karorpati,,,wha





आपली सर्व स्वप्ने पुर्ण करण्याचा राजमार्ग 
 “Always remember money isn’t everything but make sure that you’ve made lot of it before making such a nonsense statement” … Warren Buffet.
 सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय लोकांचा  गुंतवणूकीचा कल हा बँक ठेवी, पोष्टाच्या योजना, विमा योजना, जमिन जुमला, घर इ. सुरक्षीत साधनात  करण्याकडे असतो.
 गुंतवणूक साधने
१)       बँक ठेवी – मिळणारा व्याजाचा दर रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरणानुसार कमी जास्त होत असतो म्हणून कधी ठेवीवर व्याज ६% मिळते तर कधी ते १०% सुध्दा मिळते. हे व्याजदर महागाईचे प्रमाणाशी निगडीत असतात. महागाई वाढली की ठेवींचे व्याजदर वाढतात, महागाई कमी झाली की व्याज दर कमी होतात. अशा गुंतवणूकीत जोखीम कमी असते परंतु मिळणारा परतावा एक तर महागाई खाऊन टाकते किंवा व्याजाचे उत्पन्न करपात्र ठरून टिडिएस कापला जातो.
२)       शेअर बाजार – शक्यतो सर्वसामान्य माणसाने शेअर बाजाराची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय शेअर खरेदी-विक्रीच्या फंदात पडू नये, ८०% पेक्षा जास्त लोकांना, अपु-या माहितीमुळे किंवा दुस-यावर विसंबल्यामुळे यात नुकसानच सोसावे लागते.
३)       जमिन-जुमला – जमीन - जुमल्याचे गुंतवणूकितून दीर्घ मुदतीत नेहमीच आकर्षक परतावा मिळालेला आहे. मात्र यामध्ये गुंतवणूकीची रक्कम हि कायमच सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते, तसेच जमिनीची हवी तेव्हा विक्री करता येत नाही.
४)       सोने – सोने हा सुध्दा गुंतवणूकीचा पर्याय मानला जातो मात्र दिर्घ मुदतीत सोन्याची किंमत हि महागाईचे दरानुसारच वाढत असते असा इतिहास आहे. २० वर्षापुर्वी सोने सुमारे ३५०० रु. तोळा होते, पगारही ५००० च्या दरम्याने होता, आज सोने २२००० रु. तोळा आहे व तुमचा पगार त्यापेक्षाही जास्तच आहे.
५)       म्युच्युअल फंड गुंवणकीचे प्रभावी माध्यम
सर्वसामान्य माणसासाठी म्युच्युअल फंड हे निर्विवादपणे गुंतवणूकीचे प्रभावी माध्यम आहे. नियमीतपणे दर महा ठरावीक रक्कम म्युच्युअल फंड इक्वीटी योजनेत गुंतवून, दीर्घ मुदतीत भरघोस उत्पन्न मिळवून अगदी करोडपती बनणे हे सहज शक्य आहे. कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता कायदेशीर मार्गाने तुलनेने कमी कालावधीत करोडपती होण्याचा राजमार्ग म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतूनच जातो.
 गुंतवणूक म्हणून विकली जाणारी अन्य साधने:
आता आपण असे काही पर्याय पाहूया जे प्रत्यक्ष गुंतवणूक पर्याय नसूनही अनेक वेळा गुंतवणूक पर्याय म्हणूनच विकले जातात.
 १)       विमा योजना –विम्याचा मुख्य उद्देश हा अकाली मृत्यु झाल्यास वारसांच्या आर्थिक सुरक्षेचे साधन म्हणूनच आहे. या पासून मिळणारा परतावा हा बँक व्याजापेक्षाही कमी असतो.
२)       युलीप – हि शेअर बाजाराची जोखीम असणारी विमा योजना असते. यातील फंड मँनेजमेट, अँडमीन, मॉर्ट्यालीटी आदी प्रकारचे सर्व मिळून किमान आकार वार्षीक १०% असतात व ते तुम्हाला दिलेली युनीटस् कमी करुनच आकारले जातात.
 जीवन विमा हा अत्यावश्यकच आहे मात्र जीवन विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नये. टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुद्ध आणि पारंपारिक स्वरूप आहे. मात्र टर्म इंशुरन्स व्यतिरिक्त अन्य विमा योजना या फक्त एजंटसाठीच फायद्याच्या असतात. 
 मात्र जीवन विमा घेताना तो जर टर्म इंशुरन्सच्या माध्यमातून घेऊन गुंतवणूकीसाठी सोबत म्युच्युअल फंडाची योजना घेतल्यास कसे फायदेशीर होते ते खालील टेबल मध्ये पहा.
वय
मासिक टर्म इंशुरन्स हप्ता
मासिक म्युचअल फंड गुंतवणूक
एकूण मासीक रक्कम
 मुदत वर्षे
जीवन विमा संरक्षण रुपये
मुदतपुर्तीचे वय वर्ष
मुदत अखेर गुंतवणूक मुल्य रुपये
25
466
722
1188
30
25 लाख
55
50 लाख
30
582
3339
3921
30
25 लाख
60
50 लाख
35
821
3339
4160
30
25 लाख
65
50 लाख
40
1073
3339
4412
25
25 लाख
65
50 लाख
  • वरिल उदाहरणात म्युच्युअल फंडाचा परतावा दिर्घ मुदतीत 15% वार्षीक चक्रवाढ पध्दतीने गृहित धरला आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची नऊ सबळ कारणे
१)       तुमच्या गुंतवणकीची काळजी तज्ज्ञ व्यक्ती घेतात - प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक फंड मँनेजर्स नेमते व त्याना सहाय्यक म्हणून रिसर्च टिम मध्ये अनेक व्यक्ती काम करत असतात.
२)       संपर्ण रक्कम गुंतवली जाते - म्युच्युअल फंडाच्या योजनेत तुम्ही गुंतवलेली संपूर्ण रक्कम कोणत्याही प्रकारची वजावट न करता गुंतवली जाते. प्रवेश आकार काही नाही. एक वर्षानंतर रक्कम काढल्यास निर्गमन आकार काही नाही.
३)       कमी जोख-म्युच्युअल फंडातील रक्कम अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते, त्यामुळे जोखीम कमी होते.
४)       पैसे केव्हाही काढता येतात - म्युच्युअल फंडाच्या योजना या बँकेच्या बचत खात्याप्रमाणे चालविता येत असल्यामुळे केव्हाही पैसे गुंतवता तसेच काढता पण येतात. विनंती केल्यापासून पाचव्या दिवशी आपल्या बँक खात्यात पैसे जमा होतात.
५)       कमीतकमी खर्च - दर वर्षी सर्वसाधारण पणे जास्तीत जास्त आकारला जाणारा खर्च एकूण गुंतवणूक मुल्याच्या २.५०% पेक्षा कमीच असतो.
६)       पारदर्शकता - गुंतवणूकीचे (युनीटचे) मूल्य रोजच्या रोज, सर्व खर्च वजा करुन, जाहिर केले जाते.
७)       करमुक्त परतावा - इक्वीटी म्युच्युअल फंडातून मिळणारा लाभांश (Dividend) पूर्णत: करमुक्त असतो. तसेच गुंतवणूक केल्यापासून एक वर्षानंतर पैसे काढल्यास मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
८)       सेबी व अँफीचे नियंत्रण - सर्व म्युच्युअल फंड हे SEBI (Securities & Exchange Board of India) आणि AMFI (Association of Mutual Funds of India) कडे नोंदणीकृत असतात आणि त्यानी घालून दिलेल्या नियमांनुसार काम करत असतात.
९)       आयकर कलम ८०-सी अंतर्गत सुट: - इक्वीटी लिंक सेव्हिंग्स स्किमस् प्रकारच्या योजनेत आयकर कलम ८० सी अंतर्गत इन्कम टँक्स मध्ये उत्पन्नात रुपये एक लाखापर्यंत वजावट मिळते. अशा योजनेतून किमान तीन वर्षे पैसे काढता येत नाहीत.
 आपल्या स्वप्नपुर्तीसाठी काय करा?
जर तुम्हाला करोडपती बनावयाचे असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या चांगल्या योजनेत SIP (Systematic Investment Plan) व्दारे नियमीत दरमहा ठरावीक रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवा. म्युच्युअल फंडाच्या अनेक चांगल्या योजनांनी गेल्या १५ वर्षात गुंतवणुकीवर चक्रवाढ पध्दतीने वार्षिक सरासरी २५% पेक्षाही जास्त परतावा दिलेला आहे. मात्र आपण गुंतवणूक करताना वार्षिक सरासरी १५% प्रमाणे परतावा मिळेल अशा अपेक्षेनेच गुंतवणकीचे नियोजन करणे योग्य होईल. या हिशोबाने जर आपणास २० वर्षात करोडपती व्हावयाचे असेल तर दर महा रुपये ७००० गुंतवावे लागतील. कालावधी कमी ठेवल्यास दर महा जास्त रक्कम गुंतवावी लागेल व कालावधी जास्त ठेवल्यास कमी रक्कम गुंतवावी लागेल. हे ज्याचे त्याने आपल्या नियमीत बचत करण्याच्या क्षमतेनुसार ठरवावे.
 आपण जर का दर महा रुपये ५००० (पांच हजार) गुंतवणूक  केली व मिळणारा परतावा ८% ते १५% या दरम्यान असेल तर आपल्या गुंतवणकीचे ठरावीक मुदती अखे किती मल्य होऊ शकते ते टक्केवारी प्रमाणे पहा:
द.म.  (रुपये)
कालवधी (वर्षे)
८% दराने होणारे मल्य
१०% दराने होणारे मल्य
१५% दराने होणारे मल्य
५०००
५६४३०४
६०९७९२
७४४८४१
५०००
१२
१२१०५५९
१३९३७०८
२०१७९२३
५०००
१५
१७४१७२६
२०८९६२१
३३८४३१५
५०००
२०
२९६४७३६
३८२८४८५
७५७९७७५
   आता म्युच्युअल फंडाच्या काही चांगल्या योजनांमध्ये नियमीत दर महा रुपये ५००० गुंतवले असते तर प्रत्यक्षात  मल्य किती झाले असते ते पहा:
योजनेचे नांव
गुंतवणूकीचे उदिष्ट
७ वर्षे
१२ वर्षे
१५ वर्षे
Reliance Growth
मोठ्या, मध्यम व लहान कंपन्या
८,५९,३००
५६,७३,९८१
१,२२,८०,४०६
Reliance Vision
शेअर्स व कर्जरोखे समतोल
७,५४,४५९
४४,२९,१३२
८७,१९,०१५
HDFC Equity
मोठ्या, मध्यम व लहान कंपन्या
९,५५,८९८
४७,९१,९७७
१,१८,१७,५०६
HDFC Tax Saver
कर बचतीसाठी योजना
८,५६,२५४
४१,५२,११९
७८,८७,८६८
HDFC Top200
मोठ्या व मध्यम  कंपन्या
९,२२,८६४
४३,६२,८७१
७१,६०,३४४
SBI Global
मध्यम व लहान कंपन्या
७,८९,२७७
२६,७०,९७१
४०,४९,११२
UTI Master Share **
मोठ्या व मध्यम  कंपन्या
७,०७,२११
१९,९६,३७६
२३,२८,१०२
* वरील परतावे हे १० जून २०११ पर्यंतचे आहेत व ते ग्रोथ ऑप्शनचे आहेत.
** युटिआय म्युच्युअल फंडाच्या योजनेत २००५ साला पुर्वी ग्रोथ ऑप्शन नव्हता, त्या योजनेत त्यापुर्वीच्या काळात डिव्हीडंड दिला जात होता, सबब या योजनेचा परतावा कमी दिसत आहे. तो विचारात घेतल्यास परतावा अन्य चांगल्या योजनेप्रमाणेच मिळालेला आहे.
वरील तक्त्यावरुन दिसून येते की वरील सर्वच योजनांतून ७ वर्षे मुदतीत चक्रवाढ पध्दतीने १२% पेक्षा अधिक उत्पन्न मिळालेले आहे. जर गुंतवणूकीचा कालावधी १५ वर्षे किंवा अधिक असेल तर २०% पेक्षा जास्त मिळालेले दिसते. सर्वत्र लागू असणारे सूत्र म्हणजे, कमी जोखीम – कमी परतावा, मध्यम जोखीम – मध्यम परतावा व जास्त जोखीम – जास्त परतावा. 
 म्युच्युअल फंडाच्या विविध योजना-
प्रत्येक व्यक्तिची गुंतवणूकीकडे पाहण्याची दृष्टी, तसेच जोखीम स्वीकारण्याची तयारी वेगवेगळी असते, म्हणून म्युच्युअल फंडांच्या योजनाही प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या असतात. काही प्रमुख योजना खालील प्रमाणे आहेत.
१)       इक्वीटी शेअर्स (समभाग) आधारीत योजना:
अ)                  डायव्हर्सिफाईड लार्ज कँप इक्वीटी स्किमस् – अशा प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि फक्त मोठ्या, कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. जोखीम तुलनेने कमी असते, परतावा स्थिर असतो.
आ) डायव्हर्सिफाईड लार्ज अँड मिड कँप इक्वीटी स्किमस् – अशा प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि फक्त मोठ्या व मध्यम आकाराचे कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते.
इ)       डायव्हर्सिफाईड मल्टी कँप इक्वीटी स्किमस् – गुंतवणूक मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. जोखीम तुलनेने जास्त असते, परतावा जास्त मिळू शकतो
ई)       डायव्हर्सिफाईड मिड अँड स्मॉल कँप इक्वीटी स्किमस् -  गुंतवणूक फक्त मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. जोखीम जास्त असते.
उ)       डायव्हर्सिफाईड स्मॉल कँप इक्वीटी स्किमस्-  गुंतवणूक फक्त लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. जास्त जोखीम असते.
ऊ)      सेक्टर स्पेसिफीक स्किमस् -  गुंतवणूक फक्त एखाद्या सेक्टर (क्षेत्र) मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते. एकाच क्षेत्रातील कंपन्यात गुंतवणूक केली जात असल्यामुळे जोखीम सर्वात जास्त असते.
२)       समभाग व कर्जरोखे आधारित समतोल योजना – अशा प्रकारच्या योजनेतील ६०% ते ७०% गुंतवणूक निरनिराळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये केली जाते व ३०% ते ४०% गुंतवणूक हि सरकारी/खाजगी कंपन्यांच्या कर्जरोखे (बॉंड), बँक ठेवी, मनी मार्केट इ. सुरक्षीत साधनात केली जाते. या योजनेत माफक जोखीम असते, म्हणून म्युच्युअल फंडात प्रथमच  करणा-या व्यक्तिनी सुरुवातीला अशा प्रकारच्या योजनेत काही काळ गुंतवणूक करुन अनुभव घ्यावा व नंतर जास्त जोखीमीच्या योजनेत  करावी. उदा. एचडीएफसी प्रुडेन्स फंड, रिलायन्स व्हिजन इ.
३)       इक्वीटी लिंक सेव्हिंग्स स्किमस् – अशा प्रकारचे योजनेत आयकर कलम ८० सी अंतर्गत इन्कम टँक्स मध्ये उत्पन्नात वजावट मिळते. मात्र अशा प्रकारच्या योजनेतून किमान तीन वर्षे पैसे काढता येत नाहीत.
४)       मन्थली इंकम प्लान (एमआयपी) – या प्रकारच्या योजनेत २०% ते २५% रक्कम कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते व ७५% ते ८०% रक्कम हि सरकारी/खाजगी कंपन्यांचे कर्जरोखे (बॉंड), बँक ठेवी, मनी मार्केट इ. सुरक्षीत साधनात गुंतवली जाते. या योजनेत बहुतांशी दर महा डिव्हिडंड दिला जातो. निवृत्त झालेल्या व्यक्ती किंवा ज्याना कमी जोखीम घेऊन नियमीत उत्पन्न हवे असते अशानी या प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करावी.
५)       डेट फंड (कर्जरोखे आधारीत) योजना - अशा प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि फक्त सरकारी/खाजगी कंपन्यांच्या कर्जरोखे (बॉंड), बँक ठेवी, मनी मार्केट इ. सुरक्षीत साधनांत केली जाते. अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराच्या बदलाची, क्रेडिट रेटिंग बदलाची फक्त जोखीम असते. अशा योजनेत अगदी काही दिवसांपासून ते काही वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठीही गुंतवणूक करता येते. जोखीम अत्यल्प असते. अशा योजना या बचत खात्याला उत्तम पर्याय आहेत. डेट फंडाच्याही विविध प्रकारच्या योजना असतात. परतावा व्याज दराच्या चढ उतारानुसार मिळतो.
६)       फिक्सड् मँच्युरीटी प्लान – अशा प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि फक्त सरकारी/खाजगी कंपन्यांचे कर्जरोखे (बॉंड), बँक ठेवी, मनी मार्केट इ. सुरक्षीत साधनात केली जाते.  या योजनांना ठरावीक मुदत ३० दिवस ते ३ वर्षे इतपत असते. या योजना बँक ठेवींना उत्तम पर्याय मानल्या जातात. कर आकारणी इंडेक्सेशन चा फायदा घेऊन करता येते. टिडिएस कापला जात नाही.
७)       गोल्ड फंड स्किमस् – या स्किम मध्ये ९९.९९% शुध्दतेच्या सोन्यातच  केली जाते. घरात सोने सांभाळण्याची जोखीम नाहीशी होते. घरात सोने ठेवल्यास त्यावर कोणतेच उत्पन्न मिळत नाही. पण गोल्ड फंड योजने मध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर उत्पन्नही मिळते. सोन्याचे भावातील चढ-उताराचा फायदा मिळतो. सोन्यात प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यापेक्षा हि गुंतवणूक नेहमीच फायदेशीर होते. ज्यांना पैशाची गुंतवणूक सोन्यात करावयाची आहे त्याना तर ही योजना म्हणजे सोन्याची खाणच आहे !
 म्युच्युअल फंडात गुंतवणकीचे पर्याय:
१)       एक रकमी गुंतवणूक – आपण कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेत एक रकमी कमीत-कमी रु.५०००/- व जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता. अशा प्रकारच्या एक रकमी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम सर्वाधीक असल्यामुळे अशी गुंतवणूक  हि दिर्घ काळासाठीच करावी.
२)       Systematic Investment Plan (SIP) – हा नियमीत गुंतवणूक पर्याय आहे, अशा प्रकारच्या योजनेत, बाजार खाली असताना तसेच वर असतानाही नियमीत दरमहा गुंतवणूक होत असल्यामुळे गुंतवणुकीच्या रकमेची सरासरी होते व त्यामुळे बाजाराची जोखीम कमी होते, त्याचप्रमाणे अशा योजनेत चक्रवाढीचा फायदाही मिळतो. यासाठीच अशाप्रकारची गुंतवणूक हि म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम पर्याय समजला जातो. दर महा कमीत कमी रु.५००/- गुंतवता येतात.
३)       Systematic Withdrawal Plan (SWP) – एकदाच रक्कम गुंतवून नियमीत मासीक/त्रैमासीक उत्पन्न मिळण्यासाठी चांगली योजना. अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीच्या १% दराने दर महा पैसे काढणे योग्य होते, दीर्घ मुदतीत पैसे काढूनही मुद्दलात भरीव वाढ होण्याची शक्यता असते.
४)       Systematic Transfer Plan (STP) – ज्या व्यक्तिंना एक रकमी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे मात्र शेअर बाजारात नियमीतपणे होणा-या चढ उताराची जोखीम घेण्याची इच्छा नसेल त्यानी हा पर्याय वापरुन प्रथमत: संपूर्ण रक्कम कर्जरोखे (डेट) फंड आधारीत योजनेत गुंतवावी व तेथून नियमीत दरमहा/त्रैमासिक तत्वावर ठरावीक रक्कम इक्वीटी योजनेत आणण्याची सुचना द्यावी यामुळे गुंतवणूकीची सरासरी होते.

 गुंतवणूक करताना लागणारी कागदपत्रे:
१)       संपुर्ण माहिती भरलेला म्युच्युअल फंड योजनेचा फॉर्म, सही/सह्या करुन देणे. (काही फॉर्म सोबत जोडले आहेत.)
२)       पँन कार्डची फोटो प्रत.
३)       केवायसी पुरावा.
४)       रकमेचा अँट पार चेक.

केवायसी  Know Your Customer (KYC) – हि एकदाच करावी लागते. यासाठी लागणारी कागदपत्रे:
१)       फॉर्म भरुन व सही करुन देणे. (फॉर्म सोबत जोडला आहे.)
२)       फॉर्मवर एक फोटो चिकटवावा, व त्यावर अर्धी बाहेर व अर्धी फोटोवर अशी सही करावी.
३)       पँन कार्ड फोटो प्रत.
४)       राहण्याचे पत्त्याचे पुराव्याची फोटो प्रत जोडावी.

ध्रुवबाळाची गोष्ट आपण लहानपणीच ऐकलेली असते. सावत्र आईच्या तिरस्कारामुळे ध्रुवबाळाला राजा असलेल्या त्याच्या वडिलांच्या शेजारी बसण्यास मनाई केली जाते आणि मग त्याच रागाने ध्रुवबाळ आपल्याला कुणीही हालण्यास सांगू नये अशा अढळ सनाच्या शोधासाठी जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये तप केल्यानंतर प्रसन्न झालेल्या देवाकडे ध्रुवबाळाने आपणास कुणी हाकलू नये असे अढळ स्थान अशी मागणी केली. देवाने त्याला आकाशातील एका अशा तार्‍याचे स्थान दिले जे अढळ होते. इतर सर्व तारे जरी आपल्या जागेवरून सरकताना दिसत असले तरी ध्रुवतारा एकाच ठिकाणी असतो. लहान वयामध्ये ध्रुवबाळाने केलेल्या धाडसाची कथा आपणा सर्वांनाच माहीत आहे.
पृथ्वीवर उत्तर गोलार्धामध्ये उत्तर दिशेस पाहिल्यास क्षितिजापासून थोडासा वर (मुंबईतून साधारण १९ अंश) आपणास ध्रुवतारा दिसतो. बर्‍याच लोकांना ध्रुवतारा तेजस्वी असावा असे वाटते, पण प्रत्यक्षात तो दिसायला एक साधारण तारा आहे. संपूर्ण रात्रभर इतर तार्‍यांप्रमाणेच ध्रुवतार्‍याचे निरीक्षण केल्यास आपणास असे आढळेल की इतर सर्व तारे पुढे सरकतील पण ध्रुवतारा मात्र त्याच ठिकाणी असेल. (याचा अर्थ तो स्थिर आणि अढळ आहे असा होत नाही.)
प्रत्यक्षात ध्रुवतारा स्थिर नाही. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. एका मोकळ्या जागी उभे राहा. आता समोर कुठल्याही एखाद्या गोष्टीकडे तोंड करून उभे राहा. आता आपल्याभोवती एक फेरी मारून पुन्हा त्याच गोष्टीच्या समोर या.  आपणास कळेल की सुरुवातीला आपल्यासमोर असलेली ती गोष्ट आपली फेरी पूर्ण झाल्यानंतर आपणास दिसली म्हणजेच हे.पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.
खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या अक्षाची फेरी दाखविली आहे.
या तिसर्‍या गतीमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो पृथ्वीचा कललेला अक्ष देखिल फिरतो. या पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेस या पृथ्वीच्या अक्षाच्या फेरीमध्ये एखादा तारा येतो तेव्हा तो तारा काळातील पृथ्वीचा 'ध्रुवतारा' म्हणून ओळखला जातो.
खालील चित्रामध्ये अंतराळातील तार्‍यांच्यामध्ये पृथ्वीचा कललेला अक्ष दाखविले दाखविला असून तो फेरी पूर्ण करताना कशाप्रकारे इतर तारे त्याच्या जागेमध्ये आल्याने तो तारा पृथ्वीचा ध्रुवतारा बनतो.
खालील चित्रामध्ये परांचन गतीच्या म्हणजेच पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला २६,००० वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे रिंगण दाखविले असून सध्याच्या इ. स. २००० या काळामध्ये रिंगणातील वरील जागेमध्ये सध्याचा ध्रुवतारा आहे. तर याआधी कालेय तारकासमुहातील 'ठुबान' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा होता. तर यानंतर जवळपास १२,००० वर्षांनी या रिंगणाजवळ स्वरमंडळ तारकासमुहातील 'अभिजित' हा तारा पृथ्वीचा ध्रुवतारा असेल. म्हणजेच ध्रुवतार्‍याचे स्थान अढळ नाही. परांचन गतीचा फेरीमध्ये पृथ्वीचा ध्रुवतारा नेहमीच बदलला आहे. सध्याचा ध्रुवतारा हा देखिल काही काळाने बदलून भविष्यामध्ये दुसराच तारा ध्रुवतारा असेल.
सध्याचा ध्रुवतारा देखिल पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नसून तो किंचितसा बाजूला असल्याने तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.
खालील चित्रामध्ये आपणास दिसेल की रात्रभर केलेल्या तार्‍यांच्या छायाचित्रणातून इतर तार्‍यांचे एक रिंगण झाले आहे तर त्या रिंगणाच्या मध्यभागी एक छोटासे रिंगण आहे. प्रत्यक्षात ध्रुवतार्‍याचे रिंगण आहे. ध्रुवतारा पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नाही त्यामुळे तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.
पृथ्वीचा ध्रुवतारा हा फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातच नसून तो दक्षिण गोलार्धात देखिल असू शकतो. कारण पृथ्वीचा अक्ष हा दोन्ही बाजूस आहे. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्‍या आकाशातील रिंगणामध्ये सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने इथे सध्या ध्रुवतारा नाही. खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्‍या आकाशातील रिंगण दाखविले आहे. जेथे सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने सध्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ध्रुवतारा नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी उखाने

विसरू नको रे आई बापाला

मराठा आणि ब्राह्मण वाद.....