marathi mansachi kalok ratra





मराठी महाजाल व वर्तमान स्थिती ह्या अश्या महत्त्वाचा विचारास बाजूला करून आम्ही शेयर मार्केट सारख्या दुय्यम गोष्टीवर चर्चा करत करत जेवण करत होतो, जेवण होऊ पर्यंत १ वाजलाच होता. माझ्या ही घरी वाट पाहणारे कोणी नव्हते व मित्राच्या घरी देखील वहिनी घरी गेल्यामुळे प्रेशर नव्हते. बैठक अमर्यादित काळासाठी तहकूब करून आम्ही आमचे आमचे वाहन बाहेर काढले.
नदीपात्राजवळील रास्तावरून आम्ही महादेव मंदिर चौकाकडे जात होतो, तोच मित्राला अजून एक महत्त्वाचा मुद्दा आठवला म्हणून बाइक बाजूला घेऊन आम्ही परत बोलत उभे राहिलो, पाच एक मिनिटाची खडी चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही प्रस्थान केले.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ३०

आमच्या वाहनांचे स्पीड असावे २०-२५ किमी कारण आम्ही हॅल्मेट घातल्यामुळे कानावर चर्चा कमी पडत होती, त्यासाठी आम्ही हळू हळू चालवत होतो. मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... बस्स्स!!!!!

मेहंदळे गॅरेज रोडवरून आम्ही महादेव चौकाकडे आलो तेव्हा मित्राच्या बाजूला एक खड्डा आला त्यामुळे त्याने गाडी थोडी स्लो करून माझ्या मागे लावली, तो पर्यंत मी रोड चौक क्रॉस करू लागलो होतो...... मी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर चौकाचे पार केले होते मागून प्रसन्नदा नी आवाज दिला " राज्या थांब. " पण हॅल्मेट मुळे अथवा नशिबामुळे समजा मला तो आवाज कानावर आलाच नाही व जर आला जरी असता तरी मी काही करू शकलोच नसतो. एक भरधाव वेगाने काळ्या रंगाची जीप अत्यंत वेगाने नळ स्टॉप वरून म्हात्रे पुलाकडे जात होता व मधोमध येवढ्या मोठ्या यामाहा बाइकवर असलेला मी त्या जीपवाल्याला शक्यतो दिसलोच नाही. प्रचंड वेगाने त्याने उजव्या बाजूने माझ्या बाइकच्या मधोमध टक्कर मारली व मी हवेत सात-ते-आठ फूट उंच उडालो. जीप माझ्या खालून निघून गेली मी व मी जीपच्या टपावरून खाली रस्त्यावर पडलो. डोक्यावर असलेले हॅल्मेट तेव्हाच कुठे तरी आदळा आपटी मध्ये डोक्यावरून दूर जाऊन पडले. माझी बाइक गोलगोल फिरत डिव्हाडरला टक्कर मारून जवळ जवळ ३०-४० फूट लांब जाऊन पडली. प्रसन्नदा आपली बाइक आहे त्या अवस्थेत सोडून पळत माझ्याकडे आले व हे सर्व नाट्य एवढ्या वेगाने घडले की प्रसन्नदाला जीपचा नंबर नोट करून घेताच आला नाही. व माझी अवस्था पाहून प्रसन्नदा प्रचंड टेन्शन मध्ये आलेच होते.

मला इकडे सर्व काही सुन्न. काहीच संवेदना नाहीत किती वेळ माहीत नाही, पण मी सर्व पाहत होतो डोळे टंकाटंक उघडे होते.
मी रस्त्यावर डाव्याबाजूला कलंडलेल्या अवस्थेत.
कोणी तरी उठवून बसवत होते.
दहा-बारा अनोळखी चेहरे पळत येताना अंधुकसे दिसत होते समोर.
तोच एक प्रश्न कानावर आला.. " राज्या, ठीक आहेस.? "
मी काहीच उत्तर न देता समोरील व्यक्तीकडे बघत होतो.
पुन्हा प्रश्न.. " राज्या मी कोण आहे? मला ओळखतोस का? "
मग मी उत्तर दिले.. "हो, ओळखतो. प्रसन्नदा, प्रसन्न केसकर माझे मित्र. "
पुन्हा प्रश्न.. " कुठे लागले आहे? "
मी माझ्या उजव्या पायाकडे हात दाखवत म्हणालो.. " पूर्णं तुटला आहे. सांभाळून उचला. "
पुन्हा प्रश्न.. " अजून कुठे दुखत आहे "


मी थोडा थोडा सावरलो होतो पण अजून जखम इत्यादी काही समजत नव्हते, पण पाय तुटल्यामुळे ठणकत होता ते कळत होते. जवळच असलेली पोलिस गाडी व व्हॅन जेथे अपघात झाला होता तेथे काही क्षणामध्येच पोहचल्या. रास्तावर थोडे थोडे रक्त पडलेले दिसत होते पण शरीरावर जखम दिसत नव्हती तेव्हा अचानक प्रसन्नदाचे लक्ष माझ्या डाव्या कानाकडे गेले तेथून रक्त येत होते, प्रसन्नदा प्रचंड कासावीस झाले त्यांनी पुन्हा पुन्हा माझे कान तपासून पाहिले तोच मागून कोणी तरी म्हणाले "अहो, डोक्याला जखम आहे. घाबरू नका. " माझा हात मागे गेला तर मी पाहिले तर माझ्या डाव्या बाजूला डोक्यावर मोठी जखम झाली होती, पोलिसांनी जास्त वेळ न घेता मला सरळ उचलला व आपल्या जीपमध्ये मागील बाजूस घातले तेवढ्यात ही मी त्यांना.. " सर माझा उजवा पाय तुटला आहे पूर्णं लटकत आहे मधून, तो जरा जपून, माझी बाइक, हॆल्मेट, एक माझा बूट समोर पडलेले मला दिसत आहेत" ते हवालदार साहेब लगेच म्हणाले " अरे कुणीतरी ह्याची गाडी चौकीकडे घ्या व ह्याचे सामान देखील. " हवालदाराने दरवाजा बंद करून घेतला, पोलिस गाडीच्या मागून प्रसन्नदा आपली बाइक घेऊन येऊ लागले. तो पर्यंत पोलिसांनी मला नॊर्मल प्रश्न विचारत माझ्या जखमांकडे माझे दुर्लक्ष व्हावे म्हणून प्रयत्न चालू केले होते.

३०/१२/२००९ वेळ रात्रीचे १. ५०

पाच-दहा मिनिटामध्ये आमची गाडी सरळ आत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये पोहचली. गाडीतून मला स्ट्रेचर वर इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले गेले प्रसन्नदा लगेच माझा केस पेपर इत्यादी तयारी करण्यासाठी निघून गेले. स्ट्रेचरवर मला दोन-तीन डॉक्टर एक-दोन वॉर्डबॉय घेरून घेऊन चालले होते, डॉक्टर पटापट अवस्था / दुखणे ह्याची नोंद करू लागले, एका वार्डबॉय ने करा करा कात्रीने माझी अत्यंत आवडती ली कॉपरची जीन्स उजव्या बाजूने कापून काढली, तोच दुसऱ्या वॉर्डबॉय ने वस्तरा घेऊन माझ्या डोक्यावर जेथे जखम झाली होती तेथील चार-पाच इंचाचे मैदान साफ केले. एकाने माझ्या डाव्या हाताची एक नस पकडून एक प्लॅस्टिकची थ्री-वे सुई घुसवली व त्याचे फटाफट बँडेज करून एक-दोन पेनकिलर इंजेक्शन व सलाईन लावण्यात आले. तो पर्यंत डॉक्टरांनी माझ्या उजव्या पायाला सपोर्ट लावून बँडेज बांधून काढले व तत्काळ मला एक्स-रे रूम मध्ये वळवण्यात आले. एवढे सगळे होत असताना देखील मी टकटक सगळ्यांच्याकडे पाहत होतो. तो पर्यंत एका डॉक्टर ने झायलोकीन टचाटचा माझ्या डोक्यात टोचून जेथे जखम झाली होती तेथे पाच टाके घातले. तो पर्यंत प्रसन्नदा माझे ऍडमिशन करून केसपेपर घेऊन आले व रूम मोकळी नसल्याने मला सरळ सी विंगच्या पाचव्या मजल्यावर पोहचवले, बेड नंबर १३.
दिलेल्या औषधामुळे मला झोप येऊ लागली होती व हे सर्व होऊ पर्यंत सकाळचे पाच-साडे पाच वाजले होते. प्रसन्नदा नि मी घरी जाऊन कपडे बदलून येतो, काळजी करू नकोस मी आहे. सर्वांना सांगतो असा सल्ला देऊन निघून गेले. दुखणे वाढत होते पण औषधामुळे झोप येत होती. कळत नकळत कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी डॉक्टर देशमुख आले व त्यांनी तपासणी केली व काही औषधे व इंजेक्शन देणेच्या रतीब चालू केला. मित्रांच्यामध्ये बातमी तो पर्यंत पोहचली होती, फोन वाजला तेव्हा मला एकदम नवलच वाटले एवढे सगळे झाले हा कसा काय वाचला, डाव्या खिश्यातून बाहेर काढल्यावर तर चाट पडलो, जसा होता तसाच एकही स्क्रॅच देखील नाही, मी आनंदलो व ज्या ज्या मित्रांचे फोन येत गेले त्यांना उत्तर देत गेलो, जवळ जवळ मित्रांच्यामध्ये सर्वांना समजले होतेच. देश परदेशातून जेथे जेथे बातमी पोहचली तेथून फोन येऊन गेले. जेथे पोहचवणे गरजेचे होते तेथे हलकीच थाप मारली पोट दुखत आहे म्हणून ऍडमिट आहे काळजी नको. उगाच त्यांची पळापळ नको व आता जो त्रास होणार होता / होत आहे तो झाला आहे आता सांगून काय फायदा असा विचार केला व हळूहळू ठीक झाल्यावर व्यवस्थित सांगू हा निर्णय घेतला. पण दुपार पर्यंत ऑपरेशन व इत्यादी गोष्टी कळल्यावर कुणालातरी बोलवून घेणे गरजेचे झाले म्हणून घरी आईला अजून थोडी थाप मारली की थोडे पायाला देखील लागले आहे व कुणाला तरी पाठव, बंडूला पाठव त्याला पुणे माहीत आहे माझ्या बरोबर आला होता माझ्या मित्रांना देखील ओळखतो.

सकाळपासून औषधाचा / इंजेक्शनचा ढोस चालू होता तो दुपार पर्यंत वाढला व मला सांगण्यात आले की रात्री तुमचे ऑपरेशन होईल ८ वाजता चालू. तुम्ही तयार राहा काही काही खाऊ नका पिऊ नका. बरोबर संध्याकाळी ७. ३० मला ऑपरेशन थेटर मध्ये घेऊन जाण्यात आले व कंबरे खालील भूल देण्यात आली. ऑपरेशन टेबल वर मी एकदम येशू ख्रिस्त स्टाइल मध्ये पडलो होतो, डाव्या हातात सलाईन / इंजेक्शन व उजव्या हातामध्ये रक्तदाब व इत्यादी यंत्रे. छाती वर कुठल्याश्या मॉनिटर मधून बाहेर काढलेली -१० रंग बेरंगी वायरी ज्या माझ्या शरीराला जोडलेल्या होत्या. कंबरेखालील भाग सुन्न होता पण मी शुद्धीत होतो, डॉक्टर लोक माझ्या पायाशी जी कुस्ती खेळत होते ते मला समजत होते, ठोकाठोकी, तोडातोडी, ड्रिलिंग, कापाकापी, मी सगळ्याची मजा घेत होतो. पेन किलर दिल्यामुळे जास्त त्रास होत नव्हता पण त्यामुळे हलकी हलकी गुंगी येत होती. ३-४ तासाने ऑपरेशन संपले व मला रेस्ट रूम मध्ये पोहचवला गेला. नंतर कळले की पायावर १३ टाके घातले गेले, एक मस्त पैकी स्टीलचा रॉड घातला गेला आहे व महिन्याभराची कमीत कमी सक्तीची विश्रांती घेणे आवश्यक आहे.

०४/०१/२०१० वेळ दुपारचे १. ३०

आता मी व्यवस्थित आहे आजच पायाचे ड्रेसिंग चेंज झाले, आजच थोडे चाललो आधार घेऊन. प्रगती उत्तम आहे लवकरच पूर्णं बरा होईन हि अपेक्षा. जीवावर बेतलेला अपघात फक्त हॅल्मेटमुळे पायावर निभावला. नाही तर येवढ्या मोठ्या अपघातातून मी वाचलो कसा हा प्रश्न जर कोणी मला विचारले तर मी वर बोट करेन. पुण्यात असलेल्या मित्रांनी प्रचंड मदत केली प्रसन्नदा, मोडक ह्यांनी तर अक्षरशः रात्री जागवल्या माझ्यासाठी, बिपीन कार्यकर्ते, परिकथेतील राजकुमार, धमाल मुलगा व कुटुंब, पुण्याचे पेशवे, छोटा डॉन, टिंग्या, डॉ. दाढे ह्यांनी भेटून तर निखिल देशपांडे, मस्त कलंदर, मनिष, सुहास, व इतर अनेक मित्र मैत्रिणींनी फोनवरून मला मानसिक आधार दिला त्यांचे आभार कसे व्यक्त करावेत तेच कळत नाही आहे. देवाचे अनेकानेक आभार आहेत की त्यांने मला हे सुंदर जग पाहण्यासाठी व ह्याचा परिपुर्ण आनंद घेण्यासाठी अजून एक मोका दिला... थॅक्स गॉड !

मंगळवार १ डिसेंबर २००९

पाऊलखुणा..

नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत. मावळतीच्या सूर्याला आपल्यात सामावून घेणा-या त्या अथांग समुद्रासारखेच गहिरे आहेत. पण त्याच्या असण्यानसण्याचं कसलंच भान तिला नव्हतं. ती तशीच त्या पाण्यात विरघळत जाणा-या सूर्याकडे पाहत बसून होती. पाहताक्षणीच त्याला तिचे ते निष्पाप, स्वप्नील डोळे आणि त्या डोळ्यांतून व्यक्त होणारी ती खूप आवडली.

वाळूवरची त्याची नीरव पावलं तो अगदी जवळ आला तशी तिला जाणवली बहुतेक. तिने आपली नजर त्याच्याकडे वळवली व हलकेच हसली. तसा तोही उत्तरादाखल तसाच हसला. तिने त्याला बाजूच्या खडकावर बसण्याची खूण केली तसा तो यंत्रवत त्या खडकावर जाऊन बसला व समोर सूर्याकडे पाहू लागला. त्याचे तेज आता त्याला जाणवू लागले होते. त्याने हलकेच आपली नजर पुन्हा तिच्याकडे वळवली आणि असाच नि:शब्दपणे खिळल्यासारखा तिच्याकडे पहातच राहिला. तिलादेखील ते कळलं असावं म्हणून ती त्याच्याकडे वळली. त्या तिच्या नजरेतच स्पर्शाचा भास होता. त्याच्या शरीरावर एकदम रोमांच उभे राहीले. कुणीतरी हळूवारपणे मोरपीस फिरवावं तसं वाटलं. थोडयावेळापूर्वी मनात चालू असलेला कल्लोळ एकदम शांत झाला. त्याला हवं असलेलं ते काहीतरी आता त्याला आपसूक मिळालेलं होतं.

आपली भावना तिला कशी सांगावी हे त्याला समजत नव्हतं. इकडे तिकडे नजर फिरवल्यावर त्याला त्याच्या बाजूलाच उगवलेले एक छोटेसे निळे तीन पाकळ्यांचं फूल दिसलं. त्याने अलगदपणे ते खुडलं आणि तिच्यासमोर धरलं. ती हसली. तिने त्याच नाजुकपणाने ते फूल हातात घेतलं आणि आपल्या केसांमध्ये त्या फुलाला जागा दिली. तिचं सौंदर्य अजून खुललं. सूर्यप्रकाश तिच्या चेह-याला आपले तेज देत होताच. त्याने तिची गोरी कांती अजून खुलत होती. आता मावळतीच्या वेळचा आकाशाचा रक्तिमा तिच्या गालांवर उतरून आला होता. ती त्या खडकावरुन खाली उतरली.

तो तिच्याबरोबर चालू लागला. उद्या परत भेटू ह्या बोलीवर ते विलग झाले. ती परतली. पण तो मात्र वाळूत उमटलेली तिची पाऊले पाहत तसाच तिथे उभा राहीला... कितीतरी वेळ त्याला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं.

दिवसामागून दिवस जात होते. एका कळीचे फुलामध्ये रुपांतर व्हावे तशी ह्यांची कहाणी पुढे चालू होती. ॠतु मागून ऋतु जात होते. ज्या खडकावर ते प्रथम भेटले होते तिथेच आता ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली होती. तिच्या टपो-या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तिचा तो नेहमीचा प्राजक्तासारखा फुललेला चेहरा कोमजला होता. सगळे बांध तोडून तिचे डोळे झरत होते. त्याने हलक्याच हाताने तिच्या गालावरील ते थेंब दूर करत, तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन तिच्या नजरेला नजर भिडवली. काही न बोलताच डोळ्यांनी ती खूप काही बोलत होती. त्याला सर्व कळत होतं, पण काय सांगावं हेच उमजत नव्हतं. राजकुमारीच्या प्रेमामध्ये असलेल्या दासासारखी त्याची अवस्था. काय बोलू व काय करु असेच प्रतिप्रश्न त्याचे डोळे तिला विचारत होते. तिला त्याचं मन वाचता येत होतं. कारण तिच्या श्वासाश्वासातून नियतीमुळे होणारी ताटातूट नकळत व्यक्त करत होती. त्याने निश्चयाने हात तिच्यापुढे केला. तिने काहीच हालचाल केली नाही. एका जागीच एखाद्या मूर्तीसारखी खिळून राहिली होती. त्याने भरलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहीले. तिच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू पाहिले. त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. बोलायची गरजच नव्हती. आपला थरथरता हात त्याने मागे घेतला व उठून चालू लागला. आपल्या परतीच्या मार्गावर, मान खाली घालून, येताना उमटलेली पाऊले पाहत. त्याचे शब्द आजकाल असेच अबोल होऊन जातात आणि डोळ्याच्या कडा किंचित ओलावतात.

दूरवर कुठेतरी शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग असतं. हे समजेउमजेपर्यंतच विषमतेच्या वादळात सर्वकाही नष्ट होऊन जातं. अमूर्त स्वप्नंदेखील त्या वादळात भरकटत जातात. उभं राहू पाहणारं त्या दोघांचं एक छोटेखानी घरही असंच अधुरं राहतं. त्याच्या उरल्यासुरल्या भिंती खिंडारासारख्या नकळत दोघांच्या मनातच कुठेतरी उभ्या राहातात. स्वप्नांची सतत बोचरी जाणीव करुन देतात. कधीतरी त्याच्या हातात गुंफलेले तिचे हात होते. आज मात्र तो मोकळ्या हातांनी नियतीचे दरवाजे ठोठावत फिरतो आहे. रस्ते कधी कसे का बदलून गेले हेच त्याला माहित नाही. समुद्राला साक्षी ठेवून जन्मभर साथ देण्याची वचनं, समुद्राकाठच्या मऊ वाळूतली त्यांची पाऊलं हे सारंच एका अनामिक लाटेमुळे वाहून गेलंय. मावळत्या सूर्याला शेवटाचा सलाम करुन तो त्या एकाकी अंधाराला चिरत दूरवर निघून गेला आहे.

रविवार ११ ऑक्टोबर २००९

भावना तीव्र आहेत....

हा हा हा !

एकदम हसु आलं !

भावना तीव्र आहेत.... हसतो आहे ह्याचे वाईट नका वाटून घेऊ..

जेव्हा ताजा घाव असतो ना तेव्हा वेदना पण तीव्र असतात...
दिवाळी जवळ आली की जीव घाबरतो..
किती जणांचे संसार रस्तावर येणार...
ह्या भितीने नाही..
किती जीव जाणार..
ह्या काळजीमुळे सुध्दा नाही..

कुठे तरी मार्केटमध्ये...
विस्फोट होईल..
कळत नकळत मी पण तेथे असेन..
कुठे हात.. कुठे पाय..
शरीराचे असंख्य तुकडे..
गोळा होतील का नाही ?
शव नाही राख तरी घरी पोहचेल...
ह्या काळजीने घाबरतो जीव ..

वेदना तीव्र आहेत...
पण त्याचे प्रतिबिंब..
सरकारी...मालमत्तेवर..
कुठे बस... कुठे रेल्वे..

पण जेव्हा मत देता तेव्हा..
कुठे जातात वेदना..
दोन ठेंब दारुचे...
चार नोटा गांधीच्या..
बस.. दावादारु..
दोन्ही हातात..

वीराची वेदना..
त्याच्या चार भींती..
मध्ये अर्धांगणीच्या..
पुसलेल्या कुंकु मध्ये..
पोराच्या डोळ्यातील..
सुकलेल्या आश्रुमध्ये..

खरोखर वेदना तीव्र आहेत..
पाठ फिरवून वेदना
लपवण्याची..
सवय आहे..

चार तुकड्यासाठी..
राबराब राबताना..
कुठली वेदना..
कुठले शल्य..

दिसली शहिद ज्योत..
सलाम मारला..
डोळ्याचे पाणी..
आटलेलेच.. आता
रक्त पण सुकलेलेच..

सोमवार २८ सप्टेंबर २००९

माझं कोल्हापुर - भाग १

एन एच ४, शिरोळ- सांगली नाक्यावरुन दोन-तीन किलोमिटर दुरवर पंचगंगेच्या ब्रीज नंतर एक उजव्या बाजुला एक कट आहे, तेथेच कोप-यावर तावडे हॊटेल कधी काळी हे टपरी वजा हॊटेल एनएच ४ वरील एक प्रसिध्द जागा. तेथून वळण घेतल्यावर जरा पुढे गेले की आता कमान आहे जी सध्याच म्हणजे आठ-नऊ वर्ष झाली उभी करुन जी महापालिकेने उभारली आहे, लोकमत, पुढारी किंवा तस्म कुठलातरी वर्तमानपत्राची अथवा कंपनीची जाहिरात तुमचे स्वागत करेल, आजूबाजुला शेती व थोडे पुढे गेले तर कोल्हापुर जकात नाका व तुमचा प्रवेश करवीर नगरी, महालक्ष्मीचे निवास स्थान, पैहलवानांची नगरी, कलानगरी कोल्हापुरमध्ये प्रवेश.

सुरवात तर मी कुठून ही करु शकतो पण कोल्हापुर म्हणजे माझा घरं, तेव्हा कधी काळी कोल्हापुर मध्ये आम्ही राहत होतो शिवाजी पेठ मध्ये तेथून सुरवात ! दिपक आईस्क्रमि, जो शिवाजी पेठेच्या आसपास राहिला असेल त्याला हे नाव माहीत नाही असा विरळाच ! प्रकाश रणदिवे, कोकाट्यांची गल्ली, कोल्हापुर हा पत्ता व त्याच्या शेजारी एका खोली मध्ये आमचं घरं ! एका कोप-यात स्टोव्ह व स्वयंपाकाचे सामान, एका कोप-यात तिजोरी व तिजोरीवर हंथरुन पाघंरुन. बसायला चटई व एका बाजूला अक्काचा पाळणा, कधी मी त्या पाळण्यात मी देखील झुललो असेन, आज ही तो पाळणा घरात आहे, आता त्यात माझा सर्वात लहान भाचा झुलतो आहे. बाबा एका कपड्याच्या दुकानात कामाला जात, आई सांगते जेव्हा अक्का जन्मली होती तेव्हा बाबांचा पगार चाळिस रुपये होता, मला विचित्र वाटायचे चाळीस रुपयात कसे काय त्यांनी घर चालवले असेल.

कधी काळी पडद्यावर चित्रपट पाहीला होता तो प्रथम येथेच शिवाजी पेठेत, गणपतीला अथवा दिवाळीला सर्व जण वर्गणी काढून पडदा चित्रपट लावत, दोन खांब व त्याच्या मध्ये भला मोठा पडदा. पब्लिकला दोन्ही बाजूला बसायची सोय. एका बाजूला प्रोजेक्ट्रर. व संध्याकाळी ७.३० नंतर अंधार पडू लागल्यावर चित्रपटाला सुरवात, मिथूनचे डान्स डान्स, जी-९ व तस्म चित्रपट मी येथे पाहीले. ह्याच शिवाजी पेठेच्या जवळ मंगळवार पेठेत आमची नुतन मराठि विद्यालय शाळा, तेव्हा ती बालवाडी ते सातवी पर्यंत होती, शक्यतो आज ही सातवी पर्यंतच आहे, त्याच्या समोर नुतन मराठी हायस्कुल, पण आमची शाळा म्हणजे विद्यालय. एका जुनाट वाड्यामध्ये असलेली शाळा, खासबाग मैदानाच्या एकदम पाठीला बाजूला.

रस्त्यावरुन पाहीले तर एकाद्या वाड्यासारखीच दिसणारी शाळा, चार बाय चार फुटाचा एक बोर्ड मेन रोड वर शाळेचा. थोडे आत गेले की कमानी जवळच एक जुना शोभे यात्रेचा भला मोठा रथ जो काम करत नव्हता शक्यतो, अथवा मी त्याला कधी मिरवणुकीमध्ये पाहिला नाही त्यामुळे मला वाटते की तो कार्यरत नसावा, भला मोठा लाकडी दरवाजा जसा गढ / किल्यावर असतो तसा त्यातून आत गेले कि डाव्या बाजूला हेडमास्तरांचे ऑफिस व तेथेच स्टाफरुम. उजव्या बाजुला, पाचवी, सहावी व सातवीचे वर्ग व त्यांच्या तुकड्या, दोन मंजली बिल्डींग वजा वाड्यामध्येच, तेथून जरा पुढे गेले की पुन्हा एक गेट व त्या गेट नंतर छोटेखानी पटांगण (अगदीच छोटे असे कुणाच्या तरी घराबाहेरील अंगण असावे) हीच आमची मधल्या सुट्टीतील हक्काची जागा, येथे एक मोठी ओसरी वजा हॉल लाकडी खांब असलेला व त्या हॉलच्या वरती भुत आहे अशी वावडी त्यामुळे कधीच गेलो नाही, पण नंतर नंतर कळाले जेव्हा मी सातवी मध्ये आलो तेव्हा की ते शाळेचे गोडाऊन व स्टोअर रुम होती. त्या पटागंणामध्ये एक पाण्याची टाकी. येथेच आमची सकाळची प्रार्थना व शाळेचे विविध कार्यक्रम होतं.

तेथून जरा पुढे गेले की एका दरवाज्यातून आत गेल्यावर वाडाच्या मागच्या बाजूला नवीनच बांधलेली पत्राचा शेड असलेली शाळा बालवाडी ते पाचवीच्या मुला मुलींची. आता सर्व॑ काही शिक्षकांची नावे आठवत नाहीत, काही आठवतात, देसाई सर, पाटिल सर, जाधव मॅडम, निकम मॅडम.. असेच दोन चार.

आमच्या घरापासून शाळा जास्त लांब नव्हती असेल दोन-तीन किलोमिटर वर, आधी आधी आई सोडायला येत असे, नंतर आम्ही जवळ पासची मुले-मुली मिळूनच जाऊ लागलो, सगळेच गल्या-दोन गल्या सोडून राहत असतं, आमच्या मधील मोठी मुले दादागिरी करत आम्हाला शाळेत पोहचवत व परत घेउन येत. माझ्या आई कडे माझा लहानपणाचा फोटो आहे, त्यात मला पाहिल्यावर तर मलाच जाम हसू येतं, पाठीला दप्तर, काखेत पाणी पिण्याची छोटीशी बाटली.. त्या बाटलीला गळ्यात अडकवण्यासाठी पट्टा होता... तिला काही तरि म्हणत आता आठवत नाही आहे, पांढरा हाफ बाजूचा शर्ट व खाकी चड्डी व चड्डीवर लाल रंगाचा हुकवाला बेल्ट. तेल डोक्याला चापून लावलेले, कपाळावर गंध व डोळ्यात काजळ, कधी कधी मला विश्वास बसत नाही की तो माझाच फोटो आहे ह्यावर.

त्यावेळी आमच्या दप्तरामध्ये एक लाकडी पाटी, चार-पाच चुन्याच्या पेन्सिली व काही रंग बिरंगी खडू, एक अंकलिपीचे पुस्तक व जेवणाचा स्टिलचा छोटासा डब्बा. वही, पेन असली थेरं आम्ही पाचवीत आल्यावर चालू झाली. पहिली ते पाचवी पर्यतंची मुले / मुली खालीच बसत चटई वर समोर एक लाकडी फळा व त्याच्या बाजूला एका पट्टी वर बाईची छडी व फळा फुसायचा कपडा.. कधी कधी डस्टर. अ ब क ड येथेच गिरवलं व बे एके बे पण येथेच शिकलो, शिकण्यात तरबेज होतो पण उनाड खुप त्यामुळे शिक्षणाकडे लक्ष कमी व दंग्यात जास्त, तरी ही मी पहिली ते पाचवी पर्यंत सलग पहिला व दुसरा नंबर घेत असे शाळेत.

शाळेत दंगा खुप केला, कधी कुणाला मार, कधी मुलींची वेणी ओढ, कधी कुणी पाटी वर लिहलेले फुस, कुणाला चिमटा काढ, कुणाचा डब्बा पळव, दप्तर बाहेर फेकुन दे तर कधी वर्गाचा दरवाजा बाहेरुन बंद कर... असेल अनेक धंदे मी शाळेत असताना केले होते, दर दोन आठवड्यानंतर मला आईला शाळेत घेऊन यावे लागते कारण माझी कंप्लेट. पण तरी मॅडमचा / सरांचा माझ्या खुप जिव कारण मी हुशार. मला कधी कधी रावळगाम चे चॉकलेट तर कधी डब्यातून आणलेली पोळी कुणी ना कुणी देतच असे.

पहिली ते पाचवी ही पाच वर्ष भुरकन संपली, व आम्ही मोठे झालो कमीत कमी मॅडम तर आम्हाला हेच म्हणायच्या, दंगा करु नका आता तुम्ही मोठी मुलं झाला आहात तुम्ही पाचवी आहात. जेव्हा पाचवीत आलो तेव्हा मला आठवतं, महाद्वार रोड वरुन मी आई, बाबा व अक्का जाऊन माझी पुस्तके, वह्या व पेन घेऊन आलो होतो, व घरात बसून बाबांनी संध्याकाळी त्या सर्व पुस्तकांच्यावर , वह्यांच्यावर वर्तमानपत्रांचे कवर घातले होते व पेन ने प्रत्येक पुस्तक / वही च्या पानावर जय जिनेन्द्र व ओम लिहले होते. किती तरी दिवस मी ती पुस्तकांना व वह्यांना अक्कालाच काय पण बाबांना पण हात लावू देत नसे, सदा सर्वदा दप्तर माझ्या जवळच असे.

मधल्या सुट्टीत गोट्या खेळने अथवा विटी दांडू, हा रोजचाच कार्यक्रम. गोट्या खेळताना दंगा जास्त होत असे, अंगठा जमीनीवर टेकवून मधल्या बोटाने समोरची गोटी उडवली की एकदम गलका होत असे, व मग कुठले तरी सर, मॅडम आम्हाला तंबी देत व आम्ही गप्प रे गप्प रे चा परत गलका करु, मग कोणी तरी पाठीवर दणका दिल्याशिवाय तोंडे बंदच होतं नसे. विटी दांडू खेळताना कधी कुणाला लागली तर कुणाच्या डोळ्याला लागली असं झालं की मग जे जे खेळत होते त्यांना पायाचे अंगठे धरुन शाळा सुटू पर्यंत उभे राहण्याची शिक्षा मिळत असे, मोठी मुले, व्हालीबॉल, फुटबॉल बाहेर रोड वर खेळत व आम्हा लहान मुलांना शाळेच्या आवारातच खेळण्याची परवानगी होती, मुली आपल्या कंचाकैऊडी अथवा लंगडी असले काहीतरी विचित्र खेळत व आमच्या पैकी कोणी तरी मग जी लंगडी घालत असे तिला धक्का देऊन येत असे.

क्रमशः

शनिवार १९ सप्टेंबर २००९

लफडा

प्रेम बिमसब झुट.. नाटकं आहेत.. प्रेमात पडायचं कश्याला ?
हा मुर्खासारखा प्रश्न मी अनेकांच्या तोंडातून बाहेर पडताना पाहीला आहे,
त्यांची किव करावी शी वाटते,
अरे यार प्रेम कधी ना कधी तुम्ही पण केलंच असेल ना..
पण काही कारणामुळे तुम्ही अयशस्वी झालात म्हणुन सरळ प्रेम भावनेवर ब्लेम ?
नाय यार हे काय चांगले नाही ! आपण आपला दोष कोणावर तरी का काढायचा :?

आता बघ ना, परवा माझा एक मित्र खुप दुख:त होता दारु पीत होता..
मी विचारलं काय झालं रे बाबा.. तु असा देवदास कसा झाला
तो म्हणाला... ती नाही म्हणाली.. व दोस्ती पण तुटली !
मी म्हणालो... असं कसं ? प्रेम नाही तर नाही दोस्तीची का वाट लावली तीने ?
तो म्हणाला... माहीत नाही... भेटु नकोस म्हणून सांगितले ती ने !
मी म्हणालो... ओ तेरी लफडा मोठा आहे... माझ्याशी बोलायला सांग !

ती हा ना करत बोलली माझ्याशी !
मी म्हणालो... तो त्याने तुला प्रपोज केलं !
ती म्हणाली... हो. पण मी नाही म्हणाले !
मी म्हणालो... का ? नाही म्हणालीस !
ती म्हणाली... आवडला नाही !
मी म्हणालो .. दोस्ती होती ना ?
ती म्हणाली.. हो दोस्ती होती !
मी म्हणालो... मग नावडत्या व्यक्ती बरोबर दोस्ती कशी ?
ती म्हणाली .. दोस्त म्हणून आवडत होता पण त्या नजरेने नाही पाहीलं कधी !
मी म्हणालो... ती नजर ? चल ठीक ती नजर नाही पण दोस्त म्हणून तर आवडता होता ना ?
ती म्हणाली... ह्म्म हो, दोस्त म्हणून चांगला होता.
मी म्हणालो... मग दोस्ती का तोडली ?
ती म्हणाली... त्याने प्रपोज केलं होतं ना त्यामुळे !
मी म्हणालो... प्रपोज ठीक आहे.. पण दोस्ती का तोडलीस ?
ती म्हणाली... माहीत नाही, पण भीती.
मी म्हणालो... दोस्ताची भीती ?
ती म्हणाली... नाही, पुन्हा प्रपोजची भीती.
मी म्हणालो... नाही म्हणाली तर तो पुन्हा का प्रपोज करेल ?
ती म्हणाली... केला तर ? त्यामुळे दोस्ती नकोच.
मी म्हणालो... प्रपोजचं केलं ना.. चाकू दर नाही दाखवला !
ती म्हणाली... पण मला भिती वाटत होती म्हणून दोस्ती पण नको म्हणाले !
मी म्हणालो... तुला कोण दुसरा आवडतो ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तुझी त्याच्याशी मैत्री आहे ?
ती म्हणाली... हो !
मी म्हणालो... तु त्याला प्रपोज केलंस ?
ती म्हणाली... नाही, भीती वाटते.. नाही म्हणेल ह्याची !
मी म्हणालो... तुला कसली नाही हीची भीती.. विचारुन बघ.
ती म्हणाली... नाही म्हणाला तर दोस्ती पण तुटेल.
मी म्हणालो... तुटली तर तुटली.. त्यात काय !
ती म्हणाली... नाही, चांगला मुलगा आहे.. !
मी म्हणालो... ज्यानं प्रपोज केलं त्याच्यात व तुझ्यात काय फरक आहे माहीत आहे ?
ती म्हणाली... नाही.. !
मी म्हणालो.. त्याच्यात गट्स आहेत.. आपलं प्रेम व्यक्त करण्याचं !
ती म्हणाली... ह्म्म शक्यतो !
मी म्हणालो... शक्यतो नाही , आहेत. ज्याच्या मध्ये गट्स आहेत अश्या मित्राला तु सोडत आहेस.
ती म्हणाली... पण !
मी म्हणालो... आता कसला पण ? तो देवदास झाला !
ती म्हणाली... हो कळालं मला पण !
मी म्हणालो... मग ?
ती म्हणाली... तु समजव त्याला.
मी म्हणालो... तेच करतो आहे.
ती म्हणाली... विचार करेन.


गेली ! त्याला फोनवला व म्हणालो तुझं अर्ध काम रस्तावर आणलं आहे खड्डा मारु नकोस परत.. वाट बघ !


काही कळाले का तुम्हाला वर काय लिहले आहे ते ?
मला पण नाही ;)

पण तुटलेले दोस्ती व प्रेम जोडायला मला खुप आवडतं !
अरे लोकांना कळतच नाही आपण भांडणाच्या नादात कीती आनंदाचे क्षण व्यर्थ घालवतो ते !

कोण समजवणार ह्यांना ! प्रेमाची महती ... दोस्तीची ताकत जेव्हा ती / तो जवळून गेल्यावर कळते !


भांडा रे भांडायला कोण नको म्हणत आहे... पण जरा प्रेम राहु द्या मनात .. सगळेच दरवाजे कधी बंद करायचे नसतात.. न जा ने कोण कधी जिवनामध्ये कुठल्या वाटेला भेटेल !

माय व्हॅलंटाईन

माय लास्ट व्हॅलंटाईन !

कशी आहेस तु ? आनंदात आहेस ना ? मला विसरली आहेस ना आता नक्कीच ? असे अनेक प्रश्न मला विचारायचे आहेत गं. पण त्या प्रश्नांना तुझ्या पर्यंत कसे पोहचवू ! चल हरकत नाही मी पाहतो आहे ना तुला ह्यातच आनंद आहे ! तुला जाणवत नसेल की मी तुझ्या आसपास आहे.. माझं मन तुझ्याच आसपास घुटमळत आहे... !



कित्येक वर्ष झाली मला तुला काही गिफ्ट देऊन पण.. तुला आठवतं का ? आपला लास्ट व्हॅलंटाईन डे ? नेहमी प्रमाणेच मी आलो होतो तुझ्या जवळ... पण आपल्या बाबांना आसपास पाहून नजरेच खुणवले होते... नंतर .. कसं विसरु ते मी ! तु दिलेले एकएक गिफ्ट माझ्या घरी अजून ही असेल. ... ती कोमजलेली फुलं.. तो माझ्या नावाचा काचेचा गोलक.. ते तु दिलेला.. पेन .... ती ग्रिटिंग कार्डस... सर्व काही आहे अजुन ही माझ्या बॆगेत.. ! मी दिलेले गिफ्ट तु असेच जपुन ठेवले आहेस का ? ह्म्म.. नसावी.. तु नाही ठेवणार मला माहीत आहे... ! हरकत नाही..!



तु नेहमी म्हणायचीस .. आपलं प्रेम कसं नजर लागण्यासारखं आहे नाही... लोकांना तर नवल वाटत असे... ही विचित्र जोडी पाहून... तु परी सारखी रेखीव व मी असाच नमुना ! तरी ही आपलं प्रेम फुललं पण न जाने कुनाची नजर लागली... असल्याचं नसलेले झालं ! हरकत नाही यार हे सगळे माझं नशीब खोटं ... त्यामुळे !


तुझ्या प्रत्येक शब्दांना मी जपावं व तुझ्या साठीच शेवट पर्यंत श्वास घ्यावा, हा असला विचार मी खुप वेळा केला.... व्हॅलंटाईन डे आला परत.. दर वर्षी येतो... ह्यावेळी पण आला ! तुझी आठवण आली... ! येऊ नये ह्यासाठी खुप प्रयत्न केला.. पण मी वेडा.. !
तुझ्याच आठवणीमध्ये झुरतो.. आहे.. असाच.. वेड्यासारखा ! कधी तरी जाईन ही हे जग सोडून.. तेव्हा मात्र मला खरोखर आनंद मिळेल.. मुक्त झाल्याचा आनंद !


तसं पाहता ह्या दिवसाचं मला काहीच अप्रुप नाही गं .... असे अनेक दिवस येतात जाता.. प्रेमी-प्रेमिका आपले मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी हाच दिवस वापरतात... सगळेच वापरतात म्हणून मी देखील वापरत होतो बस्स ! पण आज तु जवळ नसल्यावर मला खरंच ह्या दिवसाचं महत्व कळालं गं ! कधीच आठवण येऊ देत नाही मी तुझी... पण ह्या दिवशी मी मात्र असाह्य होतो... अगनिक एसएमएस.. मेल... मित्रांचे संदेश.. व प्रत्येकामध्ये.. प्रेमाचा इजहार ! कसं गुदमरल्या सारखं होतं मला हे तुला नाही समजणार कधी ! तु कधी आपलं कोणीतरी हरवलं आहे.. दुर गेलं आहे... असा विचारचं केला नसशील त्यामुळे तुला काहीच वाटत नसेल ... त्यामुळेच तुला कळनार नाही विरहाचं दुख: काय.. आहे... माझ्या मनाची उलाघाल समजणं तुला जमणारच नाही... शक्यतो हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत हे मला ही माहीत आहे.. .. तु आता माझी नाहीस हे देखील.. पण कधी तरी... कुठल्यातरी जन्मामध्ये तु फक्त माझीच होण्यासाठी नक्कीच ये ...



******************


काही नाती... कधीच जुळत नाही ! पण त्या नात्यांच्या मुळे होणा-या अगणिक जखम घेऊन कोणी तर असाच माझ्या सारखां अश्वथामा वावरत असेल... कुठे तरी... बाबा रे... हे दुख:.. प्रेम... नशा... काहीच नाही रे ! उगाच झुरत नको बसू.... कुठल्यातरी... कोप-यावर.. जिवनाच्या अनोळखी वळणावर... कोणी ना कोणी तर आपलं भेटेल... त्याचा हात पकड ! जगण्यातला आनंद तुला नक्कीच सापडेल रे भावा ! आम्ही काय रे ! आलो काय गेलो काय.... आता संपलोच आहे... असाच एखादा क्षण मला मुक्त करुन जाईल !

त्या दिवशी... माझा व्हॅलंटाईन पण माझ्या ऋणातून व मी त्याच्या ऋणातून मुक्त होईन.



*******************
दिल-ए-नादान अजब जुस्तजू में क्यूँ है
तुझसे शौक-ए-गुफ्तगु में क्यूँ है
मैंने चाहा है बहुत तुझ को
तु मेरी हर एक आरजू में है
तु मेरे साथ है तो लगता है ऐसे
एक उजाला सा मेरी रूह में है
जुदा खुद से करूं तो कैसे करूं
तेरी चाहत तो गर्दिश-ए-लहू में है। - अनाम कवी

वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां





वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां 


दम ले ले घड़ी भर ये छैंया पाएगा कहां

बीत गये दिन, प्‍यार के पल छिन

सपना बनी वो रातें

भूल गये वो, तू भी भुला दे

प्‍यार की वो मुलाक़ातें

सब दूर अंधेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कोई भी तेरी राह ना देखे, नैन बिछाए ना कोई

दर्द से तेरे कोई ना तड़पा, आंख किसी की ना रोई

कहे किसको तू मेरा, मुसाफिर जाएगा कहां ।।

कहते हैं ज्ञानी, दुनिया है फ़ानी

पानी में लिखी कहानी

है सबकी देखी, है सबकी जानी

हाथ किसी के ना आई,

कुछ तेरा ना मेरा, मुसाफिर जायेगा कहां ।।

दम ले ले घड़ी भर ये छैंया पायेगा कहां ।।



गाईड मधिल एक माझं आवड्तं गाणं मी एकत आपल्या संगणकावर खेळत होतो...
आज तीला जाऊन काही वर्षे झाली... व आजच अनिल ने वळण.. ही कथा लिहली... ! ह्या दर्द पेक्षा अजून काय मोठा दर्द हवा जिवनामध्ये... हा डोक्यात विचार चालू होताच तोच काही तरी डोक्यात आलं व लिहायला बसलो.. नाय घाबरु नका प्रेमभंगावर नाही लिहतो आहे ;) पण प्रेमावर जरुर लिहतो आहे... सांगावं लागत आहे हो... मी जरी संगणक / नेटवर्कींग / शेयर मार्केट बद्दल जरी लिहले तरी लोकांना वाटतं की त्यात पण प्रेमभंगावरची कथा असू शकेल =)) पण आज तुम्हाला पिडायचा प्लान नाही आहे.. आज माफ केला....;) काही प्रश्न पडले मनाला त्यांचे उत्तर शोधत शोधत मनामध्ये काही विचार उमलले तेच लिहतो आहे.. !

अनेक कवी / लेखक / कथा / चित्रपट आम्हाला जवानीच्या उंभरठ्यापासून हेच सांगून गेले की प्रेम फक्त एकदाचं होतं.. ! पहिलं प्रेम ते प्रेम बाकी.. ? हा प्रश्न डोक्यात आला व मी जरा गोंधळलो.. माझे पहीले प्रेम काय होतं ? त्याकाळी मला कोण तरी दुसरीच आवडत होती... ते माझं प्रेम होतं.. पण प्रेमाचं वय नव्हत.. त्यावेळी मी शाळेत होतो ;) .. त्यानंतर ही प्रेम झालं.. त्यावेळी मी दहावी मध्ये होते... ;) तीन एक आठवडे प्रेमप्रकरण चालवलं.. पण मी शाळा सोडली व तीने मला... त्यानंतर ची सर्व कहानी मिपावर आहेच... ! मग हे काय सगळे माझे मुखवटे होते ? नाही यार.. बॉस ! प्रेम लाईफ मध्ये एकदाचं होतं असे नाही.... प्रेम एक अशी भावना आहे की... ज्यामध्ये तुम्ही कुणावर प्रेम करता आहात.. हे जरुरी नाही पण कोण तुमच्यावर जिवापाड प्रेम करत आहे.. कोण तुम्हाला ह्दयाच्या एका कोप-यातून साद देत आहे.... हे समजणे जरुरी आहे.. !

कोणी तरी हळूवार पणे तुमच्या जिवनामध्ये प्रवेश करतो... तुमच्या आवडी निवडी.. तुमचं जगणं.. हसणं .. रडणे.. बिझी असने... रागावणॆ... दुर जाणे.. जवळ येणे.. तुमचा विचित्र स्वभाव... स्वत:च संभाळणे... दुख: मध्ये पण हसणे... कळत नकळत स्वत:ला हरवणं... हे कोणी तरी पाहत असतं ! कोणी तरी चुकुन का होईना तुमच्या कडू आठवणी व तुमच्या मध्ये आलेली / आलेला असतो / असते ... त्यावेळी काय करावं हेच आपल्याला कळत नाही व आपण नकळत त्या प्रेमापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो... मग त्यासाठी आपण खुप बचकानी कारणे देतो.. मी असा आहे ..ती अशी आहे... मी एवढा शिकलेला आहे.. ती एवढी शिकलेली आहे.. मी ह्या लेव्हलला आहे ती त्या लेव्हलला आहे.. मी असा आहे ती अशी आहे... तीच्या बरोबर स्वत:लाच कळत नकळत कंपेयर करतो व आपण त्या नात्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करतो.. स्वत:ला एका कोषामध्ये गुरफटून घेण्याचा प्रयत्न करतो... व अचानक आपण एक स्वत:ला कुठल्यातरी गोष्टी मध्ये रमवून घेण्याचा प्रयत्न करु लागतो... सुखाचे पल असेच स्वत: आपल्या जवळ आले असताना आपण पळून जाण्याचा प्रयत्न करतो.. व त्या मागे आपल्याकडे कारणे देखील सशक्त असतात.. असं आपल्याला वाटतं.. पण खरं तर ती कारणे एकदम पोकळ असतात हे आपल्या मनाला पण माहीत असतंच !

आपण आपल्या मनाला जुन्या गोष्टी मध्येच रमण्याचा प्रयत्न करतो... आपण स्वत:च आपल्या जुन्या जखमा रोज ओरबडून काढतो... जर ते जमले नाही तर.. कुठतरी कुठल्यातरी गोष्टीचा संदर्भ आपल्या दुख:शी लावतो.. व जे जवळ आहेत ते थोडेफार किमती अश्रु जो आपल्या जवळच नाही त्याच्यासाठी व्यर्थ करतो.. ते जमले नाही तर मग कुठे... व्यसनामध्ये.. स्वत:ला परत गुरफटून घेतो व म्हणतो... माझं दुख: कुणाला कळणार.... अरे मुर्खा ! कोण तरी जवळ येत आहे हे सोडून शतकामागे झालेल्या प्रेमप्रकरणावर रडत बसलास तर कोण येईल तुझ्या जवळ... हे माझं मत.. पण मी पण चुकतोच.. ना.. बरोबर आहे.. दर्द खुप मोठी गोष्ट असते.. सहन करणे व लपवणे तर खुप मोठ्या गोष्टी... भले भले... बरबाद ह्या दर्द मुळे... ! पण ह्या दर्द वर कोण तरी फुंकर घालायला तयार असले तर ? तरी ही त्रासच ? का तर..मागचे जिवन कधी तरी पुढे येईल.. अरे यार.. जर मागचे जिवन तु आपल्या खांद्यावर बाळगण्याची हिंमत ठेवतो तर.. त्याला / तीला सांगायला काय हरकत आहे... जर खरंच ती / तो तुला सर्व गुण - अवगुण माहीत असताना तुझ्या वर प्रेम करत आहे तर काय अडचण सत्य बोलायला ? समजा तीने / त्याने जर तुमचे दुख: दर्द समजुन घेतला तर ? अरे यार... बहार येईल जिंदगी मध्ये... जे हरवलेले सुख आहे...ते खरचं पदरात येईल... जन्नत दिसेल प्रेमामध्ये ! कोणीतरी हक्काचे असेल आपल्या जवळ.. ! व समजा तीने / त्याने तुमचे सत्य स्विकारलेच नाही तर... अरे बॊस... ना दुनियासे दारु खतम हुई ना.. दोस्त... ;) चालूच आहे ना जिने .. ! पण जरा पॉझीटिव्ह विचार करायला काय हरकत आहे ?

माझे जरा नशीब कमजोर होतं.. अथवा... प्रेम नावाचा हिस्सा माझ्या नशिबी नव्हताच.. असे अनेक जण डायलॉग मारतात... अरे प्रेम रोज तुमच्या ह्दयाला टकटक करुन जातं .. पण त्याला तुम्ही प्रतिसाद कुठे देत आहात... म्हणे नशीबात नव्हतं... ! माय फुट... अरे ज्या जगात कुत्र्या माजंरावर जिवापाड प्रेम करणारे आहेत... तेथे एका बोलत्या.. चालत्या.... ह्याचं हदय धडकतं .. ज्याला प्रेम भावना म्हणजे काय कळतं... अश्या मनुष्याशी कोणी प्रेम करणारेच नाही ह्या जगात असं कसं होईल यार... ! कोणी तरी आहे यार.. समजुन घेण्याची बात आहे... जर हे समजल तर मग काय.... गालावर मोरपंखांचा स्पर्श होणे म्हणजे काय हे काही क्षणात समजेल.. पण येथे एक अट आहे...खुप कमी वेळा असं होतं की ती प्रेमाबद्द्ल स्वत: बोलते.. बॉस हे तुला स्वत:ला ओळखावे लागेल... नाही तर गाडी कधीच रस्तावर येणार नाही... ! हिंमत तर करावी लागते.. त्याने / तीने केली तर क्या बात !

मला ही माहीत आहे ह्या सगळ्या लिहण्या-बोलण्याच्या गोष्टी.. पण मित्रा जर तुला कोण तरी भेटलेच...तर.. तु काय करणार त्यावेळी ? मागे मी एका गोष्टीत गटस बद्द्ल लिहले होते.. ही खुप कामाची गोष्ट आहे बॉस ज्याच्याकडे गटस आहेत ना.. ती व्यक्ती कधीच मरत नाही... मी लिहून देतो हवं तर.. भरोसा ठेवा...! अरे जराशी हिंमत... जगण्यातील मजा कळेल यार.. ! शोधा शोधा.... जवळ पास कोणीतरी असेल जो तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल.... ! जेव्हा हे प्रेम मिळेल ना तुम्हाला बॉस ... तु खुषीने पागल होशील हे नक्कीच.. अरे प्रेमाची नशा तुला माहीत असेलच.... जरी माहीत नसली तरी... कोणी तुझ्यावर प्रेम करतं... ही भावनाच अनमोल आहे यार... ! जगणं खुप सोपं आहे.. मित्रा.. अरे आरामात जगता येतं फक्त मुखवटे चढवं बस्स..पण प्रेमात मुखवटे नाही चालत बॉस ... ! चुकुन मुखवटा घालून प्रेम केलंस ना.... तोंडावर पडशील... जेथे प्रेम आहे तेथे सत्य देखील असावेच लागते नाही तर... लफडा.. त्याला प्रेम नाही म्हणत मग... त्याला धोका म्हणतात...! सत्याला जवळ ठेव .... कधी तरी... जिवनाच्या कुठल्यातरी मार्गावर कोणी ना कोणी एक गुलाबाचं फुलं तुझ्यासाठी खास घेऊन उभे असेल... जेव्हा ती व्यक्ती तुला भेटेल तेव्हा शक्यतो तुझ्या कडे काही नसेल देण्यासाठी.... पण जी व्यक्ती तुला देण्यासाठी काही घेऊन येत आहे त्यासाठी तुझे बोलच अनमोल असतील.. प्रेमाचं असंच असत यार... जे घेण्यावर नाही... देण्यावर भरोसा ठेवतं !!!! चिल्ड !! बी कुल !..... जरा मागील रात्र सोड... नवीन पहाट होत आहे.... नवीन सुर्य उगवत आहे.. स्वप्न व सत्य ह्यातील फरक कळण्याचा वेळ आला आहे.... जागा हो बॉस जागा हो !

***********
क्रमश: नका समजू..जो पर्यंत जगत आहे तो पर्यंत प्रेमाचा कधीच द एंन्ड होणार नाही.... पण कधीतरी असाच वेळ मिळाला व काही डोक्यात घोळत असेल त्यावेळी पुढील पार्ट जरुर लिहीन.... :)

***********
हसण्यासाठी कारण शोधत बसू नका... बस हसा.. हसा.. मनसोक्त हसा... जगण्याचे चारच पल असतात आपल्या जवळ... बाकीचे जगणे आपण कोणा ना कोणासाठी तरी जगत असतो... पण ते चार पल असे जगा की जगाला याद राहिले पाहीजे.. हां यार तो होता... खुप मजेशीर, हसमुख व जिंदादिल ! मुडदे मला मित्र म्हणून आवडत नाहीत बॉस !!!

दुनियादारी - माझ्या नजरेने !

दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले. माझी एक वाईट सवय आहे कुठलेली पुस्तक हातात आले की लगेच मी सर्वात प्रथम व सर्वात शेवटचे पानं वाचतो, पण दुनियादारी बद्दल एवढे वाचले होते (प्रतिसाद व खरडी) की हिंमत झाली नाही शेवटचे पान वाचण्याची ना पाहण्याची,

सुरवातीपासून वाचण्यास सुरवात केली व सरळ शेवट करुन पुस्तक बंद केले. व विचार केला हे पुस्तक आपण का व कश्यामुळे पुर्ण एका बैठकीत ते पण ऒफिसमध्ये ज्याकाळात जेवायला फुरसत नाही तेव्हा वाचले, का ? कारण सरळ होते एक तर मिपावर जरुर वाचावे असे पुस्तक असा शेरा मिळाला होता व मनात एक हुरहुर होती जे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशीत झाले ते आजच्या जगाबद्दल कसे व्यक्तव्य करु शकते ? पण मिपावरील लेखामध्ये आलेले प्रतिसाद व लेख वाचून मनात होते की हे पुस्तक व्यवस्थीत वाचायचे व मगच विचार करायचा, एकदा वाचले एका बैठकीत, परत वाचले दुस-या बैठकीत एकाच दिवशी आधी न घेता व नंतर घेतल्यानंतर. फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? ते जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील पण मनातील हुरहुर मिटवणे गरजेचे त्यासाठी हा लेखन प्रचंच.

**************************************

दुनियादारी कुठून सुरु व कुठून समाप्त हे कळतच नाही हे वास्तव आहे, कुठल्याही पात्राच्या जागी तुम्ही स्वत:ला पहाणे हे यश आहे ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे. भन्नाट वेग व एकापेक्षा एक सरस व्यक्ती हेच ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे यशाचे कारण. कोण कुठले श्रेयस , डिएसपी, अशोक, एम के, श्री, नितीन, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन , मिस्टर व मिसेस तळवळकर, कोण अशोकची आई व कोण दिन्याची फॆमेली, कोण जाणे कुठले एसपी कॊलेज पण आपण वाचनाता अचानक गुरफटले जातो व वाटते अरे आम्ही तर ह्यांना ओळखतो जर जवळून नसेल तर दुरुन सही पण आम्ही ओळखतो सर्वांना, पुस्तक वाचण्याआधी व वाचल्यानंतर आपले भावविश्व एकदम वेगळे होऊन जाते, आपण का जाणे अचानक एका वेगळ्याच विश्वामध्ये रमतो, जो आपल्याला नेहमी खटकत असतो जिवनामध्ये तो पण आपलासा वाटू लागतो त्याचा चुकीचा दृष्टीकोन देखील आपण जरा तपासून पाहू लागतो., मित्र, कॊलेज, मारामा-या व तो संतोष बार पाहिला नाही असे नाही कुठे ही जा कोल्हापुरात, पुण्यात अथवा अस्सल दिल्ली मध्ये नाहीतर कानपुरमध्ये सर्वत्र हेच मग ह्या पुस्तकात असे काय आहे ज्याने मला वेड लावले तर ते आहे प्रत्येक व्यक्तीरेखेचे भावविश्व.

अरे वाचताना हदयावर खड्डे पडतात यार हेच यश. चार पानं हसण्याची तर चार पानं निरंतर अश्रु ढाळण्याची, माझ्या मित्रांनी मला कधी एवढे इमोशनल पाहिले नव्हते ते जरा चरकलेच पण हा एक पुस्तक इफेक्ट आहे हे कळाल्यावर चार शिव्या देऊन गप्प झाले पण मी गप्प होऊ शकलो नाही, डोक्यात कुणाला दोष द्यावा हाच विचार चालू होता व आहे.

***************************************
शेयस तळवळकर, हा तुम्हाला कुठे ही भेटेल अगदी तुमच्या जवळपास वावरत असेल, नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर / रुम वर पडिक, मित्रांमध्ये रमलेला, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा पण काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला. मीनू एक नजर काफी, आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी अशी मिनू तुम्ही देखील कधी ना कधी पाहिलेली, अंगात रग असलेला पण रस्ता माहीत नसलेला, मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि एस पी देखील तुम्हाला कोप-या कोप-यावर भेटेल, मित्रांना नेहमी हसवणारे / प्रत्येक वेळी साथ देणारे नितीन, मध्या व श्री देखील भेटतील, तसेच मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे प्राणी देखील आपल्या आसपास भेटतीलच. कुठल्याही बार वर जा तुम्हाला एम के जरुर भेटेल जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम. नातेगोती कधी अश्या क्षणाला पोहचली की जेथे तोंड दाखवायला जागा राहिली नाही की मनमोकळेपणा अशी अनेक जोडपी आपलाला आसपास दिसतील.

ह्या पुस्तकात आहे तरी काय ? ह्या २७२ पानी पुस्तकात एक कॊलेज आहे, एक कट्टा आहे, काही मित्र आहेत काही मैत्रीणी आहेत, आई-वडील आहेत एक एमके आहे व एक त्याची कोणीच नसलेली पण सर्व काही असलेली स्त्री आहे, प्रेमाच्या अथांग सागराला कसा वळसा देणे आहे हे माहीत असलेली शिरिन आहे तर नात्यांना किती किंमत द्यावी हे माहीत असलेला तीचा भाऊ आहे, प्रेम म्हणजे एक दरी आहे व दरीच्या काठावर उभे असलेले सुर्यास्त व सुर्योदय निहारत असलेले जोडपे आहे तर प्रेम म्हणजे काय माहीत नसलेली व एका मुर्खाशी लग्न करायला एका पायावर तयार असलेली प्रियसी देखील आपल्याला भेटते. प्रत्येक जण वेगळा पण एकमेकाशी जुडलेला ह्या ना त्या कारणाने.

लहानपणापासून आई-वडिलांच्यापासून दुरावलेला एक मुलगा, वडिलांच्या इच्छे खातिर लग्न केलेली व प्रेमाचा बळी देलेली आई, बायको दुस-यावर प्रेम करते हे माहीत असून देखील लग्न केले व लग्न टिकवण्याचा व नाते जपण्याचा निरंतर प्रयत्न करणारा पती, पतीने धोका दिला म्हणून विचित्र अवस्थेत प्रियेसी, स्वत:ला प्रियतमे ने सोडला म्हणुन निराशेच्या गर्तेत डुबक्या मारणारा एम के, एक गावगुंड पण मनात दोस्तीचा दर्या असलेला व मनाने हळवा डिएसपी व त्यांचा अफाट मित्रसंग्रह.

***************************************************

शनिवार १२ सप्टेंबर २००९

काही क्षण...

काय हरवले ? कसे सांगू काय हरवले ते ! काही क्षण...
तुझा स्पर्श.. तुझा गंध... व कोठे तरी तुला देखील..

*

हे असेच असते माहीत असून देखील अनोळखी मार्गावर मी नेहमीच पाऊल टाकतो काय मिळते मला काय माहीत पण सुखाच्या काही क्षणासाठी मी माझे प्राण देखील टाकतो.. वाटेवर.. सरळ चालणे मला जमतच नाही.. काय करु जन्माची खोड.. आता सुटेल लवकरच.. असाच कुठला तरी क्षण मला ही घेऊन जाईल बरोबर जशी तु गेलीस.. कळत नकळत.

*

कधी तरी असाच ... ग्लास हाती घेऊन बसतो मी.. कुठले तरी गाणे पीसीवर चालू असते... व कळत न कळत आश्रु डोळ्यातून. सवय आहे आजकाल मला त्याची.. सुखाची सावली असो वा दुखःची झळ... माझ्यासाठी तूच.. मला माहीत आहे तुला मी आठवणे अशक्य आहे... ! पण कधी वाटते... अशीच तु देखील बसलेली असशील संध्याकाळी.. काहीतरी निवडत.. तांदुळ साफ करत.. डोळ्यावर येणा-या केसांना दुर सारत... बागड्यांचा किणकिटाट.. होत असेल.. तेव्हा कधी तरी.. तुला मी आठवत असेनच.. काही क्षणतरी नक्कीच... शक्यतो नाही देखील...माहीत आहे..

*

सर्व काही विसरणे तुला शक्य आहे हे मला माहीत आहे.. तशी तु मनाने खुप खंभीर.. पण तरी ही परवा तुला माझी आठवण आलीच असेल नाही.. तुझ्या लग्नाचा वाढदिवस... कितवा.. आठवत नाही आता.. पण तुला मी नक्कीच आठवलो असेल.. जेव्हा तुझ्यासाठी तो आनंदाचा दिवस तेवढाच माझ्यासाठी देखील.. तुझं लग्न व माझा वाढदिवस.. ! एकाच दिवशी. म्हणून तर मी म्हणत असे तुला की तु मला असे काही देणार आहेस जे मला जन्मभर लक्ष्यात राहील.. भेटलं मला ते... एक भळभळती जख्म... अशीच जर रक्त वाहत नसेल तरी ही मी स्वतःच्या नखाने.... !

*

मला वाटले होते तुला विसरणे सहज शक्य आहे.. असेच काही क्षण निघून जातील एवढाच वेळ मला हवा.. पण आता वर्षानु वर्ष गेली.. पण तुला विसरणे सोड... प्रत्येक नवीन जख्म पण तुझीच आठवण करुन देते... ! प्रेमाला बंध नाही हे मला ही माहीत आहे.. तु माझ्यापासून दुर आहेस हे माहीत आहे मला... फक्त सात पाऊले.. तरी ही ... ती सात पाऊले माझ्यासाठी सात जन्माची आहेत.. हेच मी विसरु शकत नाही आहे... !

*

खुप जणांनी प्रयत्न केला बरोबर चार पाऊले चालण्याचा.. कधी नशीबाने तर थट्टा केली... तर कधी मध्येच निसटुन जाणा-या हातांनी.. चालायचेच.. ! सगळ्यांना तुझी सर येणे शक्य आहे काय... काही प्रश्नांची उत्तरे मला माहीत आहेत.. तरी ही मी त्या प्रश्नाना मी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.. प्रत्येक वेळी.. नवीन उत्तर... ! हरकत नाही.. चालेल मला.. पण कधी तरी सात पाऊले तुझी संपल्यावर आठवण ठेव... मी उभा असेन असाच कोठे तरी.. तळपत्या उन्हामध्ये.. तुझी वाट पाहत.. नेहमी प्रमाणेच !

कल्पित

अस्तित्व

आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी. तो पण त्याचं कंपनीत होता ज्यातून मी सुरवात केली होती जिवनाची. आज तो मोठा झाला पण मला नाही विसरला. परदेशात होता. आता पिंक स्लिप मुळे परत आला. काही महिन्यापुर्वी भेटला होता. त्याने घरी बोलावलं म्हणून गेलो. तर ह्याची अवस्थाच बिकट झालेली त्याला काहीच कळतं नव्हतं काय करावे, जो भेटेल त्याच्या कडून सल्ले मागायचा माझ्या कडून ही मागितला. मी अडाणी काय सल्ला देऊ त्याला. हाच लेखन प्रचंच.

****
ती- त्यांची बायको
तो- वरील मित्र
मी- मीच.
छकुली - त्यांची छोटी मुलगी.
स्थळ- त्यांचेच घर.
****

ती- तु बघतो आहेस ना कसा तुटला आहे तो
मी- वहिनी कळजी नका करु सर्व होईल सुरळीत.
ती- मी पण हेच म्हणतं आहे पण हा.
मी- दादा, असं का करता तुम्ही शिकलेले सवरलेली माणसं तुम्ही.
तो- हा. हा. शिकलेली सवरली माणसं म्हणूनच तर जमीनदोस्त होत आहे, बाबा असते तर !
मी- बाबा असते तर काय ?
तो- त्यांनी जी जमीन आम्ही न कसता सोडून दिली आहे ती अशी कधीच राहू दिली नसती. दोन वेळचं जेवण तरी भेटलं असतं त्यातून.
मी- दादा, तुला पुन्हा नोकरी मिळेल रे.
छकुली- ये मामा, मला बाहेर जायचं आहे, बाबा कुठंच घेऊन जात नाही आहेत मला.

****
त्यांचा हुंदका फुटला व तो सरळ मला घेऊन बाहेर आला व म्हणाला " तुझ्या रुमवर चलू या." मी त्याला घेऊन माझ्या रुमवर आलो व काय घेणार हे न विचारताच त्याचा पॅग भरला व त्याच्या हाती दिला व बहाद्दुरला सांगितले जा जरा दोन तास फिरुन ये जा.

****

तो- काय उत्त्तर देऊ त्या मुलीला ?
मी- अरे, कमीत कमी तीला तरी बाहेर घेऊन जात जा रे. तीचे काय चुकलं आहे ह्या सर्वात. तीची का आबाळ.
तो- तु म्हणतो आहेस ते बरोबर आहे रे. पण माझं मनचं होत नाही आहे. तीने काही मागितले तर ?
मी- अरे असे काय करतोस. इवलीशी ती मुलगी चॉकलेट व बाहुली सोडून काय मागेल तुझ्या कडून.
तो- तुला माहीत आहे ? माझा जॉब जाऊन १० महिने झाले आहेत. मी आठ महिने तीकडेच जॉब शोधत होतो. मीळाला नाही.
मी- मग.
तो- मला वाटलं होतं की असेच छोटे मोठे वादळ आहे, शांत होईल. पण नाही झालं !
मी- ह्म्म. मग तु भारतात कधी आलास परत ?
तो- मी भारतात परत येण्यासाठी तीकडे गेलोच नव्हतो. मला वाटायचं की मी एवढा शिकलो आहे, जॉब चांगला आहे तीकडेच राहू.
मी- बरं पुढे.
तो- पण आठ महिने विदाऊट जॉब. परिवारासोबत. सर्व जमापुंजी कमी कमी होत गेली.
मी- ह्म्म. पण तु दोनचार वर्ष होतास ना तिकडे. पैसे पण चांगले मिळायचे तुला.
तो- हो. पण दोन वर्षापुर्वी जमा पैशातून घर घेतलं होतं. त्यावेळी भाव खुप वधारलेला होता. पण स्वत: घर ह्या नादात घेतले.
मी- ह्म्म. व आता फुगा फुटला.
तो- हो. जे घर एक रुपया देऊन घेतले होते ते ४० पैशाचे पण नाही राहिले. शेवटी ते पण विकले व जमा पैसे घेऊन इकडे आलो.
मी- ह्म्म. तु इकडे ट्राय नाही केलास जॉब साठी ? इकडे अजून येवढा हाल खराब नाही आहे.
तो- करत आहे रे. पण त्या स्टेटस चा जॉब नाही मिळत आहे.
मी- ह्म्म. तुझे गुंतवणूक केलेले फंड. त्याचा पण हाल खराब असेल.
तो- ५०% पेक्षा खाली आहेत.
मी- तुझ्या पॉलिसच व्यवस्थीत. हप्ते भरतो आहेस ना ?
तो- मागील वर्षापर्यंत आहेत अरे. ह्या वर्षाचे काही खरं दिसत नाही आहे. पण पॉलिसी पुर्ण पण होत नाही आहे. लॉन्ग टर्म वाले आहेत. सर्व.
मी- ह्म्म. हप्प्ते व्यवस्थीत भर. काही काही करुन. त्यामुलीचे भवितव्यासाठी ती गुंतवणूक गरजेची आहे.
तो- हम्म.
मी- तुला कुठली ऑफर आली होती का ?
तो- आली होती. बेंगलोरहून. पण पगार. लेव्हल.
मी- जरा काही काळ लेव्हल व पगार ह्या गोष्टी सोडून तु घरा कडे बघणार का ?
तो- म्हणजे ?
मी- अरे भावा, असं तु कर्ता पुरुष घरात बसून राहिलास तर वहिनीला काय त्रास होत असेल ह्यांची तुला कल्पना आहे का ?
तो- तीला कसला आला रे त्रास दोन वेळचं मिळत आहेच. बाबच्या कृपेने घर स्वतःचं आहे.
मी- रे , असं नसतं. तुला त्रास होत आहे हे तिला पण दिसत आहे व तुला त्रास होत आहे म्हनून तिला पण त्रास होत आहे.
तो- ह्म्म.
मी- तु मला फोटो पाठवले होतेस आठवतं.
तो- हो. आमच्या ट्रीपचे. तिकडे आमचे शेजारी व आम्ही गेलो होतो.
मी- बरोबर. त्यात वहिनी बघ व आता बघ. तुला कळेल मी काय म्हणतो ते.

****
तो हिरमुसला व कुठेतरी स्वतः मध्येच हरवला काही क्षण. चेह-यावरील त्याचे भाव क्षणागनिक बदलत होते, पण ते काळजीचे होते. मला जरा समाधान वाटलं. कमीत कमी ह्यांने विचार करायला सुरवात तरी केली. त्यांने जेवण केले व मी त्याला घेऊन परत त्याच्या घरी आलो व वहिनी शी थोडं बोलायचं हा विचार केला. तो गपचुप आपल्या बेडरुम मध्ये गेला व झोपी गेला.
****

मी- ह्याला आराम करु द्या.
ती- हो. तु चहा घेणार.
मी- ह्म्म. थोडासा. साखर कमी.
ती- ठिक बस.
मी- वहिनी, एक विचारु ?
ती- अरे विचार ना. तु काय परका.
मी- तसं नाही. हा ड्रिंक्स आधीपासूनच घेतो मला माहीत आहे, पण आजकाल जास्त घेतो का ?
ती-सोड रे ह्या गोष्टीला. त्याला त्रास होतो. मी अशी कमी शिकलेली. त्यामुळे मी देखील काही घराला हातभार लावू शकत नाही.
मी- पण तुम्ही त्याला व मुलीला व्यवस्थीत संभाळत आहातच ना. बस एक काम करा तुम्ही.
ती- काय ?
मी- त्याला बेंगलोरहून जॉब ऑफर मिळाली आहे. त्याला ती जॉब जॉईन करायला सांगा.
ती- मी बोलले होते त्याबद्दल. तर भडकला माझ्यावर.
मी- तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. माणसाला आपला लेव्हल व स्टेटस एकदम सोडावसं वाटतं नाही. पण
ती- पण ?
मी- लेव्हल व स्टेटस ह्या नादात घरादाराची आबाळ झाली तर. तुमची मुलगी लहान आहे अजून.
ती- मी खुप समजावले रे. पण ह्या असा हट्टी तुला माहीत आहे. मी उद्या पुन्हा प्रयत्न करते.

****
वहिनी ने काय प्रयत्न केला समजले नाही. पण हा कसाबसा तयार झाला व बेंगलोर ला गेला एकदाचा. जॉब मध्ये सेटल झाल्यावर बायको-मुलीला घेऊन जातो असे सांगून. परत आला दोन महिन्यातच.
****

तो- तुला सांगत होतो मी. तो जॉब माझ्या लेव्हलचा नाही आहे.
मी- काय झालं.
तो- माझ्या पेक्षा कमी शिकलेले. कमी अनुभव असलेले माझे बॉस ?
मी- अरे. असं काय करतोस.
तो- नाही. जमत रे मला.
मी- अरे. हाच तर तुला चान्स आहे. आपला अनुभव व शिक्षण ह्याचा फायदा घेण्याचा.
तो- म्हणजे. मी त्या अडाणी लोकांच्या हाताखाली काम करु. मी तिकडे परदेशामध्ये टिम लिडर होतो. येथे टिमचा हिस्सा ?
मी- अरे. तु भारतात आहेस. तुझी जॉब गेली आहे. तुला आपलं घर चालवायचं आहे फक्त ह्याच गोष्टी तु डोक्यात ठेव ना.
तो- काहीच समजत नाही आहे.
मी- अरे, तुला किती मोठा मोका मिळाला होतो तुला माहीत आहे.
तो- मोका ? ह्यात तुला कुठे प्रगती दिसत आहे. ही तर अधोगती.
मी- एक सांग. मी आपल्या जुन्या कंपनीत एक हार्डवेअर इजिंनियर पासून आयटी मॅनेजर पर्यंत कसा पोहचलो ? तु होतास ना बरोबर.
तो- अरे तुझ्या वरचे सगळेच मुर्ख भरती होते. व तुझा नॉलेज होतं डिग्री नव्हती त्याच्या कडे डिग्री होती नॉलेज नव्हतं
मी- हे तुला कळतं व मी जे तुला आधी सांगितले ते नाही कळाले ?
तो- अरे हो. छे. मी मुर्खासारखा वागलो यार.
मी- हरकत नाही. हे बघ, ह्याच देशानं. ह्याच मातीने तुला लहानाचा मोठा केला. सरकारी शाळेत शिकलास तु पण ना. अनुदान मिळवून ?
तो- हो. मला दोन स्कॉलरशीप मिळाल्या होत्या. दहावी-बारावी.
मी- ते ऋण फेडण्यासाठी देवानं तुला मोका दिला आहे. आपली बुध्दी व शिक्षण येथे वापर. ती कंपनी पुढे जाईल. त्या बरोबर तु पण .देशपण.
तो- हह्म्म.
मी- तुला तुझे अस्तिव टिकवायचं आहे. तर थोडी तडजोड तर करावीच लागेल जिवनाशी.

****
तो परत गेला डिसेंबर मध्येच जॉब वर. परिवाराला घेऊन. मी गेलो होतो जानेवारी मध्ये बेंगलोर ला. त्याला पण भेटलो.

****

मी- कसा आहे नवीन जॉब.
तो- मस्त. आवडलं काम मला.
मी- काय छकुली. काय करत आहेस.
छकुली- मामा, हे बघ माझी नवीन बाहुली व बाहुलीचे नवीन घर.

****
छकुलीचं नवीन घरं व माझ्या मित्राचे नवीन घरं बघून आनंद झाला. ह्या मंदिच्या काळात स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी थोडा वेळ आपल्या गर्वाशी, आपल्या लेव्हल व स्टेटस शी तडजोड केली तर हे जिवन किती सुखी होईल ह्याचा विचार ही शिकलेली माणसं का करत नाही हाच प्रश्न मला पडतो. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा लेव्हल व स्टेटस ह्या गोष्टी नक्कीच मोठ्या नाहीत.
****

जगणं !

इकडे तिकडे बघताना जाणवतं की वाहत राहणे हा पाण्याचा गुणधर्म, जेथे पाणी थांबले तेथे डबके तयार होतं व चांगले साफ पाणी देखील खराब होतं. असाच काहीसा गुणधर्म जिवनाचा पण आहे, जिंदादिलीने जगणे म्हणजे जिवन, प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस. जे आहे त्यात संतुष्ट राहणे चांगले आहे पण त्याच बरोबर काही तरी नवीन करण्याची जिद्द / ललक मनामध्ये असणे म्हणजे जिंदादीली, स्वप्न असावीत प्रत्येकाची, मनामध्ये एक धेय असावे, एक मुक्काम आपल्यासाठी ठरवलेला असावा तरच जगण्यात काही तरी मजा आहे, उगाच जगायचे म्हणून काय जगायचे ? गाढवासारखे ओझे वाहत जगायचे की काम करत आपली स्वप्ने पाहत, त्या स्वप्नांना पुर्ण करण्याचा ध्यास घेत उल्हासाने जगायचे हे आपल्याच हाती, जगता ना अनेक अडचणी येतात, दुखः येतात तर कधी कधी मानसिक त्रास होतो पण ह्यासर्वांना जो टाळून, त्यावर मार्ग काढून चालत राहतो तोच खरं जगणे जगत असतो.

दुखः कोणाला नाही आहे, सर्वांना काही ना काही दुखः आहेच ना, त्यांना उगाळत बसण्यापेक्षा जिवनाच्या उद्देशाकडे अर्थपुर्ण नजरेने पाहणं व त्याच दृष्टी ने वाटचाल करणे व आपल्या बरोबर आपल्या परिवाराला, मित्रांना व समाजाला घेऊन चालणे म्हणजेच जिवन. राग लोभ व मत्सर ह्या तर मानव जिवनाचा अविभाज्य अंग पण तरी ही असले गुण थोडा वेळ बाजूला काढले तर आपले जिवन किती सुखी आहे ह्या वर तुम्हाला आपोआप विश्वास बसेल. सिध्दांत व तत्वे ह्यांची योग्य सांगड घातली व थोडा नियमांचा हातभार आपल्या दैनंदिन जिवनाला दिला तर तुम्ही खरोखर एक उच्च पातळी गाठू शकता. प्रत्येकाचा एक प्रेरणा स्त्रोत असतो तो तुमचा दिपस्तंभ तुम्हाला जिवनात नेहमी मार्गदर्शन करत राहतो मग तो तुमचे आई-वडील, पत्नी, लेखक, एखादे पुस्तक, एखादा व्यवसायीक, फिल्मस्टार, एखादा चित्रपट, एकादे गीत, संगीत काही ही असू शकेल, जिवनाच्या यात्रे मध्ये अश्या ठरावीक अंतरानंतर भेटणारे दिपस्तंभच आपल्याला आपल्या मार्गावर व्यवस्थीत विचरण करता यावे ह्यासाठी आपल्या बरोबर असतात, जरुरी नाही आहे की ती प्रेरणा सरळ सरळ मार्गदर्शनातून मिळेल असे नाही पण त्याच्या कार्यातून, कलाकृतीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते, आपण आपले मार्ग स्वतःच ठरवतो पण त्या उद्दिष्ठाजवळ जाण्यासाठी आपण काही आधार घेतो ते आधार म्हणजेच आपले प्रेरणा स्त्रोत, त्यांचा हात हातात पकडला तर जिवन कसे सोपे सोपे वाटू लागेल.

आपलं लक्ष्य ठरवणं व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करणे ह्या दोन्ही गोष्टी साठी प्रेरणा तर असावीच लागते त्या बरोबर एक असाधारण असा गुरु देखील असावा लागतो ती गुरु म्हणजे कोणी शिक्षक अथवा मास्तर नाही, जिवनामध्ये कधी ना कधी एखाद्या वळणावर भेटलेला व्यक्ती, तुमचे आई-वडील अथवा पत्नी, कधी कधी लहान मुळे देखील गुरुचे काम करतात, जर तुम्ही सध्या टिव्ही वर एक जाहिरात येते ती पाहिली आहे का ? एक लहान मुलगा व त्यांचे वडील गाडी मध्ये बसलेले असतात, गाडी सिग्लनवर उभी आहे, व मुलगा आपण पुढे जिवनामध्ये काय करणार हे सांगत असतो व तो अचानक म्हणतो की बाबा एक आयडिया आहे मी मोठा झाल्यावर सायकल रिपेयरीचे दुकानच घालणार.. त्याचे वडील त्याच्या कडे एकदम चमकुन बघतात तर तो निरागस पणे म्हणतो की तुम्ही मोठी लोकं असेच जर विनाकारण पेट्रोल नष्ट करत राहिलात तर आम्ही मोठे झाल्यावर आमच्या साठि पेट्रोल कुठून येणार मग सगळे सायकलीच नाही का चालवणार.. ! किती उत्तम मार्गदर्शन ! पेट्रोल बचाव ची जाहिरात होती पण ती जाहिरात मला काही तरी शिकवून गेली माझ्या साठी तो लहान मुलगा गुरुच भले ही त्याचे डॉयलॉग कोणी दुस-याने लिहले असतील पण माझ्या पर्यंत ती भावना पोहचण्याचे कारण म्हणजे तो मुलगा त्यामुळे तोच माझा गुरु.

येवढ्या मोठ्या जगात काही ना काही उलाढाली चालूच असतात कधी चांगल्या तर कधी वाईट, त्याचा आपल्या जिवनावर प्रभाव पडतच असतो, परिस्थीती रोज बदलत असते, आजकाल मंदिचा बोलबाला आहे व तुम्ही आम्ही सर्वजण ह्यात जळत आहोत पण ह्यामुळे आपले मानसिक, घरगुती व सामाजिक स्वास्थ का आपण बिघडवायचे ? कोणी आत्महत्या करतो आहे कोणी आपल्या बरोबर आपल्या परिवाराचा देखील बळी घेत आहे, ह्याला कारण काय ? आपण बदल त्या परिस्थीतीला सामोरे जाण्यास कमी पडत आहोत का ? ह्या तून देखील मार्ग निघेल हा आशावाद का दिसत नाही आहे, सर्वत्र आशावाद ठेऊन चालत नाही हे मला ही माहीत आहे, कधी कधी समोरचा रस्ता बंद असतो तेव्हा आपण पर्यांयी मार्ग शोधतोच ना ? मग अश्या वेळी जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की आता काहीच मार्ग नाही म्हणजे तुम्ही हरला आहात असे नाही , तुम्ही खुल्ल्या मनाने नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्नच नाही केला असे आहे. जहा चाह वहां राह.. ही एक हिंदी मध्ये खुप चांगली कहावत आहे , ह्यावर विश्वास ठेवा, देवाची निर्मितीच ह्यासाठी झाली आहे की जेथे जेथे आपला विश्वास डगमगतो तेथे तेथे त्याचा सहारा घेता यावा व आपल्याला थोडा वेळ मिळावा की ह्या अडचणीतून कसा मार्ग काढावा पण जेथे संस्कार व जिद्द कमी पडते तेथे मग आत्मघात सारखे भयानक मार्ग अवलंबले जातात, ह्यातून ही मी बाहेर पडेन हा विश्वासच जेथे संपतो तेथे आत्महत्या होते भले ही तो माणूस मरु दे अथवा नाही ज्याचा स्वतः वरील विश्वास संपला तो संपला.


तुम्हाला काय वाटतं ?

तुम्ही आपल्या जिवनाचे उद्दिष्ठ व गुरु कसे ठरवता व तुम्हाला वेळोवेळी असे मार्गदर्शक भेटलेच असतील त्यांच्या बद्दल थोडं लिहा ही अपेक्षा, जेणे करुन जो खचला आहे त्याला थोडाफार मदतीचा हात मिळेल.

हे लिहण्यासाठी मला प्रेरणा ह्या बातमीतून मिळाली होती.

धन्यवाद.

पाप येवढे आहेत डोक्यावर...

कर्म, आराध्य व मी ह्यात सध्या गुरफटलो आहे मी काय शेवटचे लिहू तुझ्यासाठी काही असेच शब्द, जे माझ्या मनातून उमटत आहेत. काय नाही दिलेस तु मला जिवनामध्ये ? जेवढे जगलो सुखाने जगलो, काही क्षण दुखाचे तर काही क्षण सुखाचे ! माझे कर्मभोग तरी ही तु साथ होतीस, दुखात ही तु सुखी होतीस... पण तुझे अश्रु देखील मी कधी फुसले नाही, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा देखील मी तुझ्या जवळ नव्हतो, कष्टांना तु आपलसे केलेस, माझ्यासाठी कधी तरी रक्त देखील सांडलेस.

जेव्हा तुला मी उमजलो तेव्हा देखील मी असाच होतो आज ही असाच आहे, सध्या वयाच्या बाबतीत मी अश्वथामा आहे, मरण नाही पण सुखाचा मणी कोणी तरी, कोणी तरी काय ज्याने दिला त्यानेच काढून घेतला आहे, भळभळती जख्म अशीच उघड सोडून दिली आहे त्याने माझ्यासाठी, एकच शब्द जगणे सोडला आहे माझ्यासाठी, पण का व कुणासाठी ह्याचा काही आधार ? मागे पाहतो तो काही शव माझ्या खांद्यावर आहेत असेच आपल्याचे, कोणी आपलं होतं, कोणी रक्ताचे तर काहींचे ऋणानूबंध. पण सध्या शव उचलून उचलून दमलो आहे, काल जे शव श्मशानामध्ये पोहचवले त्याचा चेहरा पण नाही पाहीला.. कारण ते शव देखील माझेच होते मरत कोणीही असो, पण क्षणा क्षणाला चिता माझीच जळते.. असेच अगणीत वेळा मी जळलो आहे. कधी तरी एक शव माझा ही असेल असेच निपचित पडलेले. सुखासुखी जगामध्ये अवचितपणे कोठेतरी हरवलेले.. कोणाला काय पडले आहे दुस-याच्या खांद्यावर कोणाचे वजन आहे ह्यांची ? कोणी गाते आहे कोणी हसत आहे कोणी जगाचे रंगबिरंगी रुप पाहात आहे..समोरुन गेलेल्या यात्रे मध्ये कधीतरी मी पण असेल ह्याची कुणाला चाहूल आहे ? हे शब्दजाल आहेत मला ही माहीत आहे कधी तुझ्या समोर मी हे लिहलेले बोलेन ह्यांची खात्री मला ही नाही तरी ही..

पण जाण्याआधी काही वचने आहेत काही संस्कार आहेत त्यांना पुर्ण करणे आहे, नांदत आहे ती दुस-यांच्या घरी तीचे देखील पहावयाचे आहे मला माहीत आहे त्यामुळे मी सध्या जिवंत आहे, एकुलती एक असली तरी काय झाले तीच्यासाठी देखील मी एकुलता एकच आहे, दुखःची काय कमी ह्या जगामध्ये, पण सध्या मी तुमच्या बरोबर सुखात ही नाही, किती घाव होत असतील तुझ्या मनावर ह्याची थोडीफार कल्पना आहे पण माझा ना-इलाज आहे, तु जी आहेस ते मी शत जन्मी देखील होऊ शकत नाही, तु जे भोगले ते सहन करण्याची शक्ती माझ्यात कधीच येणार नाही, पण मी तुझ्या पोटी आलो हे भाग्य माझे पण मी तुझ्या पोटी आले हे दुर्भाग तुझे आहे ..


तु जगलीस माझ्यासाठी, मी पण मी ? माझा अहंम, माझा मी व दुस-यांचे अधिकार, हक्क ह्यांना संभाळात मी तुझा हक्क कधी हिरावून घेतला हे कळालंच नाही, आज उमजलं आहे पण... ती वेळ निघून गेली आहे, तो काळ, ती वर्षे ते तप मागे पडले आहेत... तु माझ्यासाठी वेचलेल्या कष्टांना, तु माझ्या आठवणीमध्ये सांडलेल्या प्रत्येक अश्रुंचा मी देणेदार आहे, कर्ज आधीच तुझे माझ्या अंगावर होते... सध्या मी कर्जामध्ये दबलेला आहे...

किती स्वप्ने असतील व किती कल्पना तुझ्या माझ्यासाठी... भांडी घासलीस दुस-या घरची तर कधी कपडे धुतले.. नशेचा कहर तु झेलला जन्मभर.. मी देखील असाच अडाणी राहिलो, किती प्रयत्न केलेस तु मला शिकवण्यासाठी पण मी मुर्ख असाच शिकण्यापासून पळत राहिलो... माझ्यासाठी कधी पाटल्या विकल्या तर कधी मंगळसुत्रातील सोने.. तुला काय वाटले मला आठवत नाही ते दिवस, मी लहान होतो पण असाच निगरट होतो.. , माझ्यापुढे मी कुणालाच पाहत नाही, माझा गर्व माझा अहंम म्हणजेच माझे सर्वस्व आहे असेच समजत होतो पण एक एक करुन सगळे सोडून गेले कधी देवाची करणी तर कधी नशीबाची खेळी... कधी जिंकलो तर कधी हरलो पण ह्या खेळामध्ये मी तुला काही क्षण विसरलो.. त्याच कर्मांची फळे मी भोगली आहेत... ज्यांच्यासाठी जगलो तेच गेले.. आपल असं कोणीच राहिले नाही जवळपास, अमर नात्यांच्या ग्वाही देणारे आज पलिकडे बसले आहेत, मला ह्या जगात एकटेच सोडून... कोणी येतं काही क्षण मध्येच पण नाते न जपता फायदा जपून..पुढे निघून जातात असेच नेहमी प्रमाणे मला एकटे टाकुन !

आज तुझ्यापासून दुर आहे, हजारो किलोमिटर पण मनाने तुझ्या चरणावरच लोटांगण घातले आहे.. तु मला एकदा माफ कर, ह्या जन्माची कसर नक्कीच भरुन काढेन, पुढील जन्मात तुझ्या पोटी येईन !
पण ह्याची खात्री नाही, पाप येवढे आहेत डोक्यावर...

रविवार १५ मार्च २००९

ए-दिले-नादान

कोई ये कसे बताएं की ओ तन्हा क्यु हैं
वह जो अपना था वही ओर किसी का क्युं है
यही दुनिया है तो फिर ऎसी ये दुनिया क्युं है
यही होता है तो आखिंर यही होता क्युं है !


असंच कुठल्यातरी वळणावर मी उभा आहे तुझीच वाट पाहत जसं वाळत चाललेले ते आपलंच चिंचेचे झाडं, आठवतं तुला तु मला फोन केला होतास की राज ते झाड पडलं रे, खुप वाळलं होतं, तसाच कधी तरी मी पण पडेन पण ह्यावेळी तुला सांगणारं कोणीच नसणार आहे, मला ह्याचं दुख: नाही आहे की तुला सांगणार कोण, तुला कळणारं कसे पण तरी ही माझं मन उगाच उदास होतं, त्या झाडचं आपलं कोण होतं ज्यांना त्याच्या पडण्याचं दुख: झालं ? नाही गं तु वेडी व मी वेडा त्यामुळे आपण त्याची काळजी केली कारण तोच एक होता जो आपल्या सुख: दुख: चा साथी होता तो माझ्यापेक्षा जास्त तुझ्याजवळ होता, हजारो किलोमिटर दुरवर त्याच्या पासून मी तर तु काहीच पावलावर होतीस, पण जेवढे दुख: तुला झालं तेवढंच मला ही झालं, ते झाड नष्ट झालं, पण त्या बरोबरच आपल्या ही काही आठवणी ..तु त्याच्या पाठीमागेच विसावली होतीस कधी झाडाच्या माझ्या छातीवर डोकं ठेऊन... विसावली होतीस कधी आपल्या जगापासून अलिप्त राहून.. आपल्या प्रेमाचा अंकुर देखील तेथेच उमलला होता कधी, आज ते झाड आठवायचं तसं काहीच कारण नाही पण माझा नाईलाज. जुन्या आठवणी आल्या की ते झाड आपसूकच डोळ्यासमोर येतं व कळत न कळत अश्रु कधी गालावरुन ओघाळतात कळत ही नाही.

ए-दिले-नादान आरजु क्या है जुस्तजु क्या है ।
क्या कयामत है क्या मुसिबत है,
कह नही सकते किस का अरमां है
जिंदगी जैसे खोई खोई है, हैरा हैरा है । 


किती तर गोष्टी आपल्या जिवनाचे अविभाज्य अंग होत्या पण अचानक एक एक करुन सर्व गायब झाल्या जश्या वळवाचा पाऊस कधी आला व कधी गेला कळालंच नाही, नाही तुझ्या बद्दल मनात जराही किंतू परंतू नाही आहे पण तरी ही आज असचं सर्व आठवलं, वळवाच्या पावसावरुन आठवलं, तुला आठवतं का एकदा असाच मार्च मध्ये वळवाचा जोरदार पाऊस पडत होता व तु बाहेर मनसोक्तपणे भिजत आपल्या मैत्रिणी बरोबर पावसाचा आनंद घेत होतीस त्या चिंचेच्याच झाडाखाली मी उभा राहून तुला निहाळत होतो, तुझ्या डोळ्यातून तो मिश्कलीपणा मला अजून ही आठवतो, प्रत्येक सरी बरोबर तुझं ते गिरक्या घेणं व तुझ्या केसांच्या बटातून ते ठेंब ठेंब पाणी तुझ्या गालावरुन ओघाळणं, काहीच पावलांवर तर उभा होतो मी तुझ्या पासून, आज ही दिसतं आहे मला माझ्या डोळ्यासमोर तो क्षण, अरे हो तुझ्यासाठी ती काही मिनिटे होती माझ्या साठी तर ते क्षणच नाही का जे मी जपून ठेवले आहेत, माझ्यासाठी असे अनंत क्षण आहेत माझ्याकडे पण आजकाल ते क्षण देखील अपूरे पडता आहेत, असं नाही की काही कमी आहे पण मी पुर्ण नाही आहे हे मला जाणवतं आहे फक्त तुझ्यामुळे, असं का व्हावे, मी तुला का नेहमी आठवावे, कधी कधी वाटतं तु आपल्या जिवनामध्ये किती आनंदी आहेस का मी नजर लावावी, त्यामुळेच तर मी त्या दिशेला पाहणं सोडलं आहे कधीच.

कभी किसी को मुकमील जहां नही मिलता
कही जमीं यो कहीं आसमां नहीं मिलता । 


माझ्या समोर पर्याय नाही आहे मला कधी कधी जावसं वाटतं त्या शहरामध्ये, त्या गल्ली मध्ये त्या घरासमोर जेथे तु कधी राहत होतीस, आजकाल तुझी आई-वडील राहतात, तुझी आई मला ओळखत नाही कशी ओळखेल ती मला खुप वर्ष झाली मला भेटून पण तिला, पण मी वेडा जातो कधी कधी व त्या चिंचेच्या झाडाच्या जागेवर आजकाल छोटेखानी मंदिर आहे अगदी तुझ्या घरासमोरच, पण कधी काळी येथे बाग होती व समोर मोकळी जागा पण आज काल येथे उंच इमारती उभ्या आहेत एका कोप-यातून हलकचं तुझं घर दिसतं, ते गेत, तुझं अगंण दिसतं, तेथेच बाहेर बसतो वाटतं की तु अशीच धावत येणार व मला म्हणणार कुठे होतास तु ! पण त्याच वेळी मी भानावर येतो व मला आठवतं की आता तु येथे नाही आहेस. तुच काय तुझी ओळख दाखवणारं काहीच येथे नाही आहे, ना आजकाल कोणी तुझ्या घरासमोर पाणी शिंपडतं ना त्यावर रांगोळी काढतं.. ना कोणी त्या सुखलेल्या झाडांना पाणी घालतं, बिचारी ती झाडं... तुझ्या विना एकदम वाळली आहेत... माझ्यासारखी.

तुझं से नाराज नही जिंदगी हैराण हू मैं ।
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मै । 


आयपॊड वर गाणं वाजतं आहे, कधी कधी वाटतं का मी एवढा परेशान आहे का मी कुणाच्या प्रश्नाचं उत्तर देणं लागतो पण मला माहीत आहे प्रश्न माझेच आहेत पण उत्तरे माझ्याकडे नाही आहेत, उत्तरे मलाच शोधायची आहेत पण प्रयत्न अपूरे पडत आहे, तुझ्या शिवाय राहणं एक वेगळी गोष्ट पण तू आपली होणारचं नाही हे माहीत असून पण जगणं ही एक वेगळी वेदना, कधी तुला माझी आठवण येते का नाही माहीत नाही पण मी मात्र नेहमी अश्वथाम्याप्रमाणे आपली भळभळती जख्म घेऊन फिरत आहे, उरावर काही प्रश्न व त्या प्रश्नांची न सापडलेली काही सापडलेली उत्तरे घेऊन. तुझ्या नंतर ही कोणीतरी आलं होतं माझ्या जिवनामध्ये, अशीच तुझ्या सारखी हसतं खेळतं, कधी माझ्या जवळ आली मला कळालंच नाही, मला ती तुझ्यासंगे आपलं म्हणत होती पण दैव माझं नेहमी प्रमाणेच निष्ठूर, मला जे हवं ते मिळायलाचं नको हे ते नेहमी पाहत आलं आहे, दुख: खुप झालं, तु माझ्यापासून दुर जाणं मला जेवढ्या जख्मा देऊन नाही गेलं त्या पेक्षा अगणीत जखमा मला तीचं अवेळी जाणं देऊन गेलं, कधी कधी वाटतं तीच्या जागी आपण का नाही गेलो, तेथेच होतो ना मी पण. दैवाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं, मी एकटाचं होतो त्यामुळे त्यानं सोबतीला तुझ्या आठवणी बरोबर तीच्या आठवणी देखील कपाळी लिहल्या माझ्या जन्मभराच्या सोबतीला.

जिने के लिए सोचा ही नही, दर्द सभालने होंगे... ।
मुस्काराये तो मुस्कारानें के कर्ज उतारने होंगे । 


बरोबर, तेच करतो आहे, पण का ? ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही आहे तुझ्याकडे आहे काय ? तु मला एकदा विचारलं होतसं की तु माझी जर झाली नाहीस तर, मी काय करेन. त्यावेळी ही माझ्याकडे उत्तर नव्हते व आज ही नाही आहे, तुझं स्वप्न आपलं म्हणून जगत आलो, सर्व विसरलो, शहरच्या शहरं बदलली, काय कमवले काय गमवले त्यांची तर किंमतच नाही पण ते स्वप्न पुर्ण झालं, पण त्या पुर्ण झालेल्या स्वप्नामध्ये कोण राहणार आहे, मी एकटाच. तुझ्याशीवाय जगणं शिकलो आहे पण तुझ्याशीवाय माझं अस्तित्वच नाही हे मी कसे विसरु. दिवस जातो गं कसातरी कामामध्ये, तक्रारी मध्ये, अडचणीमध्ये, हसतं, खेळत, लढत पण रात्र, जिवावर येतं कधी कधी जगणं देखील, मला माहीत आहे तु सप्तपदी घातली आहेस त्याच्या बरोबर्, प्रत्येक पावलावर एक जिवनाचं वचन, सात जन्माचं वचन तु दिलं आहेस, तुझ्या त्या वचनासाठी का होई ना पण मला तुझी सात जन्म वाट पाहावी लागेल त्याचं काय ? तु कधी विचार केला नसशील नाही, आस्तिक तर मी पण नाही एवढा पण फक्त तुझे शब्द पाळावेत म्हनुन जगतो आहे, नाही तर ह्या श्वासांची काय हिंमत तुझ्या विना एकक्षण देखील माझ्या बरोबर राहू शकतील. जीव देण्याचा भ्याडपणा मी कधीच करणार नाही हे तुला देखील माहीत आहे मला लढणं आवडतं पण समोर आलेल्या मृत्यला पण मी तेवढ्याच प्रेमाणे आलिंगन देईन हे नक्की.

हम भुल गये रे सारी बात पर तेरा प्यार नही भुले
क्या क्या हुवा दिल के साथ मगर तेरा प्यार नही भुले । 


मोठी माणसं म्हणतात मला, मी अडाणी आहे, मला भाषा कळत नाही, लिहता येत नाही, मी गांवढळ आहे, ना धड मराठी येत नाही ना धड कन्नड, हिंन्दी अथवा इग्रजी, काही शब्द माझे पण चुकतात, कोणी म्हणतं मी खुप वेगानं बोलतो, तर काही ना मी बोललेलेच कळत नाही , काही ना माझे शब्द कळत नाही तर काही ना माझी भावना, काही ना मी उथळ वाटतो तर कुणाला वाहतं पाणी, काही मला मित्र समजतात काही शत्रु तर काही मला ग्रहितच धरत नाहीत.. पण मला आता ह्या बद्दल काहीच वाटत नाही, कोण काय म्हणतो आहे, मी आहे तो असाच आहे, मी म्हणतो ती लोक वेड्याला शहाणं का समजता, माझ्यातला मी तर तेव्हाच गेला, जेव्हा ती गेली आता तर बस हा देह, ओझे वाहतो आहे वाहतो आहे कधी तरी मी पण मुक्त होईन, जेव्हा मी मुक्त होईन ना तेव्हा नक्कीच तुझ्या घरासमोरुन एक चक्कर मारेन, चुकून तु पुन्हा दिसशील, सकाळ सकाळी पाण्याचा सडा अंगणात घालताना, रांगोळी घालताना व चुकून तु बाहेर गेटकडे पाहशील तर तेथेच मी कुठे तरी कोप-यात उभा असेन तुला निहाळत , तेव्हा ना बंध असतील ना दैव. अशीच एक झुळुक तुझ्या गालाला स्पर्श करुन जाईल विश्वास ठेव तो स्पर्श माझाच असेल तुझ्या गालावर शेवटचा.

***

मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.

रविवार १६ नोव्हेंबर २००८

ती व मी !

***
अशीच एक सुस्त संध्याकाळ होती व अचानक माझा फोन वाजला !
अनोळखी नंबर होता, पण आला महाराष्ट्रातुनच होता, दोन एक क्षण विचार करुन मी फोन उचलला !
समोरुन हॆलो झाले व मी लगेच म्हणालो " बोल, कशी आहेस !"
ती. " अरे तुला कसं कळाले की मीच आहे ते ?"
मी " ह्म्म ! अजून स्मरणशक्ती चांगली आहे माझी, व तुझा आवाज तर माझ्या... ते राहू दे कशी आहेस"
ती " माझा आवाज तर तुझ्या ?? पुढे"
मी " राहु दे तुला माहीत आहे काय... हजार वेळा एकले असशील माझ्या कडून तु"
ती "ठीक, मी एकदम मजेत आहे तु कसा आहेस"
मी " मी ! एकदम मजेत तुला माहीतच आहे.. नावातच राज आहे.. तर ! मी नावाप्रमाणेच राजा माणूस काय"
ती " हुं ! खुप बोलायला ही शिकला आहेस"
मी " ह्या जगात राहून हेच तर एक शिकलो आहे"
ती " म्हणजे?"
मी " तुला नाही कळायचं ! ते सोड, तु सांग काय चालू आहे"
ती " काही नाही... सगळं व्यवस्थीत चालू आहे, तुला माहीत आहे मी किती वर्षानंतर तुझ्याशी बोलत आहे ते ?"
मी " तु वर्ष विचारत आहेस ? मी तुला वर्षे, महीने, दिवस व तास देखील सांगू शकतो.. "
ती " म्हणजे तु विसरला नाहीस अजून तर "
मी " छे ! विसरलो कधीचाच आहे.."
ती " हो दिसत चांगलच विसरला आहेस.. माझा आवाज ओळखलास तेव्हाच कळाले होते "
मी " ह्म्म ! मुलंबाळ काय करत आहेत सध्या ?"
ती "एक मुलगा आहे तो.. अजून शाळेत जातो.. आता नववी मध्ये आहे.... तु नाही लग्न केलसं"
मी " हा हा हा ! मस्त जोक आहे ! एक भेटली होती... लग्न ही केलं असतं.. पण दैवाला मंजुर नव्हतं"
ती " राज, तो जोक नव्हता... तुला एकदम मनानं विचारलेला प्रश्न देखील जोक वाटला ? "
मी " काही गोष्टी सुप्त अवस्थेत राहू देने चांगल असतं ! बरोबर ना"
ती " म्हणजे तु उत्तर देणार नाहीस तर"
मी " तसं काही नाही आहे.. पैशाच्या मागे पळता पळता आपलं घर कधी मागं राहीले हे कळालंच नाही, जेव्हा कळालं तेव्हा खुप उशीर झाला होता"
ती " असं कोड्यात नको रे बोलू , तुला माहीत आहे मला काहीच कळत नाही"
मी " चांगलं आहे.. काही गोष्टी नकळालेल्या चांगल्या "
ती " काय करतोस सध्या "
मी " तुला जेव्हा मी पहीले प्रेमपत्र दिले होते तेव्हा त्यात एक ओळ होती... माझ्या वर विश्वास ठेव.. तुला कोठेच काहीही कमी पडू देणार नाही जिवनामध्ये.. जिद्द आहे माझ्या अंगात एकदा गोष्ट मनावर घेतली तर ती मी पुर्ण करतोच... आठवतं तुला ? "
ती " हो.. खुप दिवस माझ्या जवळ होतं ते पत्र ! एके दिवशी तुझ्या वरील रागाने मी ते जाळलं होतं"
मी " तो राग का आला होता आठवतं तुला "
ती " अंधुकसं ! मी सगळे विसरले आहे राज ! माझं लग्न झालं आहे "
मी " ओह ! माफ कर... तुला माहीत आहे तु व तुझा विषय म्हणजे मी कुठे थांबावे हेच विसरतो"
ती "हरकत नाही, तुझा स्वभाव मला माहीत आहे !"
मी " तुला तुझ्या मैत्रीणीने सांगितलेच असेल मी दिल्लीत असतो ते , बाकी एक छोटासा बिझनेस आहे , वर्षाकाठी.. दोन-एकदा फिरायला जातो, कधी कधी गाडी घेऊन मस्त पैकी हायवे वर फिरतो... हे माझं लाईफ !"
ती " लग्न का नाही केलंस"
मी "तुझी गाडी परत माझ्या लग्नावर का ?"
ती " तुझी काळजी वाटते आहे"
मी " जेव्हा गरज होती तेव्हा काळजी घेणारं कोणीच नव्हतं गं, एक एक सण, एक एक उत्सव मी कोणाची तरी वाट बघत घालवले.. कुणाच्या लग्नाला जाऊन देखील वर्षानु वर्ष झाली आहेत... खास मित्राच्या लग्नाला न जाता नंतर काही दिवसानंतर त्यांना गिफ्ट देतो.. हा हाल झाला आहे.. एकलंकोडा झालो होतो ! तेव्हा कोणीच नव्हतं जवळ काळजी घेणारं ! "
ती " राज, I am really Sorry ! जे काही घडलं त्यात माझा काहीच दोष नाही रे !"
मी " ये वेडी, मी तुला कधीच दोष दिला नाही व देणार ही नाही ... कमी पणा तर साला माझ्या नशीबात होता.. चल सोड ना ! "
ती " नाही रे, मला निर्णय घ्यायला घरच्यांनी वेळच नाही रे दिला"
मी " सोड ना यार.. चांगलीच वर्षे निघून गेली त्या गोष्टीला... एक गोष्ट सांग तु घरी आली आहेस का सध्या ? "
ती " हो, बाबांनी नवीन घर घेतलं आहे.. जुनं घर विकलं त्यांनी !"
मी " अरे रे ! माझ्या कडे असलेल्या अनेक आठवणी मधलं ते घर विकलं. चल ठीक आहे तुझ्या बाबांनी काही विचार करुनच विकलं असावे"
ती" राज, तुला आठवतं तु सकाळ सकाळी बाईक वरुन आमच्या घरा समोरुन फेर-या मारायचास ? "
मी " हा.. तो काळ जबरदस्त होता यार... एक विचारु "
ती " बोल"
मी " एकदा भेटु शकतो आपण ?"
ती " काय ? कधी ? "
मी " उद्याच ? "
ती " पण तु तर दिल्ली मध्ये मी येथे "
मी " पाच तासाच्या आत पोहचेन "
ती " पण... घरी येशील ?"
मी " हो, तुझ्या बापाला मी आता पुर्वी सारखा घाबरत नाही गं "
ती " राज, माझे वडील आहेत ते"
मी " ठिक आहे, तुझ्या वडीलांना"
ती " ठिक आहे ये भेटूच आपण"
मी " thanks "
ती " अरे हा नवीन शब्द कधी शिकलास तु.. "
मी " अरे चुकन बोललो.. नियम विसरलो होतो मी पण..."
ती " किती वाजतो पोहचशील तु"
मी " उद्या चार वाजु पर्यंत"
ती " ठीक आहे ये मग. उद्याच बसून बोलु "
मी " ठीक आहे"

फोन कट झाला !
बाय बाय करायची सवय तीला आधी पण नव्हती व आज देखील नाही ! सुधरणार नाही कधीच !
मी दुसरा फोन लावला yatra.com ला ! "मला आताच्या आता मुंबई जाणे आहे कुठली फ्लाईट उपलब्ध आहे ?"
यात्रावाला " सर, रात्री ९.४५ ची आहे , जेटची"
मी " बुक कर ! "
यात्रावाला " सर फेयर चार्जेस "
मी " हरकत नाही जो रेट आहे काहीच हरकत नाही.. जरुरी आहे जानं"
यात्रावाला " कार्ड नंबर सर"

टिकीट तर मीळालेच .. प्रिंन्टं काढून हाती तयार.. कपडे काय घालू ? दोन भर ना बॆंग जो हाती येईल तो भर.. नंतर हॊटेल मध्ये बदलू !
"अंकल कुठ चालला गडबडीत ?"
च्या मायला हा कोण माझ्या घरी येऊन मला अंकल म्हणतो आहे ?
मी मागे वळालो व पाहून दचकलोच !

**********************

एक अनोळखी मुलगा माझ्या घरात... तेरेस वर माझ्या समोर उभा होता....
एक १०-११ वर्षाच्या लहान मुलगा हस माझ्या कडे पाहत उभा होता मी आठवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या ओळखीचा वाटलाच नाही.
मी " कोण है बेटा.. कहा से"
तो " काका मी अवधुत "

च्यामायला हा मराठी पण बोलतो !

मी "अवधुत ?"
तो " काका असे काय करताय मी तुमचा छकुला.. फोन व किती बोलता माझ्याशी"
मी " अरे छकुल्या तु ? येथे कसा काय आलास रे , घरातून पळुन तर आला नाहीस ना ? कोणाबरोबर आला आहेस ?"
तो " काका, असे काय करताय तुम्हीच तर बोलवलं होतो मम्मी पप्पा व मला .. दिल्ली दाखवतो म्हणून"
मी " अरे देवा, तुझी मम्मी पण येथेच आली आहे काय ?"
तो " हो खाली अंगणात बसली आहे पप्पा बरोबर.. तुम्हाला शोधून शोधून दमलो मी "
मी " अरे माझ्या बाळा.. मी विसलोच होतो रे तुम्ही येणार आहात ते , चल खाली चल !"
तो " ह्म्म्म, माझे चॉकलेट ? "
मी " अरे हा चल देतो"

त्याला चॉकलेट देऊन मी त्याच्या बरोबर बाहेर आलो तर लॉन मध्ये मनिषा व विवेक बसले होते !
मला पाहताच मनिषा पळतच आली व पाया पडत म्हणाली " दादा कधी पासून फोन वाजवतो आहे कुठ होतास "
मी "अगं पाया काय पडतेस... मी अजून म्हातारा झालो नाही बाई... बरं झालं आजूबाजुला कोणी पाहणारं नाही.. ... मी वर टेरेस वर बसलो होतो "
ती " तुझी सवय अजून गेली नाही.. संध्याकाळी नेहमी टेरेस वर जातोस काय करतोस रे वर टेरेस वर "
मी " एकटा खाली बसून काय करु म्हणून वर बसतो.. आजूबाजुच्या टेरेसवर जवळपासची लहान मुलं खेळतात च्या खेळ बघत बसतो"
ती "असं ! माझ्या लग्ना नंतर तु आज भेटतो आहेस आम्हाला "
तो पर्यंत विवेक ही जवळ येऊन बसला होता.. नमस्कार करुन म्हणाला " राज, तुम्हाला भेटण्याचा योग आज आला गेली पंधरा वर्ष आपण फोनवरच बोलतो आहे..."
मी " अरे हो यार.. हा बघ ना छकुला रोज बोलतो माझ्याशी पण मी हा कधी विचारच केला नाही की हा कधी समोर आला तर ओळखेन कसा .. विश्वासच बसत नाही मनिषाच लग्न होऊन १५ वर्षे झाली... शाळेतील दोस्ती.. आमची कुठल्या कुठं नातं जुळलं !... काय म्हणत आहे.. तुमचं विजयवाडा ?"
तो " छान आहे.. तुम्ही देखील या कधी तरी"
मनिषा पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली " म्हणजे अजून तु मला मैत्रीणच मानतोस..."
मी " अगं तसं नव्हे ! तु तर माझी सख्खी बहीणीच !"
ती " विवेक म्हणाला होता की राज ने दिल्लीला बोलवलं आहे आधी मला विश्वासच नाही बसला.. पण हा टिकीट घेऊन आला तेव्हा खुप आनंद झाला..."

तोच छकुला बोलला " मम्मी, काका कुठे तरी बाहेर चालले आहेत कपडे पॅक करत होते "
मी " अरे, नाही असंच कपडे भरुन ठेवतं होतो.. बँगे मध्ये.. "
ती " कुठ चालला आहेस ? काही काम आहे का जरुरी ? "
मी " अगं काही नाही.. असंच कपडे पॅक करत होतो"
मी "चल आत चला... फ्रेश व्हा !"
ती " तुझा गडी कुठे गेला "
मी " पळुन गेला आहे.. येईल दोन एक दिवसामध्ये.. त्याला पण महीन्या दोन महीन्यातून पळण्याची सवय आहे"
ती " मग जेवण कोण तयार करतोय ? तु ? "
मी " होय... मी तयार केलं असतं तर तुला येथे भेटलो असतो का ? सरळ हॉस्पिटल मध्ये नाही का आली असतीस भेटायला"
ती " म्हणजे हॉटेलचे जेवण चालू आहे तर... चल ह्या आठवड्यात तु माझ्या हातचंच खा ! "
मी " अरे वा ! म्हणजे आमची आठवडाभर दिवाळी तर "

मी " अरे विवेक, काय घेणार तु ? "
तो " मी , मी नाही घेत हो.."
मी " अरे मी आहे ना... हिला नको घाबरुस तु"
तो " मग बियर घेईन"
मी " हा हा हा.... चल वर तेरेस वर.. फ्रेश होऊन ये बसू.. खुप बोलायचं देखील आहे यार"
ती " दादा, कश्याला उगाच त्या पेक्षा मी मस्त पैकी ज्युस तयार करते ते पी.. बीयर पीण्यापेक्षा "
तो " जे काम कर... तु ज्युसच तयार कर "
मी " अरे, लगेच सुधरलास की बायको म्हणाली व तु नंदीबैला सारखा मान डोलवलीस "
तो " तसे नव्हे काका.. आपण कॉकटेल करु "
मी " बढिया "
ती " तुम्ही पुरुष लोक ना कधीच नाही सुधरणार.. "
मी "चल, जा बाळ तयारी कर लवकर .. व मस्त पैकी देशी जेवण तयार कर... जे सामान नाही आहे.. ते मला सांग दुकानदार येथेच देऊन जाईल "
ती " ठीक आहे.. "

तासाभरामध्ये आम्ही जेवणाच्या टेबलवर बसलो व मी एक चपातीचा तुकडा मोडलाच होता... तोच फोन वाजला.. मी उठ्णार तोच मनिषा म्हणाली "एक मिनिट , मी बघते कोण आहे.. जेवताना उठू नकोस "

ती " कोण "
समोरुन " मॅम, सर का फ्लाईट टाईम ९:४५ है.. ३५ मिहै..बाकी है.. सर पोहचे नही है एयर पोर्ट पे "
ती " किस के नाम पे है तिकीट "
समोरुन "मीस्टर राज जैन ! "
ती " ठिक है.. पोहच जायेंगे ! "
फोन ठेऊन परत आली व म्हणाली " दादा, तु टिकीट बुक केले आहेस , तुझ्या फ्लाईटचा टाईम झाला आहे त्यांचाच फोन आला होता "
मी " अरे, राहू दे.. मी प्लान रद्द केला आहे .. चल जेऊन घे "
ती " पण तु आताच कुठे चला होतास रात्री... "
मी " कुठ नाही "
ती " काही लपवत तर नाही आहेस ना "
मी " अगं काही नाही.."
ती " दादा.."
मी " मनिषा... जेव आता "

पाच-दहा मिनिटामध्ये जेवण उरकलं व आम्ही वर टेरेस वर आलो !

ती " दादा, तुझा मोबाईल दे पाहू.. घरी फोन करते "
मी " खाली रुम मध्ये आहे बघ चार्जिंगला "

काही मिनिटे निघून गेली !

ती " दादा, तु तिला भेटायला जाणार होतास उद्या ? "
मी उडालोच... !
मी " तुला कोणी सांगितलं ? "
ती " खाली तीचाच फोन वाजत होता जेव्हा मी खाली गेले होते"
मी " मग ? तु काय म्हणालीस "
ती " त्या सटवीला दिल्या चांगल्या चार ठेवणीतल्या कोल्हापुरी शिव्या .. व म्हणाले की पुन्हा फोन नको करुस"
मी कपाळाला हात मारुन घेतला व म्हणालो " ३० मिनिटामध्ये.. तु ही एकच ओळ बोललीस ? शक्यच नाही.. ! इतके वर्ष ज्या वेळेची तु वाट पाहत होतीस झालं ! समाधान झालं तुझं ! "
ती " जे काही हाल झाले तुझे हे सगळे तीच्यामुळे... तु अजून लग्न केलं नाहीस हे तीच्यामुळे... मग काय मी तीची आरती ओवाळू ? " असे म्हणत... ती रडू लागली..!
मी तीच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणालो.. " बाळ, दुस-याला कधीच दोष देऊ नये.. कर्म व त्याचे फळ आपलंच ! त्याचा उत्तराधिकारी कोणीच नाही.. चल तु तुझ्या मनातील बोललीस ना तीला.. तुझा राग गेला मनातून.. आता शांत हो.. ! "
ती " मला नाही जमत तुझ्या सारखं नेहमी शांत राहणं ... तीच्या बरोबर झालेल्या प्रेमाची गोष्ट देखील तु शांत पणेच सांगितलीस... तीच्या लग्नाची गोष्ट पण तु शांत पणेच सांगितलीस.. व विभाची..पण.. मला नाही रे जमत "
मी "नको काळजी करुस ! बस ! जे होत आहे ते होऊ दे ! आता तु तीला शिव्या दिल्यास, काही बोललीस म्हणून का मी तुला रागवेन ? नाही ना.. मग ! तीच्या आधीचा माझ्यावर हक्क तुझा बाळ... देन डॉन्ट वरी.. ! चुप बस आता... विवेक हिला घेऊन जा रुम मध्ये.... सकाळी बोलु आपण... "

ह्म्म! आता ?
पुढे काय ?
त्या बिचारीचा देखील काही दोष नाही.. ना मनिषाचा... !
तीला समजवावे लागेल.. नाहीतर कुठेतरी मनाला घाव लागेल !

************

मी " हलो !"
समोरुन " हलो, कोण ?"
मी "राज, राज जैन. आपण कोण ? "
तो "माणिक बोलतोय मी, राज"
मी "अरे माणिक.. कसा आहेस लेका ?"
तो " मी मजे में . तु कुठे आहेस .. कसा आहेस ?"
मी "अरे मी पण मजेत... दिल्लीतच आहे ! तुझ्या दिदीला फोन दे पाहू जरा"
तो "थांब हं.. देतो.. ( " दिदी.. राज को फोन छे.. रुममांसे उठाले").... राज.. एक मिनिट हं !"
ती " हलो,... राज !"
मी " माणिक फोन ठेव आता..."
तो " ठिक ठिक.."
मी " लेकाची अजून सवय नाही गेली तर "
ती " तुझी गेली ? "
मी " ते सोड.. काल रात्री मनिषा... तीच्या वतीने मी माफी मागतो.. रियली.. "
ती " राहु दे राज, पण खुप टिखट बोलली ती त्याचंच दुखः झालं "
मी " अरे मला माहीतच नव्हतं की तुझा फोन आला आहे.. मी टेरसवर होतो"
ती " पण तीचा हक्कच काय मला बोलायचा "
मी " हक्क ! तुला नाही कळायचं.. "
ती " का ? मला का नाही कळणार ?"
मी " काही नाती जपावी लागतात... ते तीला कळतं"
ती " म्हणजे, मला नाही कळत ? "
मी " मी असे नाही म्हणालो "
ती " मग ?"
मी " अरे ! ते सोड.. काय म्हणाली ती तुला ?"
ती " बापरे... किती तरी बोलली ! काही वेळ मलाच कळाले नाही काय म्हणाली ते"
मी " ह्म्म ठीक झालं नाही कळालं ते.. ती खास कोल्हापुरी भाषा आहे तुला नाही कळायची "
ती "अरे पण तीला झालं काय होतं ? ठीक आहे.. तुझ्या माझ्यात जे नातं आहे ते आपलं पर्सनल आहे ना त्यामध्ये ती कुठे आली ?"
मी " हे बघ, ती मला भाऊ मानते व मी तीला बहीण... तीच्या सुखः-दुखः मध्ये... मी जशी साथ दिली तशीच तीने देखील दिली"
ती " कुठे होती ती ? तु जेव्हा.. महाराष्ट्र सोडून भारतभर भटकत होतास तेव्हा कोठे होती ? मीच तुझ्याशी बोलत असे .. तुला धीर देत असे"
मी "अहमं !"
ती " अहमं ? म्हणजे ? "
मी " काही नाही... जशी तु संपर्कात होतीस तशीच ती देखील होती .. ती लग्न झालानंतर देखील संपर्कात होती व तू ?"
ती "तुला माझं सासरं माहीत आहे ना कसे आहे ते ! "
मी " तिचे सासरे.. देखील तुझ्या सार-यापेक्षा जास्तच कट्टर आहेत... सासू देखील खाष्ट आहे.. फोनला हात लावू देत नव्हते लग्नानंतर कित्येक महीने"
ती " तु मला हे का सांगतो आहेस ? "
मी " तुझ्या प्रश्नाचं उत्तर होतं ते"
ती " आपण पुन्हा भांडणार आहोत का ह्या विषयाला घेऊन ?"
मी " मला नाही वाटत की आपण भांडत आहोत.. पण नेहमी प्रमाणे तुझा आवाज चढत आहे.. बस इत्येकच "
ती "...... ठिक ! सोड हा विषय !"
मी " ठीक !"
ती " तु येणार होतास ? काय झालं "
मी " मनिषा जो पर्यंत येथे आहे तो पर्यंत तर नाही "
ती "राज, मी काही दिवसात परत जाणार आहे... मग माहीत नाही पुढे मागे भेट होईल की नाही ! "
मी " हो माहीत आहे... "
ती " तरी ही तू .. "
मी "एक स्पष्ट बोलू ? "
ती " बोल."
मी " आपल्या भेटीतून काय प्राप्त होईल ?... सरळ सरळ हे म्हणतो आहे.. आपण का भेटावे असे तुला वाटतं ?"
ती " तुला वाटतं आहे .."
मी " प्रथम इच्छा तु व्यक्त केली होतीस"
ती " म्हणजे सरळ सांग तुला नाही भेटायचं आहे ?"
मी "मी असे नाही म्हणालो.. पण एक उगाच डोक्यात आलेला प्रश्न तुला विचार ला का भेटायचं आहे ? "
ती " दोस्ती म्हणून.. एक मैत्रींच नातं म्हणून तरी भेटूच शकतो ना ?"
मी " देन... माझ्या जुन्या मित्रा... जरा तुला वाट पहावीच लागेल.. माझी बहीण लग्नानंतर प्रथमच माझ्या घरी आली आहे...."
ती " ठिक आहे.. जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा भेट... फोन जरुर कर आधी !"
मी " ठिक"

*****
मनिषा "दादा, चहा देऊ का ?"
मी " ह्म्म, हा दे ! विवेक कुठ आहे ?"
ती " झोपलाय अजून.. तू तीलाच फोन केला होतास ना आता ?"
मी " हो यार.."
ती " तू.. कश्याला तीच्या मागे आहेस अजून.."
मी "तुला कोण म्हणालं की मी तीच्या मागे आहे म्हणून ? "
ती " मग हा फोन का ? तीला भेटण्याचं प्रयोजन काय ? कुठल्या नात्यानं भेटणार आहेस ? मित्र म्हणून ? शक्य आहे ते ? "
मी "माहीत नाही... पण कधी वेळ मिळालाचं तर.. तीला फोन करतच असतो मी ... काही तरी ईकडेचे तिकडचे बोलुन मोकळा होत होतो... पण तीच लग्न झाल्या पासुन बोललंच नव्हतो.. हा तीचा माझा दुसरा-तीसरा संपर्क असावा सध्याच्या दिवसातील बस.."
ती " पण ह्यात माझ्या प्रश्नांच उत्तर कुठे आहे.. "
मी " देईन.. योग्य वेळी देईन."

****
क्रमशः

अव्यक्त क्षण

****
परवा चूकन तुझ्या लग्नाचे फोटो फ्लिकर वर भेटले.. खुपच छान दिसत होतीस लग्नाच्या दिवशी... कुठेच अपसेट दिसली नाहिस हे पाहू खुप बरं वाटलं , हा त्या दिवशी माझा वाढदिवस होता शक्यतो तु विसरलीस... कित्येक वर्ष तु मला न चुकता शुभेच्छा देत होतीस न चुकता... .. पण त्या दिवशी तु विसरली... मी खुप वेळ वाट पाहीली होती तुझ्या फोनची.. पण तो फोन काही वाजलाच नाही.. असेच दिवस दिवस काढले पण तुझा फोन आला नाही.. एक दिवस दुसराच कोणी सांगून गेला की तुझं लग्न झालं म्हणून.. मी इतका वाईट ही नव्हतो गं.. तु मला स्वतःच सांगितले नाहीस.. लग्नाच्या दोन दिवस आधी तु माझ्याशी तास भर गप्पा मारल्यास... त्यावेळी तर सागायचे .. पण तुझं मन मला कधीच कळालंच नाही.. !

तुला आठवतो तो गज्या.. तु त्याला गजकर्ण म्हणायचीस.. फक्त तुला चिढवतो म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेलो होतो... व त्याने माझा हात मोडला होता.. त्या दिवशी पण तु अशीच .. काना डोळा करुन निघून गेली होतीस ... सर्वाच्या समोर... पण संध्याकाळी हॉस्पीटल मध्ये आली होतीस भेटायला..... जेव्हा त्या व्यक्तीने तुझ्या लग्नाची बातमी दिली .. तेव्हा कोठे तरी वाटलं होतं.. की दोन-एक दिवसामध्ये.. फोन करुन.. बोलली तर असतीस माझ्याशी.. पण तो फोन आलाच नाही कधी !

तुला आवडतो म्हणून निळा रंग वापरायचो... तुला आवडतो म्हणून पिच्चर पाहायचो.. फक्त तुला आवडते म्हनून मला कधीच नआवडलेली शेपुची भाजी आवडीने खायचो... पण तुला माझी आवड कधी कळलीच नाही... तु आपल्याच दुनिये मस्त राहीलीस... आपले रस्ते कधी वेगळे झाले हे तुलाच काय मला देखील कधी समजलेच नाही.. तुझ्यासाठी तुझ्या घरासमोरुन मारल्या जाणा-या चकरा कधी कमी झाल्या... कळत न कळत कधी बंद झाल्या हे तुला कळालेच नाही... दिवसातुन दहादा येणारा माझा फोन कधी येणं बंद झाला तुला कळालेच नाही...!! हा पण मी तुला कळत न कळत नाव न लिहता पाठवलेली तुझ्या वाढदिवसाचे कार्ड तु माझंच आहे हे समजून जपुन ठेवली आहेस हे काल परवाच कळाले .. त्या वेळी कळत न कळत डोळ्यातून कधी पाणी गालापर्यंत आलं कळालंच नाही... खरं सांगू मला तु कधी समजलीच नाहीस ! तुझ्या मनात असलेली माझ्या बद्दलची भावना मला कधीच उमजली नाही... तुला माहीत होतं की मी वेडा आपले विचार कधी व्यवस्थीत व्यक्त करु शकणारच नाही तरी देखील तु एकदा ही विचारलं नाहीस !

गरब्याच्या रात्री.. तुझ्या कळत न कळत मी तुझ्या पाठीशीच असायचो ! तु कधी ह्या गरब्यातून त्या गरब्यात जात असे व.. मग रात्री दोन-अडीच त्या दरम्यान घरी एकटं कसं जायचं ह्या काळजीत घुटमळत उभी राहत असे तू ... तोच मी तुझ्या समोर येऊन... तुला घरापर्यंत सोबत करायचो... आज देखील आठवलं की हसू येतं स्वतः वरच ! पण मी बरोबर येत आहे हे कळताच तुझ्या चेह-यावर दिसणारा आनंद कधी डोळ्यासमोरुन गेलाच नाही ! छोट्या छोट्या गोष्टी मध्ये देखील तुला आनंद मिळायचा व तुझ्या चेह-यावर एक वेगळच हसू दिसायचं ... ! तुला आठवत असेल तु एकदा नापास झाली होतीस कुठल्याश्या तरी परिक्षेत... व तु रडून रडून डोळे लाल करुन बसली होतीस.. राम मंदिराच्या मागच्या बागेत.... त्यावेळी देखील तुला आधार देण्यासाठी मीच आलो होतो.. तुला कधी झोप लागली व तु माझ्या खांद्यावर विसावलीस हे तुला लक्षात देखील नसेल.. पण तुझे गालावर सुकलेले अश्रु पाहू माझे पाणावलेले डोळे.. तुला कधी उमजलेच नसतील !

मी जेव्हा जेव्हा माझं प्रेम व्यक्त करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा... तु काही ना काही कारण सागून तेथून निघून जात असे... पण जेव्हा तु स्वतः आपलं प्रेम व्यक्त केलं होतस तेव्हा तु विसरली होतीस... की मी तुझ्या पासून किती दुरावलो होतो.... ! तरी ही ... सर्व चुका माफ करुन मीच पुन्हा तुझ्या जिवनात आलो होतो... पण जसं जसे... तुझे सर्कल वाढत गेले तसं तसे मी तुझ्या सर्कल मधून पुन्हा बाहेर पडत गेलो... ! आपल्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला न बोलवता त्याला बोलवलंस तेव्हाच खरं तर ह्या कहानीचा अंत होणे गरजेचे होते पण मी वेडा... तुला पुन्हा पुन्हा माफ करत राहीलो .. व तु कधी पुन्हा येशील माझ्या कडे ही आशा करत बसलो !

****
खुप वर्षी झाली होती आपल्या अनाम नात्याला... शक्यतो तु मला विसरली देखील असशील पण मी अधीमधी तुझी माहीती शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत होतो... कधी काळी एकदोन चकरा देखील तुझ्या घरासमोरुन मारल्या.. एकदा तु दिसलीस ही.. मोठी वेणी बांधलेली मागे... गुजराती पध्दतीची ती सिल्कसाडी... गळ्यात मंगळसुत्र... कानातील सोन्याच्या रिंगा... हात देवपुजेचे साहित्य ... ह्म्म बरोबर एक लहान छकुलासा गोंडस मुलगा... असेल ३-४ वर्षाचा... तु आंबाबाईच्या मंदिरामध्ये.. आली होतीस... तु जेथे उभी होतीस त्याचा बरोबर मागे दगडी खांबाच्या मागेच मी उभा होता... तु एकदा पदर सावरायला मागे वळली होतीस... एक क्षण शक्यतो नजरेला नजर मिळाली असे वाटताच मी तेथून बाहेर पडलो... व बाजूच्या छोटेखानी मंदिरामध्ये घुसलो.. ! थोड्या वेळाने बाहेर आलो तोच तु भिरभिरत्या नजरेने कोणाला तरी शोधताना दिसलीस.. मला वाटलं मलाच शोधत आहेस.. तोच एक इसम तुझ्या जवळ आला व तुझा शोध संपला! ह्म्म तो तुझा नवरा होता.. शक्यतो तुम्ही देवी दर्शनालाच आला होता... !

काही दिवसापुर्वीच तुझी मैत्रीण भेटली होती नेट वर चॅटींग मध्ये.. बोलता बोलता ओळख झाली व जुन्या आठ्वणी पुन्हा हिरव्या झाल्या... ! तीच म्हणाली होती.. की तुला मला एकदा भेटायचं आहे... ! खरंच मी हरकलो होतो.. एकदम खुष झालो होतो... ! तुला भेटायला मीळेल ह्या विचारानाचे फुलकीत झालो होतो! पण तोच मनाने पुन्हा सावरले मला व विचार केला काय होईल तुला भेटून पुन्हा ? राहू दे .. ज्या जखमांच्यावर खपली चढलीच आहे ती का स्वतःच ओरबडून काढावी ? नकोच तुला भेटणे ! पण पुन्हा पुन्हा विचार डोक्यात येत गेले व मी त्या मैत्रीणीला हो भेटतो म्हणून सांगितले !

तुझ्या भेटण्याच्या विचारानेच अंगावर नेहमी रोमांच उभे राहतात... कधी काळी हरवलेल्या वाटा... पुन्हा सापडतील ह्याची आशा देखील कधी केली नाही मी.. पण तो योग पुन्हा येत आहे.. माहीत नाही तु मला ओळखशील की नाही... म्हातारा जरी दिसत नसलो तरी मध्ये खुप मोठा काळ वाहून गेला आहे... ज्या काळ्या भोर केसांचा मला कधी काळ माज होता ते केस आता थोडे थोडे पांढरे झालेले आहेत... डोळ्यावर चष्मा चढला आहे.. व आज काल फ्रेंच कट दाढी देखील ठेवली आहे.. माहीत नाही तु ओळखशील की नाही... पण तु अजून तशीच दिसत असशील नाही... त्या तुझ्या पुढे पुढे करणा-या केसाच्या लटा.. आज देखिल हलकेच गालाला स्पर्श करत विसावल्या असतील.. तुझे ते टपोरे डोळे आज देखील तुझ्या मनातील सुख / दुखाचे भाव जसेच्या तसे प्रतिबिंबीत करत असतील... आज देखील देखील तु पहाटे पहाटे अंगणात रांगोळीचा सडा घालत असशील व चुकुन कोणी वेगाने गाडी घेऊन घरा समोरुन गेला तर बाहेर येऊन पाहत असशील की मी तर नाही... दिवस दिवस भर फोन वर गप्पा मारणे तुझ्या इतकं मला कधी जमलंच नाही... त्या तुझ्या मित्राच्या गाडीचे.. पैश्याचे... स्टाईलचे तु केलेलं कौतुक मला कधी जिव्हरी लागलं ह्याचा तु विचारच केला नाही व अचानक एक दिवस मी सोडून गेल्या वर मात्र फिर फिर भिंगरी सारखी गावभर मला शोधत फिरली होतीस .. तेच प्रेम .. तोच भाव आज देखील असेल का तुझ्या मनात ? अशी अनेक प्रश्न मनाच्या कोप-यात चरफडत आहेत... बोचत आहेत.. व कोठे ना कोठे मी संपत आहे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

मराठा आणि ब्राह्मण वाद.....

shivaji महाराज.......