anna gye tihar jail



Tuesday, 16 August 2011 05:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तिहार जेलमधून सुटका होणार असून त्यांच्या सुटकेचे आदेश जारी करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी तिहार जेल प्रशासनाकडे त्यांच्या सुटकेचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.
दिल्ली पोलिसांनी अण्णांवरील सर्व आरोप मागे घेत. त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. येत्या तासाभरात त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.  तिहार जेल प्रशासनाकडून सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर अण्णा हजारे यांना सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून स्टार माझाला मिळाली आहे.


anna haZare
अण्णांची सुटका होणार असली तरी अण्णांचे उपोषण सुरू असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांची सुटकेची बातमी अण्णांच्या गावी म्हणजे राळेगण सिद्धीत दाखल होताच. एकच जल्लोष झाला. ग्रामसभा सुरू असताना ही बातमी मिळाल्यावर ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यापूर्वी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अटक केल्यानंतर त्यांना सात दिवसांची न्यायालयील कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अण्णा हजारे यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली. परंतु, देशभरातून अण्णांना मिळालेला पाठिंबा यामुळे सरकारला झुकावे लागले आणि त्यांनी अण्णांच्या सुटकेचे आदेश दिले.
अण्णा हजारे यांच्या सुटकेचे आदेश देण्यापूर्वी अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी यांची पोलिसांनी सुटका केली.

Tags:अण्णा हजारेजेपी पार्कतिहार जेलसुटका

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......