आई व मूल
शेताच्या सारणीत पाट वाहे झुळझुळ
दुडुदुडु अंगणात धावतो लडिवाळ.
वाऱ्याची दांडगाई, नदीवर येती लाटा
बाळाच्या काळजीने माउलीच्या देही काटा.
सोसाट्याच्या वारियाने केळीचे फाटे पान
दु:ख होता बालकास दुखे माउलीचे मन.
धावत्या खारीबाई तुझ्या पुरे येरझारा
झोपतो माझा तान्हा, झाडावरी घे निवारा.
जाई जुईच्या फुलांनो, तुम्ही पसरा सुवासा
अंगाई लागू द्या रे मांडीवरच्या उल्हासा!
आभाळीच्या नक्षत्रांनो, अशी लावू नका टक
दृष्टावेल नंदलाल होईल म्लानमुख.
उगवत्या सूर्या, काय रोखुनी पाहसी?
इंद्राचे राज्य पाही पहुडले माझ्या कुशी.
दसऱ्याचे नवरात्र, देव्हाऱ्यात नऊ माळा
पाठोपाठ नऊ पुत्र, माझ्या होवोत लेकीला !!
दुडुदुडु अंगणात धावतो लडिवाळ.
वाऱ्याची दांडगाई, नदीवर येती लाटा
बाळाच्या काळजीने माउलीच्या देही काटा.
सोसाट्याच्या वारियाने केळीचे फाटे पान
दु:ख होता बालकास दुखे माउलीचे मन.
धावत्या खारीबाई तुझ्या पुरे येरझारा
झोपतो माझा तान्हा, झाडावरी घे निवारा.
जाई जुईच्या फुलांनो, तुम्ही पसरा सुवासा
अंगाई लागू द्या रे मांडीवरच्या उल्हासा!
आभाळीच्या नक्षत्रांनो, अशी लावू नका टक
दृष्टावेल नंदलाल होईल म्लानमुख.
उगवत्या सूर्या, काय रोखुनी पाहसी?
इंद्राचे राज्य पाही पहुडले माझ्या कुशी.
दसऱ्याचे नवरात्र, देव्हाऱ्यात नऊ माळा
पाठोपाठ नऊ पुत्र, माझ्या होवोत लेकीला !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा