ganesh chaturti
गणेश चतुर्थी (गणेशोत्सव)….आपले सण
‘गणेश चतुर्थी’ | हरतालिका
अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे गणपती. ह्या ज्ञानाच्या देवाचे म्हणजेच गणरायाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थीस आगमन होते. या चतुर्थीस ‘गणेश चतुर्थी’ म्हणतात. प्रत्येक चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी, कृष्णपक्षातील चतुर्थीस संकष्टी व मंगळवारी आली तर अंगारकी चतुर्थी म्हणतात. भाद्रपद व माघ महिन्यातील चतुर्थीना विशेष महत्व आहे.
यादिवसाबद्दल पुराणांमध्ये बऱ्याच कथा आहेत. काही कथांनुसार या दिवशी गणपतीचा जन्म झाला. काहीनुसार या दिवशी म्हणजेच भादपद चतुर्थीला त्याने गजासुराचा नाश केला. ते काहीही असो पण या दिवसापासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस विघ्नहर्ता गणेशाची, त्याला घरी आणण्याची प्रथा रुढ झाली.
या दिवशी गणेशमूर्ती घरी आणतात. ती पूर्व-पश्चिम किंवा उत्तरेकडे तोंड करू ठेवतात. पुजेला चंदन, दूर्वा, केतकी, तुळस, शेंदूर वगैरे एकवीस प्रकारची पत्री महाभिषेक करून भक्तीभावाने आवाहन, आसन, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुण्य, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व मंत्रपुष्प अशा सोळा उपचारांनी जाणकार व्यक्ती पूजा करते. फक्त याच दिवशी गणपतीला तुळस वाहतात. नंतर सुखहर्ता दुखहर्ता आरती म्हणतात. आरतीनंतर शमी, केतकी, दूर्वा, शेंदूर वाहून मोदकांचा नैवद्य वाहतात. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार दीड, पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात व विसर्जनावेळी समुद्र, नदी किंवा तळयात दोन वेळा बुडवून वरखाली करतात व विसर्जन करतात.
गणपती ही विज्ञान देवता आणि सामाजिक देवतासुद्धा आहे. कोणत्याही कार्याची सुरवात गणेशपुजेने होते. श्रीगणेश हे एक तत्व आहे. ब्रह्म आहे. आत्मा आहे. गणपती हे ज्ञानाचे, विज्ञानाचे रुपक आहे. स्वरूप आहे
हरतालिका
image two
हरतालिका हे पार्वतीचे नाव आहे. पार्वतीने प्रबळ इच्छाशक्तीने तपश्चर्येने आपल्या मनाजोगता पती मिळविला. हे करताना तिला “आली” नावाच्या मैत्रिणीने मदत केली. आलीच्या मदतीने हर पती मिळाला म्हणून पार्वतीचे नाव हरतालिका पडले.
आपल्या भारतीय संस्कृतीत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी विशेष सण आहेत.
त्यातीलच हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनीदेखील करू शकतात.
कथा हरतालिकाची : ह्या व्रताची कथा मुलीसाठी प्रेरणादायक आहे. हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पर्वताची कन्या म्हणून पार्वतीदेखील म्हणतात. हिला भगवान विष्णूचे मागणे घेऊन नारदमुनी हिमालयाकडे आले. ह्या सुवार्तेने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती तर खूप आधीपासून भोळे सांब म्हणजेच श्री शंकराला वरून बसली होती. मनातल्या मनात तीने सदाशीवालाच आपला पती मानले होते.
पित्याने विष्णूशी लग्न ठरविल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली. तिथे तीने कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने, उपासनेने शंकराला प्रसन्न केले. व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला. शंकराने तथास्तु म्हटले.
ही बातमी कळताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिव पार्वतीचा मंगल विवाह सोहळा घडवून आणला. अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने, निष्ठेने शंकराला मिळविले म्हणून लोक शंकराला ‘पार्वतीपतये’ असे म्हणू लागले. पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केले. शंकर भोला होता पण कलागुणी, कर्तबगार, तपस्वी, शक्तीमान, दयाळू होता.
हल्लीच्या मुलींनी वं त्यांच्या पालकांनीदेखील या सणातून शिकण्यासारखे आहे. फक्त संपत्ती, ऐश्वर्य वा दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर, गुणांवर, कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतू सदगुणांची खात्री देता येते. हाच

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा