सत्य इतिहास जाणुन घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.रयतेला राजा मिळाला.ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो.
भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती होती.त्याविरोधात आपल्या भारतातील महापुरुष गौतम बुद्ध,सम्राट अशोका,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी लढा दिला.आपल्या या महापुरुषांचे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि यशस्वी करायचे आहे म्हणून या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.यातच आपला उद्धार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यवस्थेच्या विरोधात खुप मोठा संघर्ष केला.येथील भुमिपुत्रांना स्वातंत्र्याच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.१६३० ते १६८० या अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी इतिहास घडविला.शिवरायांना त्यांच्या आई जिजाऊमाता यांची प्रेरणा मिळाली होती तसेच वडील शहाजीराजांनी त्यांना सर्व युद्धाची सर्व तंत्रे शिकवली होती.छत्रपती शिवाजी राजे संत तुकारामांना गुरु मानत.छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जात-पात, धर्म न मानता भुमिपुत्रांसाठी लढा दिला.थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवरायांनी समता,बंधुता व न्यायाची शिकवण भुमिपुत्रांना दिली.खरच छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते.
आज या भटाळलेल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अशा या थोर महापुरुषाचा वापर आपले लोक,नेते,पुढारी जनतेला भावनिक बनवून स्वार्थसाठी फ़ायदा करून घेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना व पक्ष पुढे आले आहेत.पण त्यांना छत्रपतींच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या बदनामीच्या विरोधात बंड करणे याविषयी काहीही गंभीरता वाटत नाही.
"शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठफ़िरवणी झाल्याची दिसून येते.हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता यांच्या बदनामीचे ब्राह्मणी षडयंत्र होय.या विरोधात आपण आवाज उठविला पाहिजे.छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणुन घ्यावा कारण शिवरायांचा खोटा इतिहास या षडयंत्रकारी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून जेम्स लेनने लिहिला आहे.शिवरायांचे गुरु त्यांची आई,वडील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज असतानांही दादू कोंडदेव आणि रामदास यांसारखी माणसं त्यांचे गुरु म्हणुन लादले गेले.कुठे आहे आमचा शिवप्रेमी समाज ? शिवरायांची बदनामी करणारे साहित्य लिहिले जात आहे.त्यांचा खोटा इतिहास सांगितला जात आहे.आजही आंतरजालावर अशा संघटना कार्यरत आहेत ज्या कायम खोटा प्रसार करत असतात व इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतात.शिवरायांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.तेंव्हा छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जाग्रुत व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या बदनामी विरोधात लढणार्या व त्यांचे कार्य व खरा इतिहास सांगणार्या संघटनांमुळे शिवरायांची खरी चळवळ जीवंत आहे.ही चळवळ वाढविण्याची जबाबदारी आम्हा मावळ्यांची आहे.म्हणून एवढे सांगावेसे वाटते की छत्रपती शिवराय कोणत्या जाती - धर्मासाठी लढले नव्हते, ते खर्या अर्थाने आपल्या रयतेच्या हितासाठी लढणारे राजे होते.पुर्वी शिवरायांनी खुप संघर्ष केला आहे मग तो वैदिक ब्राह्मणांच्या विरुद्ध असो नाहीतर मुस्लिमांच्या विरुद्ध असो.पण शिवरायांना मुस्लिम विरोधी दर्शवण्याचे काम ब्राह्मण इतिहास लिहिणार्यांनी केले आहे.शिवराय हे विखुरलेल्या देशबांधवांसाठी व त्यांच्या ऐक्यासाठी झगडले होते.तेंव्हा जाती-धर्म विसरून एकिने लढून शत्रुंना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे.आपला इतिहास आपला वारसा आहे.इतिहास जाणुन घ्या व मुक्तीचा मार्ग स्विकारा .या व्यवस्थेच्या मुळावर घाव घातल्याशिवाय आपला देश या गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.हा देश छत्रपती शिवरायांचा आहे तेंव्हा इथे त्यांचीच व्यवस्था आम्हाला पाहिजे.
जय जिजाऊ । जय शिवराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....