पोस्ट्स

५०१) मरण जवळ आलं म्हणून जगायचं कुणी थांबतं का ! ५०२) बुडणायांना किनायावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य ! ५०३) मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. ज्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही. ५०४) आत्महत्या म्हणजे सर्वात मोठे पाप ! ५०५) ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने पत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. ५०६) आपली बाजू न्याय असेल तर दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात. ५०७) आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका. ५०८) आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु. ५०९) अपमानाच्या पाययावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. ५१०) आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व हियाला घणाचे घाव सोसावे लागते. ५११) आचाराच्या उंचीवरच विचारांची भव्यता अवलंबून असते. ५१२) आशा ही उत्साहाची जननी आहे. ५१३) अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. ५१४) आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्स...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

स्वामी विवेकानंदांचे विचार ..

स्वामी विवेकानंदांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. पण ‘नर करनी करे, तो नर का नारायण हो जाये|’ म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिले. नरेंद्रांचे विवेकानंद झाले ते निव्वळ त्यांच्या विचारधारेवर. जगातल्या प्रत्येक घटनेवर त्यांचे विचारधन हे सामान्यांना विचार करायला लावणारे आहे. अंधश्रद्धेबद्दल बोलताना ते म्हणायचे, श्रद्धेला डोळे नसतात. ती आंधळी असते. फार तर श्रद्धेचा एक मार्ग आहे आणि ज्ञानाचा एक मार्ग आहे. परंतु श्रद्धेचे अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा असे दोन प्रकार करण्यात काहीच अर्थ नाही. दुखावणे योग्य नाही. ज्याला स्वतःला प्रगती करून घेण्याचा मार्ग सापडत नाही तो श्रध्देचा मार्ग स्वीकारतो. तो मार्गच बंद केला तर त्याची प्रगती न होता अधोगतीच होईल. रोज सायंकाळी स्वामी गंगेच्या काठावर बसून विचार करीत असत. काशीमधले साधूसंत, संन्याशी स्वतःत मग्न आहेत. भारतातल्या तरुण पिढीला प्राचीन व समृद्ध वारशाचे भान नाही. ही आंग्लाळलेली पिढीसुद्धा स्वतःत मग्न आहे. या सर्वांचा मेळ घालण्यासाठी परस्पर संपर्क व समाजातल्या सर्व थरांतील लोकांपर्यंत संवाद साधणारी एखादी यंत्रणा उभी रहायला हवी, धर्मशास्त्...

स्वामी विवेकानंदांचा संदेश .....

स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती. स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते. स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्...

युवकांचा आदर्श

स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही नाट्यपूर्ण घटनांभोवती अनेकांचे मन घोटाळत रहाते. त्यांच्या विचारांची उत्तुंगता लक्षात घेतली जात नाही. रामकृष्णांचा दिव्य स्पर्श, शिकागोचे ते विख्यात भाषण, भगिनी निवेदिताचे भावसमर्पण अशा अनेक घटनांनी वाचक भारावून जातात. त्यांचे विचारधन हे दुर्लक्षित रहाते. स्वामी विवेकानंदांचे उपलब्ध साहित्य नऊ इंग्लिश खंडांत विस्तारले आहे. अजूनही काही भाग अप्रकाशित आहे. स्वामी जन्मभर बोलत राहिले. गुडविनसारखे लघुलेखक त्यांचे शब्द झेलत राहिले. एखाद्या वॉल्डो बाई हाती पेन घेऊन त्यांया पायाशी बसल्या. स्वत: विवेकानंदांनी हाती लेखणी घेऊन लिहिली ती फक्त पत्रे. उरले-सुरले त्यांचे विचारधन कागदावर उमटले ते त्यांच्या शिष्यांमुळे. स्वामी रंगनाथानंद हे त्यांच्या जीवनाचे भाष्यकार जगभर फिरले. वयाची 94 वषेर् पुरी करून नुकतेच कालवश झाले. त्यांचे अमोघ इंग्लिश वक्तृत्व पाहून थक्क झालेले श्रोते त्यांना विचारत : स्वामी हे भाषाप्रभुत्व, विचारप्रभुत्व कसे आणि कधी संपादन केले? यावर स्वामी रंगनाथजी म्हणत: ...

सत्यमेव जयते

अमीर खानचा सत्यमेव जयते हा reality show सध्या बहुचर्चित आहे,ह्याच कारण त्यामध्ये असलेली भीषण सामाजिक वास्तवता, महासत्ता होऊ घातलेल्या भारत देशामधील एकूण परिस्थितीचा बोलका आढावा म्हणजे सत्यमेव जयते. ‘जिन्हे देश कि फ़िक्र’,हे ह्या या नारयाने संपुर्ण भारतीयांची मने काबीज करण्यात आमिरला यश आल आहे. दिल पे लगेगी तभी बात बनेगी असं म्हणत तळागाळातील अनेक समस्यांना लोकांपर्यंत पोहोचवून आपण भारतीय आहोत आणि आपली नैतिक जबाबदारी विसरून चालणार नाही असा मोलाचा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. आमिरच व्यक्तिमत्व तसं ईतर कलाकारांपेक्षा भिन्न स्वरूपाच आहे,त्याचे चित्रपट जर आपण पाहिले तर social touch असणारे असतात. त्यात सरफरोश,मंगल पांडे,लगान,रंग दे बसंती ह्यांसाख्या सिनेमात आमिरची देशभक्ती आपल्याला पाहायला मिळते . तसेच अतिथी देवो भव ह्या भारतीय पर्यटनाच्या जाहिरातीत देखील आमिरची वेगळी छटा बघायला मिळते. सत्यमेव जयते ह्या show मधून सामाजिक जनजागृती व्हावी आणि प्रत्येकाने आपले मौलिक अधिकार ओळखावे हा त्यामागचा हेतू असल्याचं आमिरने स्पष्ट केलं आहे. सदर showच हे दुसर पर्व असून मार्च महिन्याच्या प्रत्...

मराठी बोध कथा : घोडा आणि नदी

एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल". मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत." उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....

परीस

एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी प्रेयसीच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......

संस्कार

इमेज
संस्कार म्हणजे नक्की काय? बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभंकरोती म्हणणे, मोठयांचा आदर करणे, खरे बोलणे, स्वच्छतेचे पालन करणे...यादी नक्कीच लांबत जाईल. पण हे संस्कार मुलांमध्ये रूजणार कसे? संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडिमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही. संस्कार हे एका पिढीतून दुस-या पिढीत रूजवायचे असतात. संस्कारांचा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरूजी यांनी 'श्यामची आई' रूपाने लिहून ठेवला आहे. नाशिकला जेलमधे असतांना साने गुरूजींनी आपल्या आईच्या आठवणी ५ दिवसात लिहून काढल्या. रूढ अर्थाने हे लिखाण काही आत्मचरित्र, कांदबरी किंवा निबंध नाही. त्या आहेत सच्च्या दिलाने लिहीलेल्या आईच्या आठवणीं आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रघ्दाजंली. 'श्यामची आई' पुस्तकावर कितीतरी पिढया संस्कारक्षम झाल्या. १९५३ साली प्र.के.अत्र्यांनी ह्या पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला. चित्रपटाचा नायक श्याम होता माधव वझे आणि आईच्या भूमिकेत त्यावेळच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार अर्थातच वनमाला. चित्रपट जरी १५३ मिनिटांचा असला तरी एकदा पाहिलेल्या ह्या चित्रपटाचा 'इम्...

करिअर

इमेज
करिअर या शब्दाचा नेमका अर्थ काय असतो? शब्दकोशाच्या भाषेत सांगायचं झालं तर उपजिविकेचा मार्ग. मग काही लोकांचं ‘करिअर’ असतं आणि बाकी सारे तत्सम नोकरी, धंदा करणारे सामान्यच राहतात. उदा. सचिन तेंडुलकर, सुनिता विल्यम्स, सानिया मिर्झा, विश्वनाथन आनंद यासारखी माणसं जे काही त्यांच्या क्षेत्रात मिळवतात ती त्यामुळे संबंधित क्षेत्रातली आदर्श होतात. मग तुम्ही आम्ही मागे का? करिअरचा नेमका अर्थ कळला तर हे कोडं सुटू शकतं. शाळा कॉलेजमध्ये असताना अमुक तमुक क्षेत्रातलं शिक्षण घेणं करिअर असतं. कॉलेजमधून बाहेर पडताच एखादी तगड्या पगाराची नोकरी मिळवणं करिअर होतं. थोडा काळ तिथे जातो न जातो तेव्हा प्रमोशनपासून परदेशातजाण्यापर्यंतचे वेध लागू लागतात, त्याला करिअरचे महत्त्वाचे टप्पे मानले जातात. यात करिअर कुठे आहे. इथे आपणच विणलेल्या कोशातून बाहेर पडायला हवं. नेमकं आपल्याला काय हवं, हे उमजायला हवं.(हीच तर खरी गोम आहे) एखाद्या भल्या मोठ्या क्षेत्राची निवड करण्यापेक्षा आपल्याला काय करायला आवडतं, हे शोधून काढलं तर उत्तम. मेडिकलला जायचंय असं म्हणण्यापेक्षा डॉक्टर व्हायचंय की फार्मा कंपनी काढायची हे आत...

सामान्य ज्ञान ....

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा १) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया २) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. ४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे. ५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक. ६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली. ७) गोवा- सिंधुदुर्ग. इतर सामान्य ज्ञान * चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे. * कॅनडा सर्वात लांब रस्ते. * जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश. * चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. * कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे. * ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम. * भारत चहा उत्पादनात प्रथम. * बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम. * घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम. * अमेरिका मका उत्पादनात प्रथम. * सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम. * क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश. * चिली तांबे उत्पादनात प्रथम. * मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम. * कोळसा उत्पादनात रशिया...

राष्ट्रसंत गाडगेबाबा

निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे महाराज हे आधुनिक संत होऊन गेले. त्यांनी माणुसकीचा संदेश देत देत स्वच्छतेचा व मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृद्ध समाज घडवण्याकरिता आयुष्यभर समाजातील तळागाळातील अंध, अपंग, रोगी, दीन, दु:खी, निराश्रित, आदिवासी व दलित बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर झगडले. सेवा परमो धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा, कोट्यवधी रु. च्या देणग्या लाभल्या तरी एका पैचाही मोह न ठेवणारा, आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणारा... अशा या थोर निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भुलेश्वरी नदीच्या तीरावर असलेल्या शेंडगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जाणोरकर. रंगीत चिंध्या हे त्यांचे महावस्त्र. गाडगे, काठी, कानात कवडी आणि पायात दोन प्रकारच्य...

सत्य इतिहास जाणुन घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.रयतेला राजा मिळाला.ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो. भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती ...

आजचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद?

सध्या सगळीकडे म्हणजे आंतरजालावर सुद्धा अनेकांना म्हणजे ब्राह्मणांनाच नाही तर काही बहुजनांना उठता बसता हाच प्रश्न पडतो की आजच्या ब्राह्मणांची चुक तरी काय ? का उगाच शिळ्या कढीला उत आणुन ब्राह्मणांना त्रास देतात ? मला पण आंतरजालावर बरेच जण विचारतात अहो आत्ताच्या ब्राह्मणांनी काय चुकीचे केले आहे ? पण या लोकांनी आपली सद्सदविवेकबुद्धी थोडी जरी जाग्रुत केली तरी आजच्या ब्राह्मणांची हरामखोरी लक्षात यायला वेळ लागणार नाही. * शिवजयंतीचं उदाहरण घ्या जे स्वत: ची कामे तारखेप्रमाणे करतात ते तिथीचा आग्रह धरतात, "कालनिर्णय" क्यालेंडर वाला साळगावकर (ब्राह्मण) स्वत:चं क्यालेंडर तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यात आणतो पण शिवजयंतीला मात्र तिथी चा आग्रह धरतो. * सुनिल चिंचोलकर (ब्राह्मण) नावच्या महाहरामी रामदास्याने आपल्या "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" या चोपड्यात प्रुष्ट क्र.५३ वर शाहजी राजे पण लग्नाला हजर नव्हते असा मुद्दा समोर केला आहे, आणि जर रामदास राज्याभिषेक ला हजर नव्हता म्हणुन तो गुरु नव्हता असं सांगत असाल तर आम्ही शाहजी शिवाजी च्या लग्नाला नव्हता म्हणजे ...

तुकोबारायांचे वैकुंठगमन की खून ?

संत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते,रडणारे नव्हते. असाध्य ते साध्य | करिता सायास || कारण अभ्यास | तुका म्हणे || प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !! तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्...

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

मराठा आणि ब्राह्मण हा यांच्यातील वाद बर्याच बर्षापासून चालत आलेला आहे.अगदी शिवशाहीपासून, पण त्यात भर पडली ती शाहू महाराजांच्या काळात आणि मग ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वादाला सुरुवात झा्ली.हा वाद असाच चालू आहे आजपर्यंत आणि चालूच राहील यात दुमत नाही.ब्राह्मण मराठा वाद तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत एकाचातरी अंत होत नाही आणि मराठ्यांचा अंत तर मोघल, तुर्की, अदिलशाही, निजामशाही सुद्धा करू शकले नाहीत तेंव्हा इथे तसा विचार देखील करणे म्हणजे आतातायीपणाच ठरेल.ब्राम्हण समाजाने जी जातीवाव्स्थेची मुळे खुप आधी पेरली आहेत त्याचा त्रास आजही काही समाजांना सहन करावा लागत आहे त्यामुळे ब्राम्हण विरोधी वातावरण आजही अस्तित्वात आहे.मग काही लोकं कितीही ओरडली की ब्राह्मणद्वेष कमी झाला आहे तर निरर्थक ठरेल.आजही तितकाच ब्राह्मण विरोध आहे आणि आता तर खर्या इतिहास संशोधनामुळेच तर भविष्यकाळातील या वादाचे स्वरूप महाभयंकर असणार आहे यात तिळमात्र शंका नाही.खेडेकर साहेबांच्या मते मराठा - ब्राह्मण संघर्ष झालाच पाहिजे त्याशिवाय मराठ्यांचे कर्त्रुत्व ब्राह्मण मान्य करणार नाहीत जे सतत जाप करत असतात की ब्राह्मणांच्या केसालाही धक...

डेबुजी झिंगराजी जानोरकर

गाडगे महाराज ( फेब्रुवारी २३ , १८७६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. अनुक्रमणिका  [ लपवा ]  १ बालपण २ सामाजिक सुधारणा २.१ "संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश " ३ संक्षिप्त चरित्र ३.१ संकिर्ण बालपण [ संपादन ] गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. सामाजिक सुधारणा [ संपादन ] १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, ...