आई-वडील...
आई-वडील.... बस शब्दच संपतात माझे हे दोन शब्द ऐकल्यावर , उर भरून येतो त्यांच्या आठवणी मनात दाटल्यावर . पर्वता सारखे वडील तर नदी सारखी आई , त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही. आई निर्मल पवित्र तर गंभीर अन संयमी पिता , वडील पुरण वेद तर आई साक्षात गीता . मुलांचा आनंद हा त्यांना पर्मानंदाचे सुख देतो , पण हा मुलगा त्यांना वृद्धाश्रमात नेऊन आपली जबाबदारी झटकून देतो . हि मुले आयुष्यातल्या सुखांमध्ये आई वडिलांना विसरतात , ज्यांनी बोटाने धरून पायावर उभे केले त्यांचा हात धरायला कचरतात . "आमच्या साठी काय केल?","हे तर तुमचे कर्तव्य होत !" असे म्हणून दाखवतात , पण बोचऱ्या शब्दांच्या वेदना फक्त आई-वडील बनल्यावरच जाणवतात . कितीही मोठे झाले तरी ते तुम्हाला लहान म्हणून पाहत असतात , लाचारी म्हणून नाही तर फक्त प्रेमापोटी ते तुमच्याबरोबर राहत असतात. आई-वडील खरच इतके महान आहेत , देव शिक्षा करेल मुलांना म्हणून ते बोलतात "ते तर अजून लहान आहेत.! "