पोस्ट्स

सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय......

होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय. जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता. खरे दु:ख याचे की, तुम्ही मला गृहित धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय.. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्यात. असे होईल,मला काय माहित? मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतेय? होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... ही कही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते, आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे. म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानीहे गार्‍हाणे घालतेय. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... मावल्यांनो,लेकीब...

'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे'

. शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात. शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या कामचुकार,आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्य...

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.??

  तुमचा आणि आमचा शिष्टाचार असतो. अशी कविता शाळा-कॉलेजात भविष्यात शिकवली जाणार की काय? असं वाटू लागलंय. कारण टी.व्ही लावला की भ्रष्टाचाराची बातमी, सकाळी पेपर चाळला की भ्रष्टाचाराची बातमी. एखाद-दुसर्‍या दिवशी भ्रष्टाचाराची बातमी ऎकली किंवा वाचली नाही तर मन अगदी अस्वस्थ होतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे भ्रष्टाचार आणि भारतीय माणसाचे नाते इतके घट्ट झाले आहे की सोडता सोडवेना. मुळात भ्रष्टाचार हा विचारांतून जन्माला येतो आणि मग तो कृतीत उतरतो. स्वतंत्र भारतातील पहिला वैचारिक भ्रष्टाचार गांधी-नेहरुंनी केला. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रधानमंत्री पदासाठी लोकशाही मार्गाने बहुमताने निवडून आले होते. तरी आमच्या महात्मा गांधींनी नेहरुंना पंतप्रधान पद दिले. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार होता. आज चीन आणि काश्मीरसारखा न सुटणारा प्रश्न आपल्याला नेहरुंच्याच कृपेने मिळाला आहे. पुढचा सर्वात मोठा वैचारिक भ्रष्टाचार नेहरुंनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होणार होतं. परंतु वंदे मातरमला चाल लावणे कठीण आहे व ते बॅंडवर वाजवता येत नाही म्हणून वंदेमातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही, असे नेहरु म्हणाले...

गरीब मुलगा.............

शाळेने पत्रक काढलं,'यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे,तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे,खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार,एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात.गरीब मुलगा शोधायचा कसा?आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं,तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती.तीन-चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे;पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची.मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,"मला एक मदत कराल का?आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले,"सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे." मुलांनी एक...

तुम्ही सुद्धा बनू शकता कॉम्प्युटर जीनियस........

आपल्या प्रत्येकात एक हुशार, चाणक्य, बुद्धिवंत, जाणकर किंवा प्रज्ञावंत (जीनियस) दडलेला असतो. आणि तो सांगत असतो की, तुम्ही स्वतःच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार! आपण स्वतःच आपले करियर घडवत येतो. त्याला आकार देतो. याचा अर्थच असा की, प्रत्येकजण हा जन्मापासूनच हूशार, प्रज्ञावंत असतो. फक्त काही तरी घडल्याने, अडथळे आल्याने त्यांची घडी विस्कटते आणि हे सारे जीनियस ठरत नाहीत. आपल्या पैकी थोडेच प्रज्ञावंत ठरतात, चमकतात. तुम्ही वा आपणासारखेच खरं तर प्रज्ञावंत बनू शकतो. अगदी कॉम्प्युटर जीनियससुद्धा! जग फार थोड्या लोकांनाच जीनियस म्हणून मान्यता देतं, असं का होतं? हे समजून घेण्यासाठी कॉम्प्युटर सर्वेसर्वा जगातील गर्भश्रीमंत ‘बिल गेट्स’ यांचे उदाहरण उत्तम आहे. बिल गेट्स यांनी जीवन कहाणी हे सिद्ध करते की, तुम्ही आम्ही संगणक प्रज्ञावंत बनू शकतो. बिल गेट्स हे उत्तरार्धात म्हणजे शालेय विद्यार्थी. युवक असतांना त्यांची स्थिती काय होती? उमेदीच्या काळात ते काय करत होते? हे जाणलं तर तुमच्या आमच्या जीनियसपणाचा मार्गही आपणास गवसेल... बिल गेट्स आणि त्यांच्या सारखे लोक उमेदीच्या काळात, विद्यार्थीदशेत प्रत्येक अडचण...

आई, तू आहेस म्हणूनच,,,,,ं

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे आई, तुझ्या रागवण्यातही अनूभवलाय वेगळाच गोडवा तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात फिका पडतो दसरा नि पाडवा आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची एकदा जरासं कुठे खरचटलो आई, किती तू कळवळली होतीस एक धपाटा घालून पाठीत जख्मेवर फुंकर घातली होतीस जख्मं ती पुर्ण बुजली आता हरवून गेली त्यावरची खपली तो धपाटा, ती फुंकर, ती माया ती हरेक आठवण मनात जपली आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी कितींदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फीटणार नाही आई, लाख चुका होतील मज कडून तुझं समजावनं मिटणार नाही आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो तरी तू मला शोधून काढशील आई, तुला एकदाच हाक दिली तरी अब्जांनी धावून येशील

आई-बाप;.,,,,,

"आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, एडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलंस्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्यामरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्यखर्चलेल असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणारस्टीअरींग असतं अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम हे; रोजच्याआयुष्यात, कामाला येणार बँकबॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या वेळीमिळणारा, तुमचा बोनस किंवावेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते बाप म्हणजे चालती बोलती,अनुभवाचीफॅकटरी असते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभरमिळवलेली कमाईअसते आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो दाखवलेल्या वाटे...