्रपणा पकट होतो.
५७९) यश हे पयत्नांना चिकटलेले असते.
५८०) रडण्याने भविष्य बदलत नसते.
५८१) लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं.
५८२) विचार कुठुनही घ्यावेत पण घेताना ते पारखून घ्यावेत.
५८३) वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.
५८४) विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.
५८५) शिक्षेपेक्षा क्षमेनेच कार्यभाग साधता येतो.
५८६) शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
५८७) संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही.
५८८) संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात. तालाची एक मात्रा चुककी तरी त्या नाराज होतात, सूर बेसूर होतात. म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फार जपावं लागतं-स्वतःलाही आणि इतरांनाही !
५८९) जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.
५९०) सोप्यातले सोपे कामही आळशी मनातील वादळे अधिक भयानक
असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
५९१) समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका.
५९२) पेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं पत्येक कर्तव्य पामाणिकपणे पूर्ण करणं हेच पेम.
५९३) स्वतःच स्वतःचे न्यायाधीश बनू नका.
५९४) संसारात एकमेकांच्या सुखापेक्षा दुःख वाटून घेण्यात फार मोठा आनंद असतो.
५९५) संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसयाच्या दुःखाची जाणीव !
५९६) ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते.
५९७) हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वतःचे भविष्य घडवा.
५९८) हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं.
५९९) आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.
६००) श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......