सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय......
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... एरव्ही बोललेही नसते, पण माझ्या विचारांचेतुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय. चक्क माझी देवी बनवूनमला फोटोमध्ये फ्रेम केलेय. जमेल तेंव्हा,जमेल तसेमाझे सोईनुसार कौतुक करता. खरे दु:ख याचे की, तुम्ही मला गृहित धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय.. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... कुर्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात. ज्या माझ्या वारसा सांगतात, त्याच बेईमान झाल्यात. असे होईल,मला काय माहित? मला कुठे पुढचे दिसले होते? एका वेगळ्या जगासाठीमी शिव्याशाप,दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचे तररात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतेय? होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.... ही कही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखाहा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते, आम्ही कोणकोणते विष पचवले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे. म्हनूनच तुमच्या बहिर्या कानीहे गार्हाणे घालतेय. होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय..... मावल्यांनो,लेकीब...